Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

कुटुंब सुखी व समाधानी करण्यासाठी काही मार्ग


       कामाचे व्यस्त वेळापत्रक, शाळेचा बोजड गृहपाठ आणि दैनंदिन कामे यांच्यामुळे आपल्याला परिवारासोबत काळ व्यतीत करणे अवघड होऊन जाते. तसेच जितकाही वेळ उरतो, तो आपल्या स्मार्टफोन्सच्या स्क्रीनवरच डोळे लावून बसण्यात आणि इंटरनेटच्या आभासी दुनियेची टेहळणी करण्यातच इतका खर्च होतो की, आपण वास्तविक जगाशी अनभिज्ञच होऊन जातो. या आपल्या जलदगती जगात आपल्या कुटुंबासह थोडा वेळ व्यतीत करणे आणि कुटुंबात आपलेपणाची जाणीव निर्माण करणे अत्यंत निकडीचे ठरते. तर चला, यासाठीचेच काही मार्ग आपण पाहुयात:

१.एकत्र जेवण बनवा.

आपल्या मुलांना जेवण कसे बनवतात, हे शिकवा. ही कृती कुटुंबात मस्तीची वेळही घेऊन येईल आणि मुले जीवनातील हे अत्यावश्यक कौशल्यही आत्मसात करून घेतील. एखादी नवीन पाककृती एकत्रितपणे बनवा किंवा त्यांना त्यांचे आवडते पदार्थ बनवायला शिकवा. कधीतरी बार्बेक्युचेही आयोजन करा; म्हणजे सर्वजण भोजन बनवू शकतील आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वादही घेऊ शकतील.

२. परिवार म्हणून एकत्रितपणे जेवा.

जरी सगळेच आपापल्या कामात व्यग्र असले आणि सक्त वेळापत्रके असली, तरी एक परिवार म्हणून रात्री एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाचा दिवस कसा गेला, याविषयी गप्पागोष्टी करा. कोणतीही एक रात्र (उदा. रविवारची रात्र) ही परिवारासाठीची रात्र म्हणून ठरवून घ्या. असे करण्याने तुम्हाला एकदुसऱ्यांच्या जगण्यातील घडामोडींची कल्पना येईल आणि तसेच एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आणि सहनशीलता ठेवण्यात मदत होईल.

३.एकमेकांना टिपणे आणि पत्रे लिहा.

आपल्या कुटुंबाप्रति असणारे प्रेम व्यक्त करणेसुद्धा महत्त्वाचे असते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या वाढदिवशी किंवा त्यांच्या लग्नाच्या वर्धापनदिनी किंवा त्यांच्या महत्त्वाच्या विशेष दिनी त्यांना टिपणे किंवा पत्रे लिहा; आणि ते तुमच्यासाठी किती खास आहेत आणि ते तुमच्या आयुष्यात असण्याने तुम्ही किती भाग्यवान आहात, हे त्यांना कळवा. किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी वा जोडीदारासाठी फक्त छोटेसे सुंदर पत्र लिहून त्यांच्या बॅकपॅकमध्ये वा वहीमध्ये डकवू शकता आणि तुमचे त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करु शकता.

४.एकमेकांना आधार द्या.

कुटुंबातील प्रत्येकजण कोणत्यातरी कृतीमध्ये खास असतो अथवा त्यांच्याकडे कोणतीतरी प्रतिभा असतेच! तुमच्या मुलांच्या चित्रकलेच्या किंवा नृत्यकलेच्या किंवा फुटबॉल गेमच्या क्लासला जाण्यासाठी विशेष वेळ काढा. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात परिवार त्यांच्यासोबत आहे, याची त्यांना जाणीव करुन द्या. मग बाकी कुटुंबातील सदस्यदेखील त्यांचा आधार देऊ करतील आणि हे तुम्हाला कुटुंबासोबतचा एकत्रित विशेष वेळ घालवायलादेखील संधी देईल.

५.प्रत्येकजण आपापली मते मांडू शकतात.

जरी कुटुंबात फक्त एकच प्रमुख व्यक्ती असते, जिचा शब्द हा अंतिम मानला जातो; तरी याचा अर्थ असा नव्हे की बाकी सदस्यांना त्यांची मते व्यक्त करण्याचा अधिकार असू शकत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे स्वतःचे वेगळे मत असू शकते आणि त्यांना ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. यामुळे कुटुंबातील वातावरणही एकोप्याचे राहते आणि मुलांनाही आपली मने मोकळी करण्याचा आत्मविश्वास लाभतो. तसेच, जर मुलांची मते विचारात घेतली गेली; तर त्यांनादेखील कुटुंबातील घडामोडींना हातभार लावण्यात आनंद वाटेल!

६.एकत्र चित्रपट पाहा.

कुटुंबातील प्रत्येकालाच आवडेल, असा एक चित्रपट निवडा आणि एकत्रितपणे त्याचा आनंद घ्या. तसेच चित्रपट पाहताना आस्वाद घेता येईल, असे मुलांना आवडणारे खाद्यपदार्थ बनवून ठेवा. एक दिवस निश्चित करा, म्हणजे सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहतील. चित्रपट पाहणे हा परिवाराशी जिव्हाळा वाढवण्यासाठीचा आणि तसेच करमणुकीचाही एक अद्भुत मार्ग आहेच!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon