Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

तुम्ही तुमच्या मुलांवर अपेक्षांचा भार तर देत नाही ना?

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या मुल त्या स्पर्धेत टिकावे असे वाटत असते म्हणून. बरेच पालक यासाठी आपल्या मुलांना विविध क्लासेस ला पाठवतात, विविध स्पर्धामध्ये भाग घ्यायला लावतात. कधी-कधी मुलांच्या वयाच्या आणि क्षमतेच्यामानाने या गोष्टी अति होतात आणि मुलं आत्मविश्वास गमवून बसतात. तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच करत असता पण कधी-कधी या गोष्टींचे अपेक्षांत रूपांतर होते आणि आणि य अपेक्षांचा मुलांना भार होतो. पुढील काही लक्षणे दर्शवितात कि तुमच्या मुलांना तुमच्या अपेक्षांचा भार होत आहे आणि त्यामुळे ते त्रस्त आहेत.

१. मुलांची वाढती चीड-चीड

जर तुमचे मुल छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये चिडत असेल, थोडं मनाविरुद्ध झालं की रागवत असेल किंवा एखाद्या विषय काढला की वैतागत असेल तर याच अर्थ असा होतो. त्याला ती गोष्ट आवडत नाही किंवा जमत नाही. आणि ते त्याला तुम्हांला सांगता येत नसेल उदा- जर तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या खेळाच्या प्रशिक्षणालासाठी पाठवत असाल आणि मुलाला खेळामध्ये काही रस नसेल तर खेळाचा नाव काढताच तो/ ती चिडचिड करायला लागतात. तसेच काही मुलं अभ्यासात साधारण असतात त्यांची क्षमता तेवढीच असते पण पालक त्यांच्यावर ज्यादा अभ्यासाचा भार टाकतात आणि मग मुले अभ्यासाचं नाव काढताच चीड-चीड करायला सुरवात करतात.

२. अचानक भुकेचे तंत्र बिघडणे.

विनाकारण तुमचं निरोगी आणि व्यवस्थित जेवणारं मुल जर अचानक कमी जेवायला लागलं, जेवायला टाळायला लागलं आणि दमलेले वाटायला लागलं तर त्याच्या या भुकेचा तंत्र बिघडण्यामागे तुमच्या अपेक्षांचे ओझं हे एक मुख्य कारण असण्याची दाट शक्यता असते. कोणत्याही प्रकारची शारीरिक तक्रार नसताना मुलांच्या खाण्याचे तंत्र बिघडणे हे मानसिक दडपण असल्याचे लक्षण असू शकते.

३.विसराळूपणा आणि बोलताना अडखळणे .

आधी सांगितल्याप्रमाणे मुलावर असणारे अतिरिक्त अपेक्षांचे ओझे मुलांमधली विसराळूपण वाढवते. तसेच मुलांमधील आत्मविश्वास कमी होतो आणि ते बोलताना अडखळायला लागतात. आपले म्हणं इतरांसमोर मांडणे त्यांना अवघड जाऊ लागते. छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना अनेक वेळा सांगितल्या तरी ते विसरू लागतात.

४. पालकांपासून गोष्टी लपवणे

मुलांवर अपेक्षांचे अतिरिक्त भार दिल्याचे आणखी एक महत्वाचे लक्षण म्हणजे मुल अनेक गोष्टी पालकांपासून लपवू लागतात. आई-बाबा ओरडतील,रागावतील या भीतीपोटी मुले अनेक गोष्टी पालकांपासून लपायला लागतात. यामुळे मुलांना खोटं बोलण्याची चूक मान्य न करता लपवण्याची सवय लहानपणापासून लागते. जी त्यानं भविष्यात अपायकारक ठरू शकते. तसेच यामुळे मुले आणि पालक यांच्यातील दरी वाढू लागते आणि संवाद कमी होतो. जे आई-वडील आणि मुले यांच्या नात्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

५. गुणांचे खालावलेले प्रमाण

तुमच्या अपेक्षांचा ताणचे परिणाम म्हणून त्यांचे खूप अभ्यास करून मेहनत करून देखील गुणांचे प्रमाण खालावते . आपण एवढे गन मिळवू ना पास तर होऊ ना ? आहि झालो तर आई-बाबा काय म्हणतील या सगळ्या विचारांचा ताण त्यांच्या गुणांवर परिणाम करते. म्हणजे मुलांना मिळणारे कमी गन याला फक्त मुले कारणीभूत नसून तुमचे अपेक्षांचे ओझे देखील कारणीभूत असण्याची शक्यता असते.

त्यामुळे मुलांच्या क्षमतेनुसार त्यांच्या कलानुसार त्या-त्या विषयावर भर द्या त्यांची आवड जाणून घेऊन त्याला प्रोहत्साहन द्या, अन्यथा फार कोवळ्या वयात मुलांच्या मनावर अपेक्षांच्या ओझ्यामुळे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. ज्याचे परिणाम मुलाला आणि त्याच्या कुटूंबाला आयुष्यभर भोगावे लागतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon