Link copied!
Sign in / Sign up
67
Shares

पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांसाठी या सात वस्तू अत्यंत उपयुक्त ठरतील.

पहिल्यांदा आई होताना खूप जबाबदारी असते. पण आपल्या बाळाची काळजी घेताना स्वत:ची काळजी घ्यायला विसरू नका. बाळासाठी डायपर, कपडे खात्रीने नवे व छान घेत असता पण तुम्हाला स्वत:ला लागणाऱ्या वस्तूंची तयारी केली आहे का? आज आपण पहिल्यांदाच आई होणाऱ्या मातांसाठी लागणाऱ्या सात वस्तूंची माहिती घेऊ:

१. मॅटर्निटी पॅड 

 प्रसूतीनंतर काही जणींना योनीतून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. या रक्तस्रावाचे प्रमाण दोन दिवसापासून ते सहा आठवड्यांपर्यंत होऊ शकते. यासाठी तुमच्या बॅगेत मॅटर्निटी पॅड सॅनिटरी नॅपकिन्स भरपूर ठेवा. नऊ महिने न वापरलेले पॅड्स आता वापरण्याची वेळ आली आहे.

२. निप्पल क्रिम 

 तुम्ही स्तनदा माता असाल तर स्तनाग्रे थोडी निळी चिडकी तिथली त्वचा तडकली होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी निप्पल क्रिम लावा , हे क्रीम तेलयुक्त झाडापासून बनवलेले वापरावे.

३.  स्तनाग्रांचे कवच

 प्रत्येक आई स्तनपान देऊ शकत नाही. स्तनाग्रे जर चपटी, बारीक असल्यास ते बाळाला व आईला दोघांनाही डोकेदुखी बनू शकते. स्त्रीरोगतज्ज्ञ स्तनाग्रांच्या सुरक्षेसाठी एक कवच वापरण्याची शिफारस करतात.

४. नर्सिंग पॅड

 जेव्हा स्तनदा माता दूध देत नसते तेव्हा तिच्या स्तनातून कधी कधी दूध वाया जाण्याची शक्यता असते. यामुळे लगेच समोरच डाग दिसण्याची शक्यता आहे. हे टाळायचे असल्यास माता नर्सिंग पॅडचा वापर करू शकतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन पर्याय आहेत एक म्हणजे वापरून लगेच टाकून देण्यासारखे आणि दुसरे पुन:पुन्हा वापरता येतील असे, यामुळे तुमचे पैसे देखील वाचू शकतात.

५.  नर्सिंग ब्रा आणि टॉप्स

 पूर्वी वापरत असलेल्या ब्रा आणि टॉप्स हे स्तनपानासाठी योग्य नाहीत. नर्सिंग ब्रा,टॉप, नाइटीजमुळे तुमचे स्तनपानाचे काम सोपे होईल. यामुळे मुलाला किंवा मुलीला जेव्हा गरज असते तेव्हा लगेच त्यांचे पोट भरू शकता.

५) हिटपॅड किंवा कूलपॅड

जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देता तेव्हा तुमच्या शरीरातील विविध अवयव विशेषत: पोट,पाय,पाठ,डोके दुखणे असे उदभवू शकते. अशावेळी हिटपॅड,कूलपॅड हे वापरणे अतिशय सोयीचे जाते. या पॅडचा वापर अगदी सहज करता येतो.या सर्व दुखण्यांवर हिटपॅडनी शेकणे तुम्हाला आराम देऊ शकते.

६) मीठाच्या पाण्याने शेकणे

 सर्व अंगदुखीवर रामबाण उपाय म्हणजे खाऱ्या पाण्याने, मीठाच्या पाण्याने शेकणे. घरातील टबबाथच्या आकारानुसार त्यात खारे पाणी भरून त्यात अंघोळ करावी. अशा प्रकारच्या अंघोळीने शरीरातील स्नायू मोकळे होतात. या मीठाचा वास खूप काही चांगला नसतो पण तुमच्या शाररिक वेदना कमी करण्याची ताकद नक्कीच असते. यानिमित्ताने तुम्ही स्वत:ला चांगला वेळ देऊ शकता

 
Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon