Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

पालकांसाठी १० महत्वाच्या गोष्टी


       लहान मुले बोलायला लागल्यावर त्यांना समजून घेण्यासाठी पालकांनी पालकत्वावर आधारित असणारी काही पुस्तके वाचायला हवीत. तसेच लहान मुलांच्या सवयी नियमित ठेवण्यासाठी एखादे वेळापत्रक तयार करायला हवे. त्यामध्ये त्यांच्या आहाराचे नियोजन, त्यांच्या झोपण्याचे, उठण्याचे नियोजन, स्वच्छते विषयीचे नियोजन, बाळाचे कपडे आणि खेळाबद्दलचे नियोजन वेळापत्रकाद्वारे करणे गरजेचे आहे. कारण, उज्वल भविष्यासाठी शिस्तबद्धपणा आणि खेळही महत्वाचे आहेत. तसेच पालकत्व हे भौतिक गोष्टी विकत घेण्यापेक्षा ही महत्त्वाचे आहे.

१. गुणवत्तपूर्ण वेळ

सध्या अनेक जोडपी आपापल्या कामात व्यस्त असतात. अनेकांची मुले ही संगोपनासाठी पाळणाघरात आहेत किंवा त्यांना सांभाळण्यासाठी दाई आहेत. आपण आपल्या मुलांसमवेत वेळ घालवू शकत नाही. हे, खरे असले तरी ही आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा, आपल्या मुलांसाठी काही वेळ देण्याचा प्रयत्न नक्की करा. जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवत असाल तेव्हा आपल्या मनावर आणि त्यांच्या आत्म्यज्ञानावर लक्ष केंद्रित करा. फक्त जबाबदारी म्हणून काही गोष्टी करु नका. अगदी मनापासून त्यांच्यासाठी वेळ द्या.

२.आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा

काही वेळेस विशिष्ट मुद्द्यांमुळे आपला गोंधळ होऊ शकतो. आपल्या मुलांची काही चूक किंवा दोष नसतानाही आपण त्यांच्यावर रागावू शकतो. काही ठराविक अपायकारक, विध्वंसक गोष्टी ओळखून आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. लहान मुलांना नकारात्मक गोष्टीं न सांगता, नेहमी सकारात्मक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नकारात्मक गोष्टींचा त्यांच्या मनाला स्पर्शही होणार नाही. तसेच त्यामुळे आपल्या भावनाही नियंत्रित राहतील.

३. मर्यादा ठरवून घ्या

काही वेळेला आपली मुलंही हट्टी आणि त्रासदायक असू शकतात. त्यामुळे सुरुवातीलाच काही नियम तयार करा. ते नियम त्यांच्याकडून न पाळले गेल्यास होणाऱ्या परिणामाबाबत त्यांना सूचना द्या. आपण जर आपल्या मुलांनी नियम पाळावेत अशी अपेक्षा करत असाल तर, आपल्यालाही त्यापैकी काही नियम पालक म्हणून पाळण्याची आवश्यकता आहे.

४. मुलांना टाळू नका

आपण असे समजतो की, आपण आपल्या मुलांपेक्षाही हुशार आहोत. त्यामुळे आपण संभाषण टाळतो. आपण लहान मुलांना टाळत असतो तेव्हा ते त्यांना चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे भविष्यात ते आपल्याला प्रश्न विचारण्या पासून वंचित राहतील. परिणामी मुलांना आवश्यक असणारी उत्तरे शोधण्यासाठी ते इतर वेगळ्या पर्यायांवर अवलंबून राहतील आणि तीच सवय त्यांना कायम राहील. त्यामुळे त्यांना कधीही टाळू नका.

५. त्यांना सांगा रडायला हरकत नाही

पालकांसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. की, जी कोणत्याही पुस्तकांमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार नाही. आपण आपल्या मुलांना कडक शिक्षा करतो त्यामुळे त्यांना असे वाटते. की, रडणे हे म्हणजे केवळ अपयशाचेच कारण आहे. समाजाने आपल्याला विश्वास दिला आहे. हा एक आपला गैरसमज आहे. प्रथम आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. लहान मुलेही रडण्याद्वारे आपल्या भावना व्यक्त करत असतात. त्यामुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त करू द्या.

६. हसणे आरोग्यदायक

पालकत्व हे सर्व प्रौढ आणि पालकत्व येण्यापूर्वीच करावयाची गोष्ट नाही. आपला लहान मुलांबरोबर हसत-खेळत राहण्यासाठी आणि आनंदी ठेवण्यासाठीच आहे. असे म्हटले जाते की, असल्यामुळे माणसाचे आयुष्य वाढते. आणि डोक्यावरील ताणही कमी होतो.आणि ते खरेही आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या पाल्यासोबत काही वेळ व्यतीत करत असताना नेहमी हसा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

७. मी पालक आहे

अनेक वेळा काही आई-वडील आपल्या लहान मुलावर आपले अधिकार आणि जबाबदाऱ्या लादतात. त्यामुळे त्यांच्यावर काही मर्यादा येतात. आपल्या मुलांबरोबर खुले वातावरण आणि मित्रत्वाचे नातेसंबंध टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच जेव्हा आपले काही चुकेल आपण चुकीचे असाल तेव्हा मोठ्या मनाने आपली चूक मान्य करा. मी पालक आहे. असे म्हणून पालकत्व गाजवण्याची काहीही आवश्यकता नसते. पालक म्हणून काही जबाबदाऱ्या मात्र पाळायला हव्यात.

८. शब्द हेच शस्त्र

लहान मुले त्यांच्या वाढीच्या वयात साध्या साध्या गोष्टीवरून चिडचिड करतात. त्यांचे रुसणे फुगणे ही चालू असते. कारण, त्यावेळी ती आपले वर रागवलेली असतात. त्यामुळे आपण त्यांना शिव्या न घालता त्यांना शांत करुन समजवणे आवश्यक आहे. साधारणपणे असे काही बाह्य कारणांमुळे होते. तुमच्यामुळे नाही. म्हणूनच आपण त्याच्या मागिल कारणे जबरदस्तीने शोधण्यापेक्षा त्यांची व्यवस्थित शांतपणे बोलून ती शोधावीत. आपल्या बोलण्याद्वारे काही शब्द वेडेवाकडे जाऊ शकतात. त्यामुळे शब्द आहे जपून वापरावेत.

९. लहान मुलांना खेळ उद्या

तुमची आवडती गोष्ट करत असताना अडथळा आला तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हालाही राग येईलच ना. त्याचप्रमाणे आपण आपली मुले जेव्हा खेळत असतात तेव्हा, अडथळा आणतो. त्या प्रसंगी त्यांनाही राग येणारच त्यामुळे, त्यांच्या कामात, खेळण्यात व्यत्यय आणू नका. त्यांना मुक्तपणे खेळ खेळू द्या.

१०. आत्मज्ञान आणि स्वयंशिस्त

काही पालक सोईस्कर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हवेत उडणारे पालक होऊ नका. आपल्या मुलांना ती वाढत असताना त्यांच्या स्वतःच्या गोष्टी स्वतःचं शिकू द्या. तसेच त्यांना त्यांची स्वतःची स्वयंशिस्त लावायला हरकत नाही. लहान मुलेही साधारणपणे जन्मापासूनच चंचल असतात. त्यामुळे लहान मुलेही लहानपणीच अनेक नवनवीन गोष्टी अगदी चटकन शिकतात.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon