Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

पालक उलगडताहेत पालकत्वाची गोड उद्दिष्टे !

              

बालपणी तुम्ही सर्व येणाऱ्या नवीन वर्षासाठी संकल्प करत असाल पण लग्न झाल्यानंतर याऐवजी तुम्ही पालकत्वाचे नवीन संकल्प करता.तुमच्या मुलाने कोणते महत्वाचे टप्पे गाठायला हवेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना आता वाढवता आहात,जी शिकवण देत आहात ते सर्व म्हणजे तुम्ही मुलांना एक चांगली व्यक्ती बनवण्याचे प्रयत्न असतात. काही पालकांनी ठरवलेले पालकत्वाचे संकल्प आम्ही तुमच्यासाठी येथे देत आहोत.   

१] व्यायामाला गमतीशीर खेळ बनवणे

बऱ्याच मुलांना उड्या मारणे,पळणे आणि सक्रिय रहाणे आवडते. यातून मुलांना दिवसभरात आवश्यक असणारा व्यायाम होतो.तरीही,काही मुलांना व्यायाम करणे आवडत नाही. अशा मुलांचे पालक व्यायामाला गंमतीशीर आणि मजेचा खेळ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतात जेणेकरून मुले यात सहभागी होतील.व्यायामाची सवय मुलांना नेहमीसाठी लागावी यासाठी काही काल्पनिक खेळ व्यायामासोबत जोडा यासोबतच तुम्हीही मुलांसोबत सहभागी व्हा ज्यामुळे मुलांना व्यायाम करण्यातील गंमत कळेल आणि ती नक्की यासाठी प्रयत्न करतील.

२] "नाही" म्हणायचे नाही

"नाही","हे करू नको",किंवा "ते करू नको" असे म्हणणे तुमच्या मुलांच्या आयुष्यात खूप नकारात्मकता आणतात.कारण यामुळे आपल्यात काही तरी कमतरता आहे किंवा आपण आई-बाबांना नाराज करू असे मुलांना वाटत राहते.काही पालकांनी असे नकारात्मक शब्द न वापरण्याचा संकल्प केला आहे. यासाठी,पालक मुले जे करत आहेत त्याऐवजी काय करता येईल याचा पर्याय सुचवतात.असे करण्याने मुलांना काय चांगले आहे हे कळते आणि त्याक्षणी मुले रागात असतील तर त्यांचे लक्ष विचलित करता येते.  

३] बालवर्गात टाकणे

वेगवेगळी संस्कृती असणारी मुले ज्या बालवर्गात असतील तिथे मुलांना दाखल करण्याचा एक कल पालकांमध्ये दिसून येतो. यामुळे मुलांना विविध प्रकारचे लोक आणि संस्कृती यांची ओळख होते,यातून मुले इतरांबद्दल सहानभूती आणि सहकार्य करणे शिकतात.बालवर्गात मुलांना खुप सारे  शिकवले जातात,जे खेळ मुले तुम्हाला शिकवतात आणि अशा नवनवीन खेळातून तुमचे आणि तुमच्या मुलाचे नाते अजून घट्ट बनते.

४] चित्र

तुमच्या फ्रिज आणि कपाटावर स्वतःची तीच जुनी चुंबक आणि पोस्टर्स चिकटवण्या ऐवजी काही पालक आपल्या मुलांच्या कलाकृतीला स्थान देत आहेत.घरात वेगवेगळ्या ठिकाणी मुलांनी बनवलेल्या कलाकृती लावून मुलांत दडलेल्या सुप्त कलाकाराला यातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो.मुलांचे कौतुक केले जात आहे आणि त्यांच्यातील कलागुण वाढीला लागावेत हे त्यांना समजते आणि स्वतःमधील सर्जनशीलता सुधारण्याची आणि व्यक्त करण्याची करण्याची संधीही मिळते.या गोष्टीतून घरातील वातावरण सकारात्मक बनते.

५] हस्तकला

मुले आणि तुमच्यातील नाते घट्ट करण्याचा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मुलांसोबत हस्तकलेच्या वस्तू जसे की ,दागिने बनवणे,बोटांचा वापर करून चित्र काढणे,भाज्यांचे ठसे काढणे. यातून तुमच्या मुलांना एक वेगळा अनुभव मिळेल आणि तुम्हालाही बालपणीचे दिवस परत आल्यासारखे वाटेल.हे करत आसताना होणारा पसारा आणि गंमतीचा आनंद घ्या!

६] पाककला

टीव्ही वर प्रसारित होणारा 'मास्टरशेफ' हा कार्यक्रम लोकप्रिय तुम्ही पहिलाच असेल तर मग असा छोटासा 'मास्टरशेफ' तुमच्या घरातही असू शकतो.मुलांमध्ये नवीन आवड उत्पन्न व्हावी यासाठी बेकिंग आणि काही साध्या पाककृती मध्ये मुलांना सहभागी करून घ्या.याने मुलांना एक नवीन अनुभव तर मिळतोच त्यासोबतच नवीन छंद ही वाढीस लागतात. जे पालक मुलांसोबत अशा गोष्टी करतात त्यांना माहित असेल कि जेव्हा ओव्हन मधून बेक झालेल्या कुकी बाहेर येतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर कित्ती गोड हास्य येते कारण यात त्यांच्याही मेहनतीचा वाटा असतो!

7] निवड करणे

फारसे कौतुक न केला जाणारा पण अनेक पालकांकडून केला जाणारा पालकत्वातील संकल्प म्हणजे दिवसभरात ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांची निवड मुलांनी स्वतः करणे. बाहेर कुठे फिरायला जायचे आहे किंवा कोणता पदार्थ ,हस्तकला करायची आहे किंवा सुट्टीत कुठे जायचे आहे अशा गोष्टींमध्ये मूलाच्या निवडीला प्राधान्य दिले जाते.घरातील निर्णयप्रक्रियेत मुलांना सामील केल्याने तीन गोष्टी साध्य होतात,पहिली म्हणजे-आपण घरातील महत्वाचे सदस्य आहोत आणि आपल्याला किंमत दिली जात आहे  हे मुलांना जाणवते,दुसरी गोष्ट म्हणजे-निवड केल्यास त्यांना मजा येणार आहे आणि न केल्यास तुम्हाला दोष देता येणार नाही आणि चिडताही येणार नाही,याची मुलांना खात्री पटते आणि तिसरी गोष्ट म्हणजे- निवड करण्यात तुम्ही मदत केल्यामुळे मुलांची निर्णयक्षमता आणि विचारप्रक्रिया यांना चालना मिळते.

८] सुट्टी एकत्र घालवणे

सामान्यतः कमी कौतुक केला जाणारा पालकत्वाचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे सर्वांनी  एकत्र सुट्टी घालवणे.सुट्टी का साजरी केली जाते याचे महत्व मुलांना समजावून सांगा. अशा सुट्टयांमधून मुलांमध्ये विविध संस्कृतींबद्दल चांगली समज येते आणि खूप काम केल्यानंतर लोक सुट्टी घेतात (मुलांना हे येणाऱ्या काही वर्षांनी कळेल!) याची जाणीव होते.मुलांसोबत वेळ घालवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण तुम्हाला मुलांसोबतचे नाते घट्ट करण्याची आणि तुमच्या आयुष्यात त्यांना सर्वांत जास्त प्राधान्य आहे दाखवण्याची संधी मिळते.

९] सामंजस्याने राहणे

पालकत्वाचे हे सर्वांत महत्वाचे उद्दिष्ट बऱ्याच पालकांना समजलेले असते ज्यामुळे पालकत्वाचे ध्येय साध्य करणे त्यांना शक्य होते.एखाद्या मुद्द्यावर तुम्हा दोघांत मतभेद असतील तर दोघांना मान्य असेल आणि समाधान मिळेल असा तडजोडीचा मार्ग स्वीकारा. केवळ तुम्ही पालक आहात आणि त्यांच्या पेक्षा मोठे आहात म्हणून मुलांना तुमचे म्हणणे ऐकायला भाग पाडू नका.



Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon