Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते का ?

१.पाणी आणि तुमचे वजन.

आपल्याला माहीतच आहे की शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते. मानवी शरीरातला सगळ्यात मोठा भाग हा पाण्याने बनलेला आहे. शरीरात पाण्याची पातळी गरजेनुसार ठेवणे महत्वाचे असते. तुमचे वजन आणि तुमच्या शरीरातील पाणी या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षणातील एक ग्रुपने २००९ ते २०१२ मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की वय वर्षे १८ ते ६४ मधील व्यक्तींमध्ये शरीरातील हायड्रेशनची कमतरता आणि वाढते वजन व BMI (Body Mass Index) यांचा सरळ संबंध आहे. या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात समोर आलेल्या पुराव्यांमध्ये असे सिद्ध होते की शरीरातील पाण्याचा वजन नियंत्रणावर परिणाम होतो.

२. जास्त पाणी प्या, जास्त वजन घटवा.

संशोधानाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जे वजन कमी करण्याचा प्रयत्नात आहेत त्यांचे वजन पाणी मुबलक प्रमाणात पिल्यास लवकर कमी होऊ शकते. हे संशोधन मोठ्या प्रमाणावर केले गेले नसले तरीही पाणी पिल्याने फायदाच होतो हे मात्र खरे. गरजेपेक्षा जास्त वजन असणाऱ्या आणि डाएट करणाऱ्या स्त्रियांवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, या स्त्रियांची दैनंदिन हालचाल आणि पोषण यांचे मायने न ठेवता, पाणी मुबलक पिल्याने त्यांच्या वजनात घट झाली. यात त्यांच्या शरीरातील मेदाचे प्रमाण देखील घटल्याचे आढळून आले.

३. पाणी तुमच्या कॅलरीजचे सेवन कमी करते.

तुमच्या शरीराला उर्जेसाठी लागणाऱ्या कॅलरीज या अन्नाद्वारे मिळत असतात. पाण्यात कॅलरीज नसतात. जेवणाच्या आधी पाणी पिल्याने जेवतांना शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचे प्रमाणही कमी होते. काही मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांवर केलेल्या प्रयोगात त्यांना दिवसातले सगळ्यात जास्त कॅलरीज असणारे जेवण घेण्यापूर्वी ५०० मिली पाणी पिण्यास सांगितले. यात त्यांच्या वजनात लक्षणीय घट दिसून आली. यामागील कारण पाणी पिल्यामुळे जेवणाचे प्रमाण कमी झाले आणि गरजेपुरते जेवण घेतले गेले.

४. ताजे-तवान करणारा पाण्याचा एक ग्लास.

जेंव्हा तहान असते तेंव्हा पाणीच प्या. पाणी ज्या पद्धतीने तुमच्या पेशींना हायड्रेट ठेवते तसे इतर कोल्डड्रिंक नाही ठेवू शकत. पाणी मुबलक प्रमाणात असल्यास मन ताजे राहते, कंटाळा आणि त्यामुळे झोप येत नाही. जेंव्हा तुम्ही सोडा किंवा शुगरी ड्रिंक्सपेक्षा पाणी प्याल तेव्हा तुमचे वजन कमी होण्यास आपोआपच मदत होईल.

५. व्यायाम आणि पाणी.

अनेकदा व्यायाम करतांना काही लोक पाणी कमी पितात. जर तुमच्या शरीराला व्यायामाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर पाणी जरूर प्या. व्यायाम करण्याआधी पाणी प्या आणि मधून मधून तहान लागल्यास घोट-घोट पाणी पीत रहा. शरीर हायड्रेटेड असल्यास व्यायामाचा परिणाम लवकर होतो.

६. चयापचय क्रिया सुधारते.

पाणी पिल्याने शरीरातील अन्न पचवण्याची प्रक्रिया सुधारते. यास चयापचय क्रिया असे म्हणतात. ही क्रिया सुधारित असेल तर वजन वाढत नाही. एका अभ्यासात असे समोर आले की अर्धा लिटर पाणी पिल्यास शरीरातील चयापचय 30% ने वाढते. ही वाह पाणी पिण्याच्या १० मिनिटात होते आणि ३०-४० मिनिटात ती सर्वाधिक होते.

पुरुषांचे शरीर लिपीड वापरते तर स्त्रियांचे शरीर कार्ब म्हणजे पिष्टमय पदार्थांचा वापर करून चयापचय क्रिया संतुलित ठेवते. यामुळे शरीरातील पाण्याचे तापमान २२ डिग्री (रूमचे तापमान) वरून ३७ डिग्री ( मानवी शरीराचे तापमान) करण्यासाठी अंतर्गत चयापचय क्रिया वेगाने होते. त्यामुळे पाणी पिणे तुमच्या पचनासाठी मदत करते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon