Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

या घरगुती उपायांनी ओठांचा काळपटपणा दूर करा.

उन्हामुळे किंवा सततच्या सौंदर्यप्रसाधांच्या वापरामुळे ओठांचा काळपटपणा वाढतो. आणि याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा काळपटपणा वाढतो, त्यामुळे हा काळपटपणा वाढू नये या करता घरगुती उपाय करा 

१. शुद्ध मध 

दोन थेंब शुद्ध मध बोटांवर घ्या आणि आणि ओठांवर हळुवारपणे चोळा असे दिवसातून दोनदा करा. यामुळे ओठांचा काळपटपणा कमी होईल. 

२. गुलाबाच्या पाकळ्या आणि ग्लिसरानी 

गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून घ्या त्यात थोडंसं ग्लिसरीन घाला आणि चांगले मिक्स करून घ्या. रोज रात्री झोपताना हे मिश्रण झोपताना रोज ओठांना लावा आणि सकाळी धुवा. यामुळे ओठांचा काळपटपणा कमी होईलच आणि ओठ गुलाबीसर होण्यास मदत होईल. 

३. डाळिंबाचा रस 

रोज रात्री झोपताना डाळींबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून हलक्या हाताने ओठ ओठावर तो रस चोळा आणि नंतर लगेच ओठ धुवा .यामुळे ओठांचा गुलबीपणा पुन्हा येण्यास मदत होते.

४. हळद आणि दूध 

चिमूटभर हळद घ्या त्यात हळदीची पेस्ट होईल इतपत दुधाचे थेंब  टाका आणि ही  पेस्ट ओठांवर लावा आणि हे वाळल्यावर लगेच धुवा. याने ओठांचा काळपटपणा नक्कीच कमी होईल. 

५. केसर

 

 

दोन ते तीन केसराच्या काड्या घ्या आणि त्यात दोन ते ३ थेंब दूध टाका आणि ते मिश्रण रोज सकाळी ओठाला चोळा. यामुळे ओठांचा काळपटपणा नक्कीच दूर होईल 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon