Link copied!
Sign in / Sign up
163
Shares

पहाटे समागम करण्याने होणारे फायदे

 

दिवसभर खूप काम असणार आहे हे माहित असताना सकाळी लवकर उठणे अगदी जीवावर येतं अश्यावेळी आपल्याला अजून ५ मिनिटे लोळायचं असतं. काही अभ्यास असं सांगतात, अंथरुणातील ही पाच मिनिटे खरं खूप फायदेशीर असतात. पण झोपेसाठी नाही तर समागमासाठी. या वेळात करण्यात येणाऱ्या समागमामुळे अनेक आरोग्यविषयक अनेक फायदे होतात हे फायदे कोणते ते आपण पाहणार आहोत.

१. तुम्ही तरुण दिसता

संभोग दरम्यान एस्ट्रोजनचा शरीरात स्त्राव होतो आणि सकाळच्यावेळेतील हा स्त्राव तुम्हांला तरुण आणि सुंदर दिसण्यास मदत करतो. मूलतः या संप्रेरकाच्या स्त्रवण्याने कोरड्या त्वचेत स्निग्धता निर्माण होते. आणिन आणि नुकत्याच येऊ लागलेल्या सुरकुत्या दिसत नाहीत किंवा प्रमाण कमी होते. आणि सकाळी केलेल्या संभोगामुळे रक्ताभिसरण चांगले होते. जर तुम्हांला तरुण आणि सुंदर त्वचा हवी असेल तर रोज सकाळी लवकर हा अंथरुणातील व्यायाम सुरु करा.

२. गर्भधारणा होण्याची शक्यता वाढवते.

काही अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की सकाळी लवकर उठल्या-उठल्या संभोग केल्यामुळे गरोदर राहण्याच्या शक्यता वाढतात. सकाळी गरोदर राहण्यास मदत करणारी संप्रेरकाची पातळी ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे बाळाचा विचार करत असाल तर यावेळी प्रयत्न केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल

३. चिंता कमी करण्यास मदत

संभोगाचा उत्कटबिंदू (Orgasms) पोहचल्यानंतर शरीर हे एंडोर्फिन्स हे आनंदाची आणि समाधानाची भावना निर्माण करणारं संप्रेरक स्तरावण्यास सुरवात करतं. तसेच हे संप्रेरक (हार्मोन) तणाव कमी करण्यास देखील मदत करते. सकाळी-सकाळी या संप्रेरकांच्या स्त्रवण्यामुळे तणाव कमी होऊन, सकारात्मक वाढते आणि सकाळी-सकाळी या मनस्थितीमुळे दिवस चांगला जातो, तणाव कमी होतो आणि डोक्याची चिंता कमी होते. आणि दिवसभर तुम्हांला प्रसन्न वाटते.

४. मासिकपाळी दरम्यान येणारे पेटके कमी होतात.

अनेक तज्ज्ञांचे असे मत आहे, सकाळी लवकर संभोग केल्याने स्त्रियांना मासिक पाली दरम्यान येणाऱ्या पेटक्यांची तीव्रता कमी होते.

५ . सकाळचा व्यायाम

काही अभ्यास हे संभोगाला एक प्रकारचा व्यायाम असे मानतात. त्यानुसार सकाळी लवकर करण्यात येणाऱ्या संभोगामुळे तुम्हांला जिममध्ये जाऊन करण्यात येणाऱ्या काही व्यायाम इतकाच व्यायाम करण्यासारखे आहे. यामुळे तुमच्या बऱ्याच कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे तुम्हांला काही व्यायाम केल्यानंतर होणाऱ्या फायद्या इतकाच फायदा होतो.  

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon