Link copied!
Sign in / Sign up
40
Shares

ओवा खा...आणि या आरोग्यविषयक तक्रारी दूर ठेवा.

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, गुणधर्मचा असतो  अग्नीला जागृत करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो. 

१. पोट दुखणे किंवा फुगणे 

पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे आदी तक्रारींत हितकर असतो.  जर सतत पोट दुखणे किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा ओवा + चिमुटभर सैंधव रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्येतल्यास अपचन, शौचास साफ न होणे, पोटदुखी अशा अनेक तक्रारी दूर होतात.

२. लहान मुलांच्या पोटदुखीवर फायदेशीर  

लहान मुलांना सतत पोटदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे त्यांना कोमट पाण्याबरोबर ‘ओवा अर्क’ द्यावा. तसेच बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकल्यास लगेच पोटदुखी थांबते. तसेच जंताचा त्रासही कमी होतो.

३. दातदुखी 

ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.

४.सर्दी-खोकला 

ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

५. ऍसिडिटी 

.जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल. 

६.खोकला 

कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा. आल्याच्या रसामध्ये  थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

७. प्रसूतीनंतर 

बाळंतिणीला ओवा शेपा  खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पोटात गॅस धरत नाही. 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon