Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

या प्रकारे पाळीव प्राणी तुमच्या मुलांचे जीवन समृद्ध करू शकतात.

पाळीव प्राणी घरी असणे हे खूप प्रकारे उपयोगी आहे. ते खूप गोंडस असतात, आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, आपल्याशी खेळतात आणि जेंव्हा तणाव घालवायचा असतो तेंव्हा आपण त्यांच्याकडेच जातो. तुम्ही तुमचा ऑफिसमधला कामाचा ताण आणि तुमच्या बॉसचे नखरे सुद्धा त्यांना सांगू शकता, पण जोपर्यंत त्यांनातुम्ही खायला देत आहात तोपर्यंतच! हे प्राणी मुक्याने आपल्यावर प्रेम करतात आणि अजिबात जजमेंट करत नाहीत. त्यांचा सहवास म्हणजे आपल्यासाठी एक भेटवस्तू ठरावी इतका निर्मळ असतो.

आपल्यासाठी हे प्राणी जितके उपयोगी असतात तितकेच उपयोगी ते आपल्या मुलांसाठी देखील ठरतात. तुम्हाला मुलांसाठी कोणता प्राणी पाळायचा आहे ते महत्वाचे नाही, तुम्हाला हवा तो प्राणी तुम्ही तुमच्या लहानग्यांसाठी पाळू शकता. जसे की, कुत्रा, मनीमाऊ, हॅमस्टर, कासव किंवा अगदी मासे सुद्धा लहान मुलांना खूप काही शिकवू शकतात.

घरात पाळीव प्राणी असण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एक पेट घरी आणण्याचा विचार कराल अशी आम्हाला खात्री आहे.

१. सहजता.

मुलांना इतर मुलांशी कनेक्ट होणे गरजेचे असते. त्यांच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीकडे सुद्धा पाळीव प्राणी असेल तर त्या निमित्ताने मुले बोलतात, खेळतात. समोरच्या व्यक्तीशी कसे सहज सामावून घेता येईल हे प्राणी त्यांना शिकवतात. मुलांच्या सामाजिक जीवनात हा गुण त्यांना खूप उपयोगात येऊ शकतो. पाळीव प्राणी असणे मुलांना इतर जीवांविषयी दयाळू बनवते. मुलांमध्ये जीव लावण्याची वृत्ती येते. इतर प्राणी आणि माणसे यांबाबत देखील ते विचारपूर्वक वागू लागतात.

२. शिकणे मजेशीर होते.

लहान मुलांना एका जागी बसून अभ्यास करायला किंवा वाचायला लावले तर ते ऐकत नाहीत. मुलांना सतत कोणाचातरी सहवास हवा असतो. लहान मुले सहसा एकटे राहणे पसंत करत नाहीत. त्यांच्या जवळच्या गोष्टी, मनातले विचार कोणासोबत तरी मांडणे त्यांना आवडते. तेंव्हा एकटे बसण्याऐवजी त्यांना आपण एखादे पुस्तक किंवा कथा त्यांच्या पाळीव प्राण्याला वाचून दाखव असे सांगितले तर मुलांना आनंदच होईल. मुले हौशीने ही गोष्ट करतील. शिकतांना मजा देखील आल्यास मुले लवकर आत्मसात करतात.

३. जबाबदारीची जाणीव.

मुलांना त्यांच्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायला लावा. त्यांच्याकडच्या कुत्रा किंवा मांजर यांच्याकडे लक्ष ठेवून तुम्ही घरी नसतांना त्यांची काळजी घेण्याचे काम मुलांवर सोपवा. अशाने त्यांच्यात एक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यांना जेऊ कधी घालायचे, पाणी कधी द्यायचे, त्यांनी घाण केल्यावर ती आवरून घेणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे अशी कामे तुमच्या मुलांना सांगा, यातून त्यांच्यामध्ये एक सजगता राहील आणि हा प्राणी आपल्या एखाद्या जवळच्या गोष्टीप्रमाणेच आपली जबाबदारी आहे हे त्यांना उमजेल.

४. परिवाराला जवळ आणते.

मुके प्राणी घरातल्या सगळ्यांनाच आपला लळा लावतात. एकटे मूल असेल तर त्याच्यासाठी घरातला पाळीव प्राणी जणू काही लहान भाऊ किंवा बहिणीसारखाच असतो. घरातले सगळेजण या प्राण्याच्या देखभालीसाठी हातभार लावतात. घरातल्या सगळ्यांवर तो सारखेच प्रेम करतो. काही काळानंतर तर तुमच्या घातल्या फॅमिली फोटोत सुद्धा हा प्राणी सामावला जातो. परिवाराचा एक सदस्य बनतो. सगळ्यांना एकजूट ठेवण्यासाठी घरात एक पाळीव प्राणी असणे खूप महत्वाचे ठरते. घातले सदस्य कितीही व्यग्र असले तरी याच्यासाठी वेळ काढतातच. कुटुंब जवळ ठेवण्यासाठी एक प्राणी तर पाळायलाच हवा.

५. आरोग्य सुधारते.

अनेकदा, पालक असा विचार करतात की या काही पाळीव प्राण्यांपासून जर लहान मुलांना काही अॅलेर्जी किंवा संसर्ग झाला तर ? यावर एका संशोधनाने असे म्हटले आहे की, मुलांना जितक्या लवकर प्राण्यांचा सहवास मिळतो तितक्या कमी संधी असतात की त्यांना मोठेपणी कोणत्या प्रकारच्या अॅलेर्जी होतील. तेंव्हा जर आरोग्याची भीती तुमच्या मनात असल्यामुळे तुम्ही प्राणी पाळला नसेल तर ही भीती मनातून काढून टाका.

मुलांना लहानपणीच निस्वार्थ प्रेम करण्याची आणि प्रेम घेण्याची संधी मिळाल्यास ते समाजात एक उत्तम व्यक्ती म्हणून वाढतील. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon