Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या गरोदरपणातील फरक.

जर तुमच्या लहानग्या मुलाला किंवा मुलीला आता खेळायला घरात अजून एक लहान बाळ येणार असेल तर तुम्ही अगदी योग्य आर्टिकल वाचत आहात! सर्वात आधी तुम्ही पुन्हा आई होणार आहात यानिमित्त अभिनंदन! तुमच्या घरात आता सध्या सगळीकडे आनंदी आनंद असेल आणि तुमच्या लहानग्याला तर खूपच उत्सुकता असेल. आता जेंव्हा तुम्हाला अजून एका गरोदरपणातून जायचे आहे, यावेळी सगळे पहिल्या वेळेसारखे असेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका.

पाहिल्यावेळेस तुम्हाला अनेक अनुभव आले होते. तुमच्या शरीरातील बदल, मानसिक बदल आणि सर्वजण तुमची घेत असलेली काळजी हे सगळं तुमच्यासाठी नवीन होतं. पण आता तुम्ही एक पालक आहात. तुमच्या पहिल्या अपत्यासाठी तुमचे जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम तुमचे या होणाऱ्या बाळासाठी पण असणार आहे. पण यावेळी गरोदरपणा थोडसा वेगळा असणार आहे. काही गोष्टी यावेळी आधी घडल्या होत्या तशा नसतील. मग काय वेगळं असणार आहे ? याच प्रश्नच उत्तर बघण्यासाठी हा लेख वाचा.

१. तुमचे लाड

 

 

पहिल्यावेळी तुम्ही प्रेग्नंट होतात तेंव्हा घरात सगळीकडे प्रसन्न वातावरण तर होतेच पण सगळेजण आवर्जून तुमची काळजी देखील घ्यायचे. तुम्ही काम करतांना दिसलात की तुम्हाला आराम करायचा सल्ला मिळायचा. सर्वकाही तुमच्याभोवती प्लानिंग व्हायचे. तुम्ही गरोदर असतानाही सुंदर दिसण्यासाठी आणि तुमच्या कम्फर्टसाठी वेगवेगळे गाऊनस् आणि स्किनकेअर प्रोडक्ट्स तुम्ही आणले होते.

दुसऱ्यावेळी मात्र हे असं फारसं काही नसणार आहे. तुम्हाला आता आधीच एक लहान मुल आहे आणि त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हालाच जबाबदारी घ्यावी लागते. घर चालवणे, घरातली कामे, मुलाचा अभ्यास या सगळ्यातून तुम्हाला आरामाची आणि स्वतःच्या स्किनकेअरची काळजी करण्यासाठी वेळच नसतो.

ही काही चुकीची गोष्ट नाही. तुम्ही तुमच्या इतर कामात व्यग्र असतांना सुद्धा तुमच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सी साठी वेळ काढून स्वत:ची काळजी घेऊ शकता. तुम्ही आधी यातून गेल्या आहात त्यामुळे अनुभवाचा फायदा तुम्हाला होईलच. आता यावेळी तुम्ही प्रेग्नेन्सी मेकअप आणि गोंडस गोंडस गाऊनस् वगैरे च्या भानगडीत न पडता सरळ ट्रॅक पॅन्ट आणि शर्ट घालण्याला पसंती द्याल !

२. काळजी आणि लक्ष.

पहिल्यांदा गरोदर असणे : सगळ्या हालचाली आणि लक्षणे नोंदवून घेतली जातात. बाळाचे लाथ मारणे, त्याची गर्भातली हालचाल यावर लक्ष ठेवले जाते. सगळे सोनोग्रम, टेस्ट सर्वकाही फाईल मध्ये जोडून जपून ठेवले जाते. प्रत्येक दिवशी, सगळे लक्ष तुमच्या बाळावर आणि त्याच्या गर्भातल्या खुशहालीवर असते.

दुसऱ्यांदा असणे : तुमची उत्सुकता आता तेवढी नाही राहिली. तुम्हाला आता नक्की काय महत्वाचे आहे आणि काय नाही हे चांगलेच माहिती झालेले आहे. ज्या गोष्टींवर लक्ष द्यायचे ते तुम्हाला नेमके माहित आहे. तुम्ही पहिल्या वेळेसारख्या कुतुहूल असणाऱ्या आणि घाबरलेल्या बिलकुल नाही आहात. असे असले तरी यात चुकीचे काहीच नाही!

खरेतर पहिल्या अनुभवाचा तुम्हाला फायदाच होतो. तुम्हाला काय महत्वाचे ते नेमके माहित असते आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही भावनिक न होता तो वेळ वाचवता. यावेळी मात्र तुमच्या नातेवाईक आणि मैत्रिणींकडून तुम्हाला खूप अटेन्शन मिळेल अशी अपेक्षा करू नका. त्यांना फक्त वाटते आहे की “ही परत आई होणार आहे ?”

काळजी करू नका. तुमच्या जवळच्यांना तुमच्या घरात येणाऱ्या नवीन सदस्याबद्दल तेवढाच आनंद असणार आहे. फक्त तुम्हाला दिलासा असेल की आधीसारखं तुम्हाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत बसावं लागणार नाही. ते बरं!

३. तयारी.

तुम्हाला मोजता देखील येणार नाहीत इतकी प्रेग्नेन्सीशी संबंधित पुस्तके आणि प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या पहिल्या वेळेस आणली होती. गरोदरपणाशी निगडीत गर्भसंस्कार पुस्तके, ब्लॉग, पालकत्व आणि आईपण यासंबंधित लेख, सेमिनार, क्लासेस यासर्व गोष्टींद्वारे तुम्ही मिळेल तितकी माहिती मिळवली होती. बाळाचे कपडे, खेळणी, नर्सरी च्या गोष्टी, बेबीकेअरची प्रोडक्ट्स असा सर्व वस्तूंनी तुमचे कपाट भरलेले होते. शक्य त्या सर्व प्रकारे तुम्ही येणाऱ्या बाळाची तयारी केली होती.

यावेळी मात्र तुम्हाला यासर्व गोष्टी म्हणजे वेळेच्या अपव्यय वाटणार आहेत. तुम्हाला आता कळून चुकले आहे की पोटातले बाळ आईची रूम कशी आहे, त्याच्यासाठी काय आणले आहे याच्यासंबंधी अजिबात काळजी करत नाही. त्याला या गोष्टींशी काहीच घेणेदेणे नाही. यावेळी तुम्ही आधी केल्या होत्या त्यापैकी निम्म्याहून कमी गोष्टी बाळासाठी करणार आहात.

दुसऱ्यांदा  तुमची बाळासाठीची तयारी पाहिल्या वेळेपेक्षा खूपच कमी असणार आहे. मुळात आता उत्सुकता जास्त नसल्यामुळे तुमचे मन गोंधळून जाणार नाही आणि त्याऐवजी “ मी मागच्या वेळेस आणलेल्या सामानातून काय काय पुन्हा वापरू शकते?” किंवा नवीन घेण्यापेक्षा “मागच्या वेळेच्या वस्तू आता पुन्हा वापरूया” याकडे तुमचा कल जास्त असेल.

४. काळजी.

सगळी काळजी आता हावेल उडून गेली आहे. आधी जसे तुम्ही पाउला- पाऊलावर सावधगिरीने वागायच्या तसं आता अजिबात नाहीये. तुमचं डाइट असो किंवा व्यायाम किंवा बाळासंबंधी कोणती गोष्ट असो, तुम्ही आता एकदम चिल आहात ! पहिल्यावेळी तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष दिले होते, अगदी न्यूट्रिशन एक्स्पर्टला भेटून तुम्ही दक्षता घेतली होती. तुमचा व्यायाम देखील काळजीपूर्वक होता. डॉक्टरकडे नियमित चेकअप, सोनोग्राफी करणे याबाबतीत तुम्ही चोख होतात. बाळाची हालचाल, पहिली लाथ याविषयी तुम्हाला खूप नवल वाटले होते.

आता तुम्ही दुसऱ्यांदा आई होणार आहात तर तुम्हाला या गोष्टींची गरजच वाटत नाही. दर दुसऱ्या दिवशी नवीन शंका घेऊन डॉक्टरकडे तुम्ही आता जात नाही. जे गरजेचे आहे आणि खरच उपयोगी आहे तेच तुम्ही यावेळी करणार आहात. खास प्रेग्नेन्सी फूड किंवा एक्स्ट्रा सप्लिमेंट घेणे तुम्ही टाळता आहात. नक्की काय खायचे आणि कशाबद्दल काळजी करायची हे तुम्हाला चांगलेच महिती आहे. तुम्ही आता जास्त ताण न घेता तुमचा गरोदरपणा एन्जोय करणार आहात.

५. उत्सुकता.

आता बाल होणार याविषयी तुम्हाला उत्सुकता तेवढी नसेल. पहिल्यावेळी प्रत्येक अन् प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला नवल वाटले होते. बाळाची प्रत्येक हालचाल, प्रत्येक सोनोग्राफी , तुमच्यातला प्रत्येक शारीरिक बदल याविषयी तुम्ही खूप जास्त उत्सुक होतात. पण यावेळी उत्सुकता आहे पण ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे. थोड्या मोठ्या गोष्टींवर अवलंबून आहे.

आता तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही आत्ता काय वाचले, तुम्हाला कसे वाटते आहे, आई झाल्यावर तुम्ही काय काय करणार आहात याविषयी फोन करून सतत सांगत बसणार नाही. तुम्ही आता एक प्रगल्भ आई आहात आणि शांत आहात. तुम्हाला यावेळी काही वेगळे आणि नवीन घडले तरच उत्सुकता आणि नवल वाटणार आहे. तुमचे मन शांत आहे. पण एक आई म्हणून हा नवीन जीव जगात आल्यावर काय होईल याची उत्सुकता मात्र तुम्हाला असणारच आहे.!

 

६. अपेक्षा.

ही गोष्ट मात्र तुम्ही मान्य करा की पहिल्या वेळी तुम्ही केलेल्या सगळ्या अपेक्षा बोगस होत्या. तुम्हाला वाटेल आणि तुम्ही ठरवाल तसच होईल ही अपेक्षा यावेळी मात्र अजिबात नाहीये. नक्की काय होते आणि कसे हे तुम्हाला माहित आहे. याविषयी चांगली गोष्ट अशी की तुम्ही आता योग्य दिशेने तयारी करू शकता. काय अपेक्षा ठेवायची आणि काय नाही ते तुम्हाला नक्की माहित आहे. तुम्हाला आता गोष्टी कशा सुरळीत पार पडतील आणि त्यासाठी काय करायचे याची कल्पना आली असेलच. तुम्हाला ही गोष्ट सकारात्मक राहण्यास मदत करेल.

७. आत्मविश्वास.

हा तुमच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीचा सगळ्यात चांगला भाग आहे. तुम्हाला यावेळी आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास आहे. आधीच्या वेळी तुम्ही कन्फ्युज होतात, तुमच्या मनात धाकधूक होती आणि काय घडेल याविषयी तुम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पण यावेळी तुम्ही स्वतःबद्दल शुअर आहात. तुम्ही आधी या सर्वातून गेल्या आहात त्यामुळे तुम्हाला काळजीचे कारण तितकेसे वाटत नाही. तुम्हाला येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याचे धाडस तुमच्या पहिल्या गरोदरपणामुळे आहेच. सगळे काही सुरळीत पार पडेल याविषयी तुम्हाला विश्वास आहे. अजून एका बाळाच्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज आहात !

कदाचित तुमचा यावेळीचा अनुभव वेगळा असेल. तुम्ही जास्त उत्सुक नसाल. पण आई तर आईच असते. तुमचा गरोदरपणा तुम्ही पुन्हा एकदा अनुभवत आहात म्हणून तो कमी आनंदाचा किंवा कमी महत्वाचा ठरत नाही.

तुम्ही यापूर्वी हे केले आहे, त्यामुळे मैत्रिणींनो किप काल्म अॅन्ड बेबी आॅन !     

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon