Link copied!
Sign in / Sign up
227
Shares

पहिल्यांदा बाबा होणाऱ्या पुरुषांसाठी काही टिप्स

 केव्हाही शिशुची काळजी घेणे आणि बाळंतपण यांचा विषय निघतो, तेव्हा आईंना संबोधित केलेले लेख तुम्हाला भरभरून आढळतील- जसे की गरोदरपणाला कसे सामोरे जावे, काय खावे, कसे वागावे, घर कसे सांभाळावे, इत्यादी. अशा परिस्थितींमध्ये तुम्हाला पित्यांनी कसे वागावे, काय करावे यासंबंधींचे वर्तमानपत्रांतील लेख वा ब्लॉग पोस्ट्स क्वचितच दृष्टीस पडतील. बाळ होताना पित्यांना नेहमीच स्वतःची अपुरी तयारी असल्यासारखे का वाटते, यामागचे हे प्रमुख कारण असू शकते. त्यांना ही परिस्थिती कशी सांभाळावी किंवा कसे वागावे, याची जराही कल्पना नसते आणि त्यांना या धामधुमीमध्ये सहाय्यता करण्यासाठी पुष्कळ लेखही उपलब्ध नसतात. त्यामुळेच, सध्या आपल्या बाळाच्या आगमनाची आस लागून राहिलेल्या सगळ्या पित्यांसाठी आम्ही काही टीप्स देत आहोत; ज्या तुमच्यासाठी या कालावधीत मौल्यवान ठरु शकतील:

१. वेळेला हजर राहा. 

या गरोदरपणाच्या प्रक्रियेमध्ये तुमचे स्थान नगण्य आहे, असे तुम्हाला वाटू शकते. तुमची पत्नी आणि तुमचे बाळ यांमध्ये एक विशेष बंध निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये तुमच्यासाठी कोणतीही भूमिका नाही, असेही तुम्हाला वाटू शकते. अशा वेळी हे एक गोष्ट ध्यानात ठेवा की, तिने त्या अर्भकाचे ९ महिने आपल्या शरीरात पालनपोषण केले आहे, म्हणून साहजिकच तुमच्या बाळाबरोबरचे तिचे असणारे नाते हे तुमचे तुमच्या बाळाबरोबरच्या नात्यापेक्षा भिन्न स्वरूपाचे असणार आहे. तथापि, त्या शिशुची उत्पत्ती ही तुमच्या दोघांच्या मिलापामधून झालेली आहे आणि बाळाला एकत्रितपणे वाढवणे हे तुमच्या दोघांचेही ध्येय आहे; ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आई आणि बाळ यांमध्ये अतिशय दृढ नाते असते हे जरी खरे असले; तरी जर तुम्ही त्यांच्यासाठी आसपास असलात  आणि तुमची उपस्थिती जाणवून दिलीत, तर तुम्ही त्यांच्यासाठी किती आनंदकारक, गरजेचे आणि आवश्यक आहात; याची तुम्हाला जाणीव होईल. शेवटी तुम्ही सर्वजण एकत्रितपणे एक परिवार आहात. तुमच्यामधील नाती जरी वेगवेगळी असली; तरी ती नाती अस्तित्वात तर आहेतच! तुम्हाला ती अनुभवण्यासाठी फक्त त्यांच्याबरोबर असण्याची गरज आहे.

२. नेहमी सहभागी व्हा. 

तुमच्या पत्नीचा गरोदरपणा असो वा तुमच्या शिशुचे संगोपन करायचे असो; या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात तुमचे सहभागी असणे महत्त्वाचे आहे हे लक्षात असू द्या. डॉक्टरांच्या नियोजित भेटीपासून ते अल्ट्रासाउंड पर्यंत,रात्री अवेळी बाळाच्या रडण्यामुळे उठण्यापासून ते डायपर्स बदलण्यापर्यंत; बाळाची काळजी घेणे आणि गर्भारपणाच्या प्रक्रियेला तुमच्या बायकोबरोबरच तुम्हालाही सामोरे जायचे आहे. या प्रत्येक टप्प्यात सहभागी व्हा; म्हणजे तुम्हाला बाजूला राहण्याची खंत राहणार नाही आणि तिला तुम्ही आधारही देऊ शकता. तसेच यातून आपल्या जबाबदारीचा पुरेपूर हिस्साही तुम्ही पार पाडता! लोक नेहमीच आई-मूल यांच्या नात्याला झुकते माप देतात; पण यामुळे वडिलांच्या प्रेमाचे महत्त्व यातून कमी होत नाही. तुम्हाला जेव्हाही शक्य असेल, तेव्हा तुम्ही सहभागी राहा. अर्थातच बाळाचे पालनपोषण ही कोणत्याही पित्यासाठी जमेची बाजू नसते, पण जेव्हा तुमच्या बाळाला रडण्यापासून शांत करायचे असेल किंवा त्याचे लंगोटे बदलायचे असेल, तेव्हा तुम्ही त्याला स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त करण्यासाठी हातभार लावू शकता; किंवा फक्त बाळाला आपल्या जवळ पकडून हळुवारपणे झोपवू शकता. जुन्या परंपरांचे आणि समजांचे स्वतःवर बंधन घालू नका (जसे की पिता आणि स्वयंपाक आणि स्वच्छता यांबाबतच्या परंपरा).

३. विवाद टाळा. 

मोजक्या शब्दांत सांगायचे झाले तर, गरोदरपणा आणि शिशुचे संगोपन ही एक तणावपूर्ण प्रक्रिया आहे. तुमच्याबरोबरच सर्वजण या होणाऱ्या बदलांना तोंड देत असतात. जरी तुमची पत्नी अनेक शारीरिक बदलांचा सामना करत असली; तरी तुम्ही, मिस्टर डॅडी, सुद्धा मानसिक आणि भावनिक दृष्ट्या प्रभावित झालेले असता! बाळाचा जन्म ही अतिशय महत्त्वाची घटना आहे; म्हणून असे होणे नैसर्गिक आहे. भरपूर बदल घडत असताना पुष्कळ तडजोडीही निश्चितपणे कराव्या लागणार आहेत, हे ध्यानात ठेवा. यावेळी नातेसंबंधांचे वातावरणही बदलत असते. म्हणून जेव्हाही तुम्हाला पत्नीबरोबर वादावादीची चिन्हे दिसत असली, तेव्हा ही बाब ध्यानात ठेवा. तुम्ही दोघेही या अद्भुत स्थित्यंतरातून पार पडत असता. म्हणून जेव्हाही भांडणाची चिन्हे वाटू लागली, तेव्हा शांतपणे विचार करा आणि एकत्रितपणे तो मुद्दा सोडवा. विचार करण्याजोगी दुसरी बाब म्हणजे तुमचे बाळ- तुम्हाला खरेच तुमच्या लहानग्या बाळाला तुमची भांडणे आणि नकारात्मकता यांपासून प्रभावित करायचे आहे का?

 

४. रात्री जगण्याची मानसिक तयारी करा 

बाळाचा जन्म होणे ही एक तणावपूर्ण प्रक्रिया असते; आणि आपल्याला पारंपरिक समजांना झिडकारुन लावणे कितीही चांगले वाटत असले, तरी आपण जीवशास्त्रावर आधारलेल्या काही गोष्टी अजिबात बदलू शकत नाही (जसे की बाळाला संभाळणे). यावर विस्ताराने बोलायचे झाले तर, माता दिवसभर बाळासंबंधीची भरपूर कामे करत असतात; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेषतः बाळ झाल्यानंतर आई लगेचच नोकरी अथवा कामावर रुजू होऊ शकत नाही, याचा अर्थ पित्यांना कामासाठी बाळापासून लांब राहावे लागते. याच अनुषंगाने, पिता म्हणून दिवसभर बाळापासून लांब काम करावे लागते, म्हणून शक्य तेव्हा बाळाला रात्री सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता. तुमच्या पत्नीने दिवसभर तुमच्या बाळाच्या रडण्याची आणि विष्ठा साफ करण्याची काळजी घेतलेली असते, तेव्हा तिला रात्री विश्रांती घेऊ द्या. हे तुम्हाला तुमच्या बाळाबरोबर विशेष वैयक्तिक काळ घालवायचीसुद्धा संधी देते.

५.संबंध

मागे राहण्याच्या अथवा वगळले जाण्याच्या भावनेचा विचार करता, एक बाप म्हणून तुम्ही जोडलेले राहणे आवश्यक आहे. या नव्या परिस्थितीत तुमच्या बाळासोबतच्या नात्याची आणि तुमच्या पत्नीसोबतच्या नव्या नात्याची बांधणी करणे महत्त्वाचे ठरते. असे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत प्रामाणिक असणे गरजेचे आहे. हे तुम्हाला या नवख्या टप्प्यात दिशादर्शक म्हणून उपयोगाचे ठरेलच; शिवाय तुमच्या पत्नीलाही यामुळे आधार मिळेल आणि सुरक्षित वाटेल. तुम्हा दोघांनाही एकमेकांचे सहकारी बनणे गरजेचे आहे, तेव्हा परिस्थितीपासून स्वतःला एकटे पाडून आणि दुरावून घेऊ नका. तुमच्या चिंता व्यक्त करा, म्हणजे तुमची पत्नी त्या मिटवायला तुम्हाला मदत करु शकेल आणि तुम्हाला तिच्याशी आणि बाळाशी चांगल्या प्रकारे जोडायला मदत करु शकेल.

परिवारातील तुमची असणारी महत्त्वाची भूमिका आणि त्यानुसार येणारी कर्तव्ये पार पाडायचे लक्षात ठेवा; आणि या परिवाराचा भाग असणे ही तुमची प्राथमिक भूमिका आहे, हेही ध्यानात असू द्या. तुमची पत्नी अथवा बाळाइतकेच स्थान तुम्हालाही परिवारात आहे आणि तुमच्या पत्नीइतक्याच भरपूर(वेगळया प्रकारच्या) जबाबदाऱ्या तुम्हालाही पार पाडायच्या आहेत. शेवटी पिता बनण्याचा कोणताही बरोबर वा चुकीचा परिपूर्ण मार्ग नाही. तुम्हाला फक्त उत्कृष्टपणे जबाबदारी निभावायची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon