Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

पहिल्यांदा आई झालेल्या स्त्रियांना या गोष्टी त्यांच्या वाटतील

पहिल्यांदा आई झाल्यानंतरचा अनुभव अद्भुत असतो. या एकमेव अनुभवाला तुम्ही जाणून घेऊ शकता तुमच्या लहानग्या बाळाला जन्म दिल्यानंतरच. त्याचे छोटे छोटे हात-पाय आणि गोंडस हसणे तुमचे सगळे दुखः तुम्हाला विसरायला लावतात. या नाजूक जीवाला सांभाळणे म्हणजे दिव्य कामच असते. कोणतीही आई आधीपासूनच हे संगोपन कौशल्य शिकून येत नाही. बाळाला कडेवर घेण्यापासून ते त्याला भरवण्यापर्यंत सगळी कामे तुम्ही या अनुभवातून शिकत असता. बाळाला सांभाळण्यात देखील तुमचा एक आनंद सामावलेला असतो.

जर तुम्ही मला सांगणार असाल की बाळाची देखभाल, घरातली कामे, तुमचे रुटीन आणि सोबतच नवऱ्याचे काय हवे नको ते बघणे या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांभाळत असाल तेही कोणाचीच मदत न घेता किंवा सैरभैर न होता तर मला वाटेल की तुम्ही एक रोबोट आहात! अर्थातच कोणत्याही स्त्रीला हे शक्य नाही. अशाच काही तुम्ही रिलेट करू शकणाऱ्या गोष्टी इथे दिल्या आहेत.

१. तुमच्या हातून चुकून बाळाला इजा होऊ शकते .

कधीतरी खेळतांना किंवा चुकून तुमच्याकडून बाळाचे एखादे खेळणे त्याच्याच अंगावर किंवा तोंडावर पडून बाळाला लागू शकते...चुकून! तुमच्याकडून घाईत किंवा अनावधानाने अशा चुका होऊ शकतात. तुमच्यामुळे बाळाला लागल्यावर त्याचे रडके हावभाव पाहून नक्कीच तुम्हाला तुम्ही एक वाईट पालक आहात असे वाटेल. पण काळजी करू नका, असे अपघात होऊ शकतात. ह्यात तुमचीच चूक आहे असे मानून वाईट वाटून घेऊ नका.

२. तुम्ही तुमचे जेवण चटकन संपवाल !

विश्वास ठेवा, तुम्हाला तुमचे ९८% जेवण चटकन संपवून लगेचच रडणाऱ्या बाळाकडे लक्ष द्यायला जावे लागेल. बाळाच्या देखभालीत आणि घराच्या पसाऱ्यात आईला जेवणासाठी सुद्धा वेळ मिळत नाही, तेंव्हा हे काम चटकन संपवून बाळाच्या पाळण्याकडे धावण्याकडे तुमचा कल असतो.

३. तुमच्याकडे निन्जा  पॉवर येते!

बाळ झोपलेल्या खोलीत जाण्यासाठी तुम्हाला निनजा पॉवरच पाहिजे. पायांचा आवाज न करता अलगद कपाटातून एखादी वस्तू काढून घेणे आणि बाकीची खोली अजिबात आवाज न करता जशीच्या तशी आवरणे, हे काम फक्त निनजाच करू शकतात !

४. तुम्ही नेहेमी बाळाला फोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता.

कितीही प्रयत्न केले तरीही लहान मुलांना मोबाईल सापडतोच आणि त्यांच्या हातात लागलेल्या वस्तूचे ते काय करतात हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या हातून मोबाईल काढून घेतल्यावर तुमच्या फोनची गॅलेरी काही अशी दिसेल.

५. तुम्ही नेहेमीपेक्षा जास्त हसत आहात.

हो! तुम्हाला देखील हे जाणवले असेल की तुमचे बाळ नकळत तुमच्या हसण्याचे कारण बनत आहे. त्याचे गमतीशीर वागणे आणि उत्सुकतेने सगळ्या गोष्टींकडे पाहणे तुमच्या चेहेऱ्यावर हसू आणते. त्याच्या गमतीशीर करामती पाहून तुमचे हसू आवरणार नाही.

६. तुमच्या घरातल्या आवडत्या वस्तूंना गुडबाय म्हणा.

लहान मुले त्यांच्या तोडमोडीच्या वागणुकीसाठी प्रसिद्ध आहेतच. तुमचे आवडते कुशन असेल किंवा एखादी फुलदाणी किंवा एखादी छोटीशी शोभेची वस्तू. तुमच्या बाळाच्या सानिध्यात येणाऱ्या गोष्टींना उघडून बघण्याची उत्सुकता त्याच्यात असते. आणि त्याच्या उत्सुकतेपायी तुम्हाला या गोष्टींना विसरावे लागणार, त्यासाठी तयार राहा.

८. लाजणे ? ते काय असते?

सार्वजनिक ठिकाणी रडणाऱ्या तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी तुमच्या आहे तश्या आवाजात गाणे म्हणणे? किंवा मुलांना शाळेत सोडायला नाईटड्रेसवर जाणे? यापेक्षाही जास्त गोष्टींबद्दल काळजी करणे तुम्ही सोडून देणार आहात.

८. तुमच्या मुलांसाठी वस्तू विकत घेणे तुम्हाला आनंद देऊन जाते.

तुमच्या लहानग्याच्या चेहेऱ्यावर १०० वोल्टचे हसू पहिले की तुम्हाला लगेच त्याच्यासाठी एखादी छानशी खेळणी किंवा त्याची आवडती वस्तू त्याला घेऊन द्यावीशी वाटते. अर्थातच तुमच्या मनातून त्या लहानश्या जीवासाठी सगळे करावेसे वाटते. तुम्ही स्वतःसाठी काही घेण्याआधी ४ वेळा विचार कराल पण मुलांसाठी तुम्ही लगेच तयार व्हाल.

९. सगळे काही नीट होणार आहे. 

 आजूबाजूचे तुमचे जवळचे तुम्हाला सांगतील की सगळे काही सुरळीत होईल आणि ते खरेच आहे. आयुष्य परत पहिल्यासारखे होईल. तुमच्या झोपेच्या सवयींपासून ते जेवणाच्या सवयींपर्यंत सगळे काही बदलले असले तरीही काळजी करू नका. तुमचा आई होण्याचा अनुभव तुम्हाला जीवनात खुप काही शिकवणार आहे. आई होण्याच्या या उत्सवाला सेलेब्रेट करा!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon