Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

पहिल्यांदा समागम करताना या अडचणी येऊ शकतात.

         प्रथमच समागम करताना याबाबतीतल्या एकमेकांच्या आवडी-निवडी किंवा अपेक्षा माहिती नसल्यास सुरवात कशी करावी जोडीदाराला हे आवडले कि नाही अश्या अनेक अनेक शंका मनात असतात. अश्या शंका मनात असताना ज्यावेळी प्रथम समागम करताना काही अडचणी येण्याची शक्यता असते. या अडचणी कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. दोघांपैकी एक कमी उत्तेजित असणे.

बहुतेक वेळी स्त्री कमी उत्तेजित झाल्यामुळे संभोग करण्यात अडचण येण्याची शक्यता असते. स्त्री कमी उत्तेजित झाल्यामुळे योनीतुन होणारा स्त्राव स्त्रवत नाही त्यामुळे पुरुषाचे लिंग योनीत जाताना कोरडेपणामुळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा संभोग तिला वेदनाकारक ठरू शकतो. जर पुरुष फारसा उत्तेजित नसेल तर लिंगात योग्य प्रमाणात ताठरता येत नाही,आणि संभोग होणे शक्य होत नाही.

२. वेदना

स्त्रीचे हायमन (योनिद्वार पटल ) भंगल्यामुळे किंवा पुरुषाच्या शिश्नाच्या त्वचेचे पातळ आवरण ज्या तुकड्याने जोडलेले असते ती त्वचा म्हणजेच फ्रेन्युलम इजा झाल्याने किंवा ओढले गेल्याने थोडा त्रास होऊ शकतो. तसेच पुरुष निरोधा शिवाय संभोग करत असेल तर त्याला देखील थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. पण पुरुषाच्या बाबतीतील ही शक्यता फारच कमी असते.

३. भिती

पहिल्यांदा संभोग करताना विशेषतः स्त्रियांना भीतीमुळे योनीचे आकुंचन होऊन वेदनादायी संभोग किंवा संभोग पूर्ण न होणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात.

४. कल्पना आणि वास्तव

अनेक पुरुष आणि स्त्रियांमध्ये वाचलेले किंवा ऐकीव माहितीवरून किंवा टीव्ही सिनेमे आणि इतर चुकीच्या माध्यमामुळे समागम बाबत काही भीतीदायक किंवा रमणीय कल्पना असतात आणि वास्तवातील त्याचे स्वरूप पाहून भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभोगाबाबत योग्य माध्यमाद्वारे माहिती करून घेणे आवश्यक असते.

५. एकमेकांना जाणून न घेणे.

एकमेकांना जाणून न घेता एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेता किंवा इच्छा जाणून घेता कुणा एकाच्या इच्छेने ने होणारे समागम फार कमी वेळा सकारात्मकरित्या यशस्वी होते, 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon