Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

प्रसुतीनंतर आईला करण्यात येणाऱ्या मसाजबद्दल जाणून घ्या

प्रसुतीनंतर एक नवा जीव डॉक्टर हातात ठेवतात तेव्हा आईला होणारा आनंद अवर्णनीय असतो. आनंदाबरोबर तिचे जग बाळाभोवती फिरत असते. प्रसुती कोणत्याही प्रकारे म्हणजे नैसर्गिक किंवा सी सेक्शन झालेली असो बाळाला पाहिल्यानंतर आईला वेदना, त्रास यांचा विसर पडतो आणि ती बाळाचा चेहरा पाहून आनंदी होते. ह्या सर्व गोष्टी अनुभवल्यानंतरही एक खूप महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नवजात अर्भकाबरोबरच नव्या आईचीची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

आईची शारिरीक निगा -

आईची काळजी घेण्यासाठी आहाराबरोबर शारिरीक स्वास्थासाठी गरजेची असते ती मालिश. भारतात बहुतांश भागात प्रसुतीनंतर किमान सव्वा ते दोन महिने बाळाबरोबरच बाळंतीणीला म्हणजे नव्या आईलाही मालिश केली जाते. बऱ्याचदा अशा प्रकारे बाळाला आणि आईला मालिश करणाऱ्या अनुभवी बायका नेमल्या जातात. घरी येऊन त्या बाळंतिणीला मसाज करतात. काही वेळा प्रसुतीपुर्वीही मसाज केला जातो. मात्र प्रसुतीनंतर मसाज करण्याचे विशेष महत्त्व आहे.

मसाजची गरज -

सर्वसाधारणपणे पायापासून मसाज करण्यास सुरुवात केली जाते. मग हळुहळु शरीराच्या वरच्या बाजूने मसाज केला जातो. पायापासून डोक्याच्या केसापर्यंत बाळंतिणीला मसाज केल्याने तिला हलके वाटते. बाळ झाल्यानंतर साहाजिकच आई बाळातच गुरफटली जाते. अशा वेळी मसाज हा तिला आराम देणारा आणि हलके वाटण्यास मदत करतो.

मसाजसाठी वेळ-

बाळंतिणीला मसाज करण्यासाठी किमान एक तासाची आवश्यकता असते. त्यासाठी बाळाची सर्वतोपरी काळजी घेणारी व्यक्ती घरात असणे आवश्यक असते. त्यांच्या भरवश्यावर बाळाला झोपवून बाळंतिण झालेली आई शांतपणे मसाज करून घेऊ शकते. शांत चित्ताने एकटे राहून मसाज करुन घेणे नक्कीच बरे वाटते त्यामुळे जुनी असलेली ही परंपरा नक्कीच चांगली आहे.

मसाज चे फायदे -

मसाज केल्याने स्नायूमध्ये रक्त आणि प्राणवायू चे सक्र्युलेशन वाढते. त्यामुळे मूत्रqपडाचे काम सुयोग्य पद्धतीने होत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

ऑॅक्सिटोसिन शरीरातून लवकर स्रवल्याने स्तन्य चांगल्या प्रकारे तयार होते. मसाजच्या वेळी स्तनांची हलक्या हाताने मालिश केली जाते. त्यामुळे स्नायू शिथिल होतात.

गर्भधारणेच्या काळात गर्भाच्या वाढीमुळे वजन आणि शरीराचे आकारमानही वाढते. त्यामुळे त्वचा ताणली जाते. प्रसुती नंतर ताणलेली त्वचा ढीली पडते. मसाजमुळे ओघळलेली, ढिली झालेली त्वचा पुन्हा मूळ आकारात येते आणि घट्टही होते.

तिळाच्या तेलाने मसाज केल्यास त्वचा घट्ट होण्यास मदत होते.

मसाजमुळे ढिले पडलेले स्नायू घट्टा होण्यास मदत होते तसेच ताकदही भरून निघते.

प्रसुतीनंतर खूप वेळ झोपून किंवा बाळाला दुध पाजताना चुकीच्या पद्धतीने बसल्यास पाठीला रग लागणे सारखे त्रास होतात. मसाज केल्याने या सर्व वेदनांपासून आईला आराम मिळतो.

सी सेक्शन प्रसुती झाली असली तरीही मसाज केल्याने फायदा होतो. टाके असलेला भाग सोडून पोटाच्या इतर भागाला मसाज करावा. टाके सुकल्यानंतर अलवार हाताने टाक्यांच्या जागी मसाज करावा जेणेकरून रक्ताभिसरण वाढून आतूनही टाके भरून निघतील.

मसाजमुळे प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत मिळते.

प्रसुतीनंतर स्त्रीला नैराश्य येऊ शकते. पण मसाज मुळे शरीर आणि मन उल्हसित राहाण्यास मदत होते. तणाव दूर होण्यास मसाजचा फायदा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रसुतीनंतर हार्मोन्सचे स्राव नियमित होण्यासाठी मदत होते शिवाय अंगावर आलेली सूजही कमी होते.

मसाज केल्याने आईला शांत झोप मिळत असल्याने स्तन्य निर्मिती उत्तम होते पर्यायाने बाळाला पुरेसे दूध मिळते.

कधी सुरु करावा-

प्रसुतीनंतर लगेचच तीन चार दिवसात मसाज सुरु करता येईल. शक्यतो घरीच मसाज करावा. त्यामुळे बाळाला गरज असल्यास त्याच्याकडे लक्ष देता येईल. बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर मसाजला सुरुवात करावी त्यामुळे कमीत कमी एक तास मसाज करून घेता येईल. तो पर्यंत आया किंवा आजी आजोबा बाळाकडे लक्ष देऊ शकतील.

मसाज केव्हा नको (महत्वाचे)

त्वचेशी निगडीत काही समस्या असल्यास जसे पुरळ, फोड किंवा एक्झिमा असेल.

वैद्यकीय गुंतागुंत असल्यास

उच्च रक्तदाब असल्यास मसाज हलक्या हाताने करावा किंवा टाळावा.

हार्नियाचा त्रास असल्यास.

बहुतांश वेळा प्रसुतीनंतर डॉक्टर मसाज केव्हा सुरु करायचा त्याविषयी सांगतातच. मसाज करावा की नाही याविषयीही देखील त्यांचा सल्ला घ्यावा. काही गुंतागुंत असल्यास मसाज करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रकृतीनुसारच मसाज सुरु करावा. मसाज मुळे आराम आणि शांतता मिळण्यास नक्कीच मदत होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon