Link copied!
Sign in / Sign up
23
Shares

पाण्यात (वॉटर बर्थ) म्हणजे काय ? आपल्याकडे असे कुणी करते का ?


कोणत्याही स्त्रीसाठी बाळाला जन्म देण्याचा आनंद अतुलनीय असतो. सध्याचे जन्म देण्याचे उपलब्ध असलेले विविध पर्याय पाहता, प्रसूतीवेळचा ताण आणि वेदना या बाबी नियंत्रणात ठेवल्या जाऊ शकतात; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असाच एक जन्म देण्याचा पर्याय जो आजकाल खूप प्रसिद्ध होत चालला आहे; तो म्हणजे वॉटर बर्थ होय!

वॉटर बर्थ (पाण्यात जन्म देणे) म्हणजे काय?

       नावाप्रमाणेच ही एक गरम पाण्याच्या छोट्या टब वा पूलमध्ये जन्म देण्याची प्रक्रिया आहे. एकतर तुम्ही प्रसूतीवेदनांवेळी पाण्यात राहू शकता आणि प्रसूतीवेळी बाहेर येऊ शकता; अथवा प्रसूतीवेळीदेखील तुम्ही पाण्यातच राहू शकता. या वॉटर बर्थमागील प्रमुख हेतू म्हणजे; तुमचे शिशु अगोदरच 'ऍम्निओटीक' द्रव पदार्थाच्या पिशवीमध्ये नऊ महिने राहिलेले असते. म्हणून त्यासारख्या वातावरणामध्ये जन्म देणे हे बाळासाठी चांगले तर ठरतेच; शिवाय तुम्हालाही सुसह्य पडते.

वॉटर बर्थ हे घरी, एका प्रसूतीगृहामध्ये वा एखाद्या इस्पितळातदेखील होऊ शकते; आणि ते एका आरोग्यतज्ज्ञाच्या देखरेखीखालीच व्हायला हवे. जरी भरपूर सुईणी आणि प्रसूतीशास्त्रज्ञ वॉटर बर्थच्या फायद्यांविषयी सांगत असतात; तरी अनेक डॉक्टर्स या पद्धतीच्या यशाबद्दल साशंक आहेत. तर चला, वॉटर बर्थच्या फायदे आणि संभाव्य धोक्यांविषयी जाणून घेऊयात; म्हणजे तुम्ही आणि तुमचे डॉक्टर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतील.

वॉटर बर्थचे आई आणि शिशूसाठी कोणते फायदे आहेत?

- जन्माच्या वेळी जलीय वातावरण हे तुमच्या बाळासाठी जास्त ओळखीचे आणि स्वागतपूर्ण असते; कारण पाण्यात राहण्याची भावना त्याच्यासाठी नेहमीचीच असते. याचे कारण म्हणजे गर्भार काळामध्ये बाळाची वाढ ऍम्निओटीक द्रव पदार्थाच्या पिशवीमध्येच होते.

- उबदार पाणी हे सुखदायक असते आणि ते जन्माच्या तणावपूर्ण परिस्थितीत तुम्हाला आराम देते.

- जेव्हा तुम्ही प्रसूतिवेदनांवेळी पाण्यात असता; तेव्हा तुमच्यात कोर्टीसॉल, नॉरॅड्रेनेलिन आणि कॅटेकोलॅमाईन्स यांसारखी तणाव संप्रेरके कमी प्रमाणात निर्माण होतील; जी तुमच्या बाळावर वाईट परिणाम करू शकतात. तसेच पाणी हे एन्डॉर्फिन्स सारख्या नैसर्गिक वेदनानिवारकांच्या उत्सर्गास प्रेरणा देते.

- पाण्याच्या गुरुत्वविरोधक शक्तीमुळे तुम्हाला स्वतःचे वजन जाणवणार नाही. परिणामी, प्रसूतिवेदना होताना तुम्हाला वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये राहण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

- पाण्यामध्ये तुमच्या रक्तप्रवाहामध्ये प्रचंड सुधारणा होते. त्यामुळे आकुंचन सोपे होते आणि तुमच्या बाळाकडे भरपुर रक्तप्रवाह पुरवणे सुलभ होते. जसे तुमच्या रक्तप्रवाहात वाढ होते; तसेच तुमच्यात प्रसूतीवेदनांचा सामना करण्याचे भरपूर सामर्थ्यही येते.

वॉटर बर्थचे आई आणि शिशुसाठी संभाव्य धोके कोणते आहेत?

- प्रथमतः पाणी तुमच्या रक्त प्रवाहामध्ये शिरण्याची शक्यता बळावते. यामुळे तुमच्या बाळाला संसर्गदेखील होऊ शकतो.

- वॉटर बर्थच्या वेळी तुमच्या बाळाचे तापमान खूप जास्त वा खूप कमी होण्याची देखील भरपूर शक्यता असते.

- तुमचे बाळ बर्थ कॅनलमध्येच असताना जर नाळ तुटली गेली; तर ते श्वास घ्यायचा प्रयत्न करू शकते आणि त्याला पाण्यातच श्वास घ्यावा लागू शकतो.

- जर आणीबाणीची परिस्थिती असेल; तर तुम्हाला पूलमधून बाहेर काढणे आणि बेड अथवा प्रसूतीकक्षात नेण्यामध्ये मौल्यवान वेळ जाऊ शकतो; जे नंतर तुम्ही आणि तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरू शकते.

- अंतिमतः जर तुमचे बाळ काळजीपूर्वक उचलले वा हाताळले गेले नाही; तर नाळ अकस्मात तुटू शकते. वॉटर बर्थ हे तुमच्या डॉक्टरांना तुमचे बाळ हाताळण्यासाठी खरोखर अवघड ठरू शकते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon