Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

पाळीव प्राणी बालकांचे चांगले साथीदार असतात !!

      चांगल्या कारणांसाठी मुलांना पाळीव प्राण्यांविषयी प्रेम असते. प्राणी लहान असो किंवा मोठा तो आनंद देणे शिकवतात आणि विशेष अशी मैत्रीची साथ देतात. पाळीव प्राणी लहानग्यांचे फक्त चांगले मित्र होतात असे नाहीतर एखाद्या भावंडासारखे रहातात. मुलांना जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा हे प्राणी त्यांच्याबरोबर राहातात आणि कोणत्याही क्षणी, कोणत्याही टप्प्यावर ते मुलांची साथ देतात.

पाळीव प्राणी हे निरागसतेचे प्रतीक असतात. लहानग्यांसाठी ते सुयोग्य साथीदार आणि मुलांच्या खेळातील भागीदार असतात. पाळीव प्राणी आपल्या लहानग्यांबरोबर मोठे होतात आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करतात आणि कोणत्याही सुख दुःखात त्यांच्याबरोबर असतात. एखाद्या वाईट काळात किंवा संकटसमयी हेच प्राणी मनोबल कायम ठेवता आणि या जगात फक्त तुमच्यासाठी म्हणून कोणीतरी जगते आहे. खूप प्राण्यांनी बाळांची संकटात असताना मदत केली आहे. हे तुम्ही बऱ्याच विडिओ मध्ये पाहिले असेलच. 

पाळीव प्राणी का असायला हवेत त्याची काही योग्यच कारणे पाहूया.

१)  शिकण्यासाठी मदत 

मुले जेव्हा वाचायला शिकतात तेव्हा त्यांना कुणाला तरी ते सर्व वाचून दाखवावेसे वाटत असते. मग पाळीव प्राणी त्या कुणाचा तरी जागा घेतात. लहान मुले वाचत असताना त्यांच्या पाठीवर थोपटू शकतात, त्यांना प्रश्न विचारू शकतात, त्यांना चित्र दाखवू शकतात. जी मुले विकासात्मकतेच्या दृष्टीने दिव्यांग असतात त्यांना शिकण्यासाठी चिकित्सेसाठी प्राणी (बहुतेकदा कुत्रेच) शाळेत आणता येते हे शिक्षणतज्ज्ञांना खूप काळापासून माहित आहे. यामुळे या एक दीर्घकालीन अनुबंध तयार होतो आणि पाळीव प्राणी आणि मुलांमध्ये एक समज निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळतेच परंतू मुलांमध्ये शिकण्याची सवय बिंबवते.

२) पाळीव प्राणी दिलासा देतात 

प्राणी हे दिलासा देऊ करणारे स्रोत आहेत. मुलांना जेव्हा राग येतो, दुःख होते, भीती वाटते किंवा भावनिकदृष्ट्या जेव्हा ते अस्थिर होतात किंवा त्यांना एखादे गुपित सांगायचे असते तेव्हा पाठिंबा मिळवण्यासाठी पाळीव प्राणी साथदाराकडे जातात. तसेच ज्या मुलांसोबत पाळीव प्राणी असतात ती मुले खूप जास्त चिंताक्रांत नसतात.

३)  मुले तंदुरुस्त राहातात 

बागेमध्ये जाऊन पाळीव कुत्र्याबरोबर खेळणे किंवा मांजरी मागे पळणे या सगळ्या गोष्टींमुळे रोजच्या रोज मुलांना गरजेच्या असणाऱ्या मैदानावर होणाऱ्या शारिरीत हालचाली घडून येतात. दोन किंवा अधिक कुत्रे किंवा मांजरे यांच्या संपर्कात जी मुले असतात त्यांना सर्वसाधारण संसर्गाची बाधा होत नसल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यामागचा सिद्धांत हाच की जेव्हा मुले कुत्रा किंवा मांजर यांच्याबरोबर खेळतात तेव्हा ते प्राणी मुलांना चाटतात त्यामुळे प्राण्यांच्या तोंडातील जीवाणू मुलाकडे पाठवले जातात आणि या जीवाणूंमुळे इतर संसर्गांना तोंड देण्यासाठी मुलांच्या प्रतिकार क्षमतेत काही बदल होऊ शकतो.

 

४) पाळीव प्राण्यांचा कौटुंबिक जिव्हाळा

बऱ्याचदा प्राण्यांमुळे कुटुंबातील सदस्य जवळ येतात. कोणताही प्राणी घरी आणल्यानतंर तो कुटुंबाचा सदस्य बनतो. तो कौटुंबिक हालचालींचे एक केंद्रही होतो तसेच त्याच्या दिनक्रमात म्हणजे फिरायला जाणे, स्वच्छता आणि खाणेपिणे यात सहभागी होण्यातही कुटुंबियांना आनंद होत असतो.

अगदी मांजर स्वतःच आपली शेपटी पकडण्याचा प्रयत्न करते किंवा फिश टँकमधील माश्यांच्या मागे लागते हे पाहण्याचेही फायदे होतात. आपल्या तणावपूर्ण व्यग्र आयुष्यात प्राण्यांच्या या हालचाली पाहिल्या की आपल्याला आराम मिळतो आणि शांतपणा मिळतो. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon