Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

प्रवास करताना बाळांसाठी कोणत्या प्रकारेच पदार्थ बरोबर घ्यावेत

आम्ही तुम्हाला भारतामध्ये प्रवास करतानासाठीच्या अद्भुत अशा बेबी फूडची यादी देत आहोत; जे तुम्हाला नक्कीच सुपर मॉम बनवेल! तुमच्याकडे या रेसिपी असल्यावर तुम्ही निश्चिंतपणे पुरी दुनिया किंवा तुम्हाला हव्या त्या जागेची सफर करू शकता. तर मग चला, सुरुवात करुयात!

सेरेलेक

हे पॅकेज्ड किंवा घरगुती असू शकते. कोणत्याही प्रकारचे सेरेलेक हे आरोग्यदायी चविष्ट आणि पोषक असते आणि लगेच तयार करता येते.

हे तयार करण्यासाठी दोन-तीन चमचे सेरेलेक पावडर योग्य प्रमाणातील कोमट दुधात मिसळा, जे सहजपणे थर्मास फ्लास्कमध्ये नेता येईल. आणि तुमची रेसिपी तयार! पॅकेज्ड किंवा घरगुती सेरेलेक हे पोषकद्रव्यांचा उत्तम स्त्रोत तर असतेच; शिवाय ते बाळाची भूक दीर्घकाळपर्यंत शमवून ठेवते. त्यामुळे त्याला नेहमीच नाश्त्याचे पदार्थ द्यायची गरज भासत नाही.

फ्रूट प्युरी

बाळासाठी खाद्यपदार्थ म्हणून अनेक मातांची फ्रुट प्युरीला सर्वाधिक पसंती असते. ते भरपूर पोषक, बनवण्यास सोपे आणि पचण्यास सुलभ असतात. ते आवश्यक विटामिन आणि मिनरल्सनी युक्त असतात आणि बाहेर नेण्यासाठी ते उत्कृष्ट पर्याय आहेत.

ऍपल प्युरी, मँगो प्युरी आणि बनाना प्युरी हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. कोणत्याही प्रकारची प्युरी बनवण्यासाठी तुम्हाला एक फळ आणि एका चमच्याची गरज असते. चमच्याने फळाला एका स्वच्छ वाटीमध्ये कापा. तुम्ही त्यामध्ये कोमट दूध मिसळू शकता; म्हणजे तुमच्या बाळाला ते गिळण्यास सोपे राहील.

प्युरीमुळे तुमच्या बाळाला आवश्यक पोषकद्रव्ये मिळण्याची शाश्वती राहते; तसेच ते लगेच तयार करता येतात आणि प्रवासात नेण्यासाठीही योग्य असतात.

फॉर्म्युला मिल्क/ आईचे दूध

दूध हे शिशुंसाठी आणि प्रौढांसाठीदेखील आरोग्यदायी असते. ते परिपूर्ण आहाराची भूमिका बजावते; कारण ते विविध पोषकद्रव्यांनी युक्‍त असते. म्हणून घराबाहेर निघताना दूध सोबत घेणे साहजिकच आहे.

प्रवास करताना स्तनपान हा पहिला पर्याय म्हणून आपल्यासमोर येतो. हे सर्वांत सोपे आहे आणि कुठेही करता येते; तथापि काहींना सार्वजनिक ठिकाणी हे अस्वस्थ करणारे वाटू शकते. अशावेळी तुम्ही ब्रेस्ट पंपचा वापर करू शकता. हे तुम्हाला पहिल्यांदाच दूध काढून ठेवण्यास आणि नंतर कधीही वापरण्यास मदत करते.

जर स्तनपान शक्य नसेल; तर फॉर्म्युला मिल्क हा योग्य पर्याय आहे. हे पाण्यात योग्य प्रमाणात पावडर मिसळून तयार करता येते. येथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे फॉर्म्युला मिल्कमध्ये कॅसीन नावाचे प्रथिन असते, जे पचण्यास वेळ घेते; म्हणून हे दूध पाजलेल्या बाळांचा दुध पिण्यामधील कालावधी मोठा असतो. शेवटी ही निवड तुमच्यावर येते; म्हणजे तुम्हाला तुमचे दूध निवडायचे आहे की, फॉर्म्युला मिल्क! तुम्ही काहीही निवडा; दूध हे तुमच्या बाळाच्या आहाराचा अविभाज्य घटक असला पाहिजे. आणि म्हणून प्रवासात तुमच्या बरोबर दूध घेणे अतिशय गरजेचे आहे.

पॉरीज/पेज 

पॉरीज हा अजून एक पर्याय आहे, जे प्रवासात नेण्यास सुलभ आहे. तुमच्या बाळाला नियमित पॉरीज पाजल्याने त्याला भरपूर पोषकद्रव्ये लाभतात. ते तंतुमय पदार्थांनी युक्त असून, त्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, लोह, झिंक, अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी आणि इ देखील असतात. या अशा अनेक पोषकद्रव्यांमुळे ते रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास आणि रोगांविरुद्ध लढण्यास मदत करते.

यामध्ये राइस पॉरीज, ओट पॉरीज, व्हीट पॉरीज हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

पॉरीज बनवण्यासाठी

थोडे तांदूळ योग्य प्रमाणातील पाण्यात उकळा. सफरचंद किंवा केळे यांसारखी फळे कापून लगेच मिसळा आणि त्याला साधारण पंधरा मिनिटे शिजवा.

शिजवणे बंद करा आणि मिश्रण योग्यपणे ढवळा. गाळ राहणार नाही याची काळजी घ्या.

तुमचे पॉरीज आता खाण्यायोग्य आहे.

ते आता थंड झाल्यावर एका पात्रामध्ये ठेवा.

पॉरीज हे कुठेही नेता येऊ शकते. ते भरपूर पोषक तर आहेच; शिवाय ते सहजपणे तयार करण्याजोगे आणि चविष्ट असतात. ते बाळासाठी परिपूर्ण आहाराचे कार्य करतात.

ओटमील

बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर त्याच्या आहारात ओटमील समाविष्ट करता येऊ शकते. ते तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि कॅल्शियमने युक्त असतात आणि बाळासाठी योग्य आहाराची भूमिका बजावतात. एका प्रयोगानुसार बाळांना तांदळापेक्षा ओटमील जास्त आवडते; म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की, बाळाने भरपूर खावे; तर त्यांचे आवडते ओटमील प्रवासात नेण्यास विसरू नका!

हे ओटमील तुम्ही पुढीलप्रमाणे तयार करू शकता:

पाणी किंवा तुमचे दूध एका भांड्यामध्ये उकळा.

त्यात ओटमील पावडर मिसळा आणि सतत घुसळा.( आंबट फळे दुधात मिसळू नये )

हवे तर त्यात कापलेली फळे तुम्ही मिसळू शकता.

तुमचे ओटमील तयार आहे. त्याला थंड होऊ द्या आणि मग ते तयार करा. तसेच ओटमील हे सेरेलेक किंवा पॉरीजबरोबर अधिक पोषणासाठी मिसळता येते.

ओट्स हे अत्यंत आरोग्यदायीच आहे, असे नाही; तर ते बाळाला भरपूर वेळासाठी भूकरहितही ठेवू शकते. ते बनवायला अत्यंत सोपे आहे आणि लगेच बनवता येते. म्हणून ते प्रवासात नेण्यासाठीच्या सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे.

खिचडी

पारंपरिक भारतीय खिचडीपेक्षा तुमच्या बाळासाठी अजून काय आरोग्यदायी असू शकते? हे बाळासाठी सर्वोत्तम आहारांपैकी एक आहे आणि ते पोषक तसेच चविष्टही आहे! यामध्ये विविध भाज्यांची पोषकद्रव्ये असतात; म्हणून तुम्ही निश्चिंत राहू शकता.

सूचना - हे पदार्थ ६ पेक्षा जास्त महिन्यांच्या बाळांनाच  द्यावेत तसेच त्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon