Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

पहिल्यांदा समागम करताना ...

पहिल्यांदा समागम करताना प्रत्येक दोघांच्या मनात थोडी धाकधूक असते, एकमेकांच्या अपेक्षांना पात्र ठरू की नाही याबाबत दोघे साशंक असतात अश्यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. तसेच काही गोष्टी करण्याने तुमची पहिली वेळ अविस्मरणीय ठरू शकते. हे पाहणार आहोत.

१. सुरक्षितत संभोग करा.

पहिल्यांदाच संभोगाचा अनुभव घेताना सुरक्षित संभोग करणे हे फार महत्त्वाचे आहे. यामुळे फक्त गर्भधारणच नाही तर लैगिक आजारापासून देखील तुमचे संरक्षण होते सुरक्षिततेसाठी तुम्ही कंडोम , गर्भनिरोधक गोळ्या यासारखे पर्याय निवडू शकता. या वस्तूंची पुर्वतयारी करुन ठेवा. म्हणजे तुम्ही ‘त्या’ क्षणांचा सुखद अनुभव घेऊ शकता.

२. गैरसमज टाळा.

पहिल्यांदा संभोग करताना स्त्रीला रक्तस्त्राव होतो. आणि असे झाले नाही तर स्त्री व्हर्जिन नसते,किंवा ती पवित्र नसते. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ नामक अतिशय नाजुक पडदा (tissue) धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा स्विमिंग सारख्याव्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे याबाबत एकमेकांशी मोकळेपणाने बोला.

३. वेदनांना घाबरू नका.

पहिल्यांदा संभोग करताना वेदना होणं अगदीच स्वाभाविक आहे,स्त्रियांना काही वेळेस रक्तस्त्रावदेखील होऊ शकतो पण या गोष्टींने घाबरून जाण्यासारखे काही नसते. सुरवातीला काही वेदना जाणवतात परंतु काही कालांतराने हा त्रास कमी होतो व ‘त्या’ क्षणांचा आनंद घेऊ शकता. पहिल्या वेळेस पुरुषांना देखील त्रास होण्याची शक्यता असते.

४. एकमेकांना आकर्षित करा.

पहिल्यांदा संभोग करताना एकमेकांना आकर्षित करणे आवश्यक असते. तसेच एकमेकांना जाणून घेऊन एकमेकांच्या आवडी प्रमाणे गोष्टी करणे योग्य ठरते. पहिल्यांदा संभोग करताना तर कामक्रीडा व दोघांमधील मोकळा संवाद निर्माण होणे फार आवश्यक असतो. 

५. अंघोळ करणे. 

संभोगापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करणे फायदेशीरच आहे. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटण्यास मदत होईल तसेच तुमची गुप्तांग देखील स्वच्छ राहतील. तसेच सेक्सनंतरदेखील अवश्य आंघोळ करा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

६. ते क्षण अविस्मरणीय करा. 

प्रत्येकाला आपल्या जीवनात हे पहिले क्षण खास असावे असे वाटत असते. त्यानुसार आपल्या जोडीदाराच्या इच्छा जाणून घेऊन वातावरण निर्मिती करा. ज्यामुळे तुमचा पहिला क्षण त्यामुळे अविस्मरणीय ठरेल. पण मात्र काही वेळेस प्रत्यक्षात पहिला समागमाचा अनुभव तुम्हांला अपेक्षित असल्यापेक्षा वेगळा असू शकतो. त्यामुळे त्याबाबत मनाची तयारी असू द्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon