Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

पहिल्या त्रैमासिकात बहुतांश गरोदर स्त्रियां या चूका करतात.

           गर्भधारणा  हे गर्भावस्थ्येचे आणि पालकत्वाचे पहिले पाऊल असते. गरोदर होण्यापूर्वी कोणालाच माहित नसते बाळासाठी काय उपयुक्त आहे आणि काय नाही आणि जरी माहिती असले तर ते स्वतःबाबत किती उपयुक्त आहे याबाबत प्रत्येक स्त्रीच्या मनात शंका असते. परिणामी, अशी शक्यता आहे की गर्भवती माता एक किंवा इतर चुक करतील. याचा अर्थ असा नाही की त्या बेजबाबदार आणि वाईट पालक आहे किंवा आपण मुल वाढवण्यास अक्षम आहे .तर याचा अर्थ आपण शिकत आहात आणि आपल्याला परिस्थिती हाताळण्यासाठी काही प्रशिक्षणची आणि सल्ल्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच, आपल्या मनोधैर्यला प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही पहिल्या त्रैमासिकत महिलांकडून कोणत्या चुका होतात याची साधारण यादी केली आहे. यामध्ये कदाचित तुम्हांला तुमच्या चूक देखील सापडतील

१. दोघांसाठी जेवणे.

सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे जवळजवळ प्रत्येक स्त्री ही चूक करते ती म्हणजे ती एकासाठी नव्हे तर २ लोकांसाठी खाण्यास सुरुवात करते. हे मूर्खपणाचे आहे. तुमचं बाळ हे तुम्ही घेत असलेल्या आहारातून ऊर्जा, शक्ती घेत असते, आणि ज्यावेळी त्यांना ऊर्जेची गरज असते त्यावेळी तुम्हांला ते जाणवते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा किंवा वाढवावा . उगाच जबरदस्ती खाऊ आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खाऊ नये

२ अधिक माहिती मिळविणे.

गरोदर झाल्यावर तयार रहाणे चांगले आहे परंतु कधी-कधी अति माहिती असणे हे फायद्यापेक्षा समस्या ठरण्याची शक्यता असते. कोणतीही माहिती वाचून निष्कर्षापर्यंत पोहचणे हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हांला काही शंका असतील तर त्याचे निरसन डॉक्टरांशी बोलून करून घ्यावे.

३. सतत डॉक्टरांकडे जाणे.

या काळात डॉक्टरांच्या संपर्कात असणे, जाणवणाऱ्या बदलांबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे हे योग्य आणि आवश्यक असते. परंतु बाळाची वाढ हि एक प्रक्रिया असते. ती त्या-वेळेत होत असते. त्यामुळे त्या वाढीच्या टप्प्यापर्यंत पोहचेपर्यंत काही गोष्टी डॉक्टरांना अंदाजे सांगणे शक्य नसते. त्यामुळे त्या जाणून घेण्यासाठी सतत डॉक्टरांच्या मागे लागणे डॉक्टरांकडे कडे जाणे हे डॉक्टरांना आणि तुम्हांला शाररीक आणि मानसिक दृष्ट्या त्रासदायक ठरू शकते त्यामुळे हे टाळावे. जागरूक असणे हे योग्यच आहे. पण कारण नसताना गोष्टीच्या खोलात जाऊन मानसिक ताण घेणे हे तुमच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते.

४. अति अल्ट्रासाउंड करणे.

होय, एक अल्ट्रासाऊंडद्वारे आपल्याला बाळ कसे आहे,बाळाची वाढ योग्य होत आहे ना ? हे जाणून घेण्यास हे समजून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे. परंतु गर्भावर अल्ट्रासाऊंडचे बाळावर होणारे परिणाम अद्याप योग्यरित्या ज्ञात नाहीत आणि परिणामी आपल्याला सावधगिरीची गरज आहे. जगभरात अशा काही अहवाल आले आहेत जास्त प्रमाणातील अल्ट्रासाउंडने बाळाचा वाढमध्ये अडथळा येऊन काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर सांगतील त्यावेळी आणि तितक्याच वेळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही तपासणी करावी.

५.उशिरा डॉक्टरांकडे जाणे.

वरती आम्ही सांगितले काही स्त्रिया आणि पालक डॉक्तरांकडे सतत जाऊन उगाच काळजी करतात. पण हे जसे त्रासदायक ठरते तसेच, काही स्त्रिया होणार त्रास दुखणे अंगावर काढतात किंवा वेळच्या वेळी डॉक्टरांकडे जात नाही आणि त्यामुळे याचा दुष्परिणाम बाळावर आणि त्या स्त्रीवर होऊ शकतो.त्यामुळे वेळच्या वेळी डॉक्टरांकडे जाणे. डॉक्टरांचा सल्ला घेणे. त्याच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी करणे आवश्यक असते. तसेच जर तुम्हांला काही अनियमीत बदल जाणवला तरी डॉक्टरांना याविषयी सांगणे आवश्यक असते. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon