Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

फणसाचे कबाब


साहित्य

* कच्च्या फणसाचे गरे५०० ग्रॅम, कांद्याची पेस्ट १ कप, बारीक चिरलेला कांदा१/२ कप, कच्च्या पपईची पेस्ट २ चमचे, कबाब मसाला २ चमचे, मीठ आणि लाल मिरची, गरम मसाला आणि जिरं, कसुरी मेथी १ चमचा, क्रश केलेल्या लाल मिरच्या २ चमचे, चाट मसाला २ चमचे, ब्रेड क्रॅम्स, तेल (शॅलो फ्राय करण्यासाठी)

करायची कृती

फणसाचे गर मऊ, मॅश होण्यासारखे होईपर्यंत उकळवा.

त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि फोर्कने मॅश करा. त्यात एकही गुठळी राहणार नाही, असे पहा.

मॅश करून झाल्यावर त्यात तेलव्यतिरिक्त इतर पदार्थ म्हणजेच कांद्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, पपईची पेस्ट, कबाब मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरं पावडर, कसुरी मेथी, क्रश केलेल्या लाल मिरच्या आणि चाट मसाला घाला व व्यवस्थित मिक्स करा.

मिश्रणाचे १८-२० समान भाग करा. आणि त्याचे गोळे तयार करून हाताने दाबून फ्लॅट करा. हे गोळे तयार करताना हाताला थोडंस तेल लावा. म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही.

त्यानंतर कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या.

पॅन थोडा गरम झाल्यावर त्यात थोडं तेल घाला आणि तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यावर कटलेट ठेवा.

कटलेट दोन्ही बाजूने ब्राऊनीश होईपर्यंत नीट फ्राय करा.

किंवा तुम्ही कटलेट ग्रील देखील करू शकता.

साभार - Z Marathi

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon