Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

परफेक्ट आई होण्यात तुम्हाला येणारा मानसिक थकवा


 प्रत्येकाला आयुष्यात एका तरी गोष्टीमध्ये परफेक्ट व्हावं असे वाटते आणि ही गोष्ट नैसर्गिक आहे. पण जेव्हा जॉब, रिलेशनशिप, बॅंक बॅंलन्स, शरीर, मुलबाळ या सर्वच गोष्टींचा विचार करायला लागतो, तेव्हा या परफेक्ट होण्याच्या गोष्टीचे आपल्यावर प्रचंड दडपण येते. त्याचा आपल्या रिलेशनशिपवरच नाही, तर आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. त्याच गोष्टी आपण ह्या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.

१) लहान मुलांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत असतात. त्यांना आपल्याला आईने नेहमी विचाराव, आपल्याशी गप्पा माराव्या, खेळाव्या असं वाटतं, मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना आईने आपल्याला बाहेर खेळायला घेवून जावे असे वाटते. त्यांच्या जेवणापासून, झोप, खेळ या सर्वच बाबतीत आई त्यांची काळजी घेते.

२) पण या सर्व गडबडीत आईला तिच्यासाठी वेळच मिळत नाही. परफेक्ट आई बनण्याच्या नादात आईला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यांचा त्यांच्यावर मानसिक परिणामही होतो.

३) जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या गरजांविषयी संवदेनशील असता, त्या गरजा पुरवता आणि मुलांना स्वतंत्र बनवता तेव्हा उत्तमप्रकारे पालकत्व पार पाडता.

४) सोशल मीडियामुळेही बऱ्याचवेळा पालकांत उत्तम पालक बनण्याची स्पर्धा निर्माण होते. त्यातून अनेकवेळा परिपूर्ण पालक कसे असावे याचे मापदंड तयार होतात. पालकही आंधळेपणाने त्यानुसार पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात.

५) एक पालक म्हणून आपल्याला आपल्या उणिवा कळू शकतात. त्यामुळे बाहेरील लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुम्ही तुमच्या परीने पालकत्वाची जबाबदारी पार पाडा. तुम्ही तुमच्या मुलावर किती प्रेम करता हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इतर तुम्हाला काय म्हणतील याचा विचार न करता, एक उत्तम आई बनण्याचा प्रयत्न करा.

६) तुम्ही मुलांची जबाबदारी पार पाडताना किती परफेक्ट आहात हे महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा तुम्ही किती आनंदी आणि आरोग्यदायी आहात हे तुमच्या मुलासाठी अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे तणावमुक्त आणि चिंताग्रस्त राहण्यापेक्षा तुमचं पालकत्व नेहमी आनंददायी आणि अविस्मरणीय बनवायचा प्रयत्न करा.      

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon