Link copied!
Sign in / Sign up
282
Shares

पालकांच्या या पाच सवयी मुले फॉलो करतात...त्यामुळे त्याच्या समोर कसे वागायचे ते ठरवा

लहान मुलं आई-वडिलांचा आरसा असतात. तुम्ही जे करता त्याचं ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.त्यात देखील आईचा बाळावर जास्त प्रभाव असतो. कारण बहुतांश आपला वेळ ते आई बरोबर घालवत असतात. मुल आई-वडिलांकडून फक्त चेहराच घेत नाहीतर आई -वडिलांच्या सवयींचे अनुकरण देखील करतं. लहान मुल पालकांच्या कोणत्या सवयीचे अनुकरण करतं ते आपण पाहणार आहोत.

१.स्वच्छतेची सवय

बाहेरून आल्यावर आई-बाबा काय करतात. हात-पाय धुऊन मग घरात वावरतात की , तसेच घरात वावरतात?जर आई-बाबा तसेच हातपाय न धुता घरात वावरत असतील तर मुलं तीच सवय उचलतात. आणि मग तुम्ही कितीही सांगितले तरी मग ऐकत नाहीत. कचरा कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतात की जागच्या-जागीच पडू देतात.जर पालकच कचरा जागच्या-जागी ठेवत असतील तर मुलं देखील तेच आणि घरात आणि बाहेर तसेच वागतात. बाथरूमला जाऊन आल्यावरची स्वच्छता, अंघोळीची सवय जर पालकांनाच स्वच्छतेची सवय नसेल तर मुलं देखील तशीच वागतात.

२.झोपण्याची आणि उठण्याच्या वेळा

जर तुम्ही लवकर झोपत असाल तर तुमच्या मुलाला देखील तीच सवय लागते. आणि जर तुम्हीच उशिरा रात्री-अपरात्री झोपत असाल तर त्याचेच अनुकरण मुलं करतात. न कळत्या वयात ते तुम्ही झोपवलं त्यावेळी झोपतात. परंतु जसं-जसं त्यांना कळू लागते तसं-तसे ते झोपण्यावरून ते त्रास देऊ लागतात. तसेच उठण्याबाबत तुम्ही उशिरा उठत असाल तर त्यांना पण तीच सवय लागते.

३.तुमच्या बोलण्याची पद्धत

तुम्हांला मुलांशी बोलताना फार सांभाळून आणि जपून बोलणे गरजेचे असते. कारण जर तुम्ही चिडून-रागावून किंवा सतत अपशब्द वापरून बोलत असाल तर. ते मूळ देखील त्याच पद्धतीने बोलू लागते. आपण काय बोलतो याचा अर्थ माहित नसताना अपशब्दांचा वापर करते. व अपशब्दांचा वापर केल्यावर जर तुम्ही त्यांच्यावर चिडलात तर ते मुद्दामून त्याप्रकरे बोलतात. त्यामुळे लहान मुलांशी बोलताना किंवा त्यांच्या समोर दुसऱ्यांशी कोणाशी बोलताना जपून बोलवे.

४. खाण्याची पद्धत

खाताना नुसते घास न कोंबता चावून-चावून खावे. खाताना घाई न करता सावकाश खावे. जर तुम्हीच तुमच्या मुलांसमोर घाई-घाईने जेवत असाल. खात असाल तर तर लहान मुल तुमचेच अनुकरण करणारा आहे.

५. तुमची तत्वे, वागणुक

अगदी छोट्या गोष्टीपासून अगदी जेवण्याच्या आधी प्रार्थना करण्यापासून ते अगदी एखाद्य व्यक्तीला मदत करण्या पर्यंत सगळ्या गोष्टींचे निरीक्षण तुमचे मुलं करत असते. तुमच्या वागणुकीचा तत्वाचा प्रभाव तुमच्या मुलांवर पडत असतो. आणि ती तशी घडत असतात.

त्यामुळे मुलांसमोर चांगले वागा, स्वतःचा चांगला आदर्श ठेवा. जेणेकरून ते त्या प्रकारे घडतील

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon