Link copied!
Sign in / Sign up
60
Shares

ORS म्हणजे काय आणि तान्ह्या बाळाला का द्यायला हवे


ORS सर्वच मातांना माहिती असेल आणि आताच्या नवीन व मॉडर्न मातांना माहिती नसेल पण तुमच्या आईंना पूर्ण ठाऊक असेल आणि तुमच्या आईणी लहानपणी तुम्हाला ors दिले असेलच. तर ORS म्हणजे (oral Rehydration salt) असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. ह्याला जल संजीवनी असेही म्हटले जाते. तर ही जलसंजीवनी का दिली जाते. तर ३ वर्षेच्या आतील बाळाला अतिसाराचा त्रास होतो म्हणजे जुलाब. तर ह्या ब्लॉगमधून तुम्हाला ORS विषयी माहिती व त्याचा उपयोग.

१) ORS मुखत्वे बाळाच्या डिहायड्रेशन ची समस्या दूर करण्यासाठी दिले जाते. लहान बाळाची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्याला लगेच काहींना काही होत असते.

२) जुलाब कसा होतो? 

तर जुलाब होण्याचे मुख्य कारण पोटामध्ये विसरू जिवाणू जाणे म्हणजेच जुलाब होय. ह्यात अस्वच्छता, दूषित पाणी, काही वेळेला बाळाला इतक्या तान्ह्या बाळाला खेळण्यासाठी काहीही देते आणि त्या वस्तूने किंवा खेळण्याने त्याला त्या वस्तूमधील बॅक्टरीया (जिवाणू) तोंडाद्वारे जाऊन पोटात शिरतात. आणि ती न दिसणारी घाण पोटात गेल्यावर जुलाब होतात. काही आपल्याकडील मातांचे असे म्हणणे असते की, दात येत असल्यामुळे बाळाला होत असते. पण खरं म्हणजे दात येण्याचा व जुलाबाचा काहीच संबंध नसतो. अशा जुलाबामुळे शरीरातील पाणी बाहेर पडते आणि ह्यामुळे बाळाचा मृत्यूही होऊ शकतो.

३) जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार जगात दुसऱ्या क्रमांकाने ५ वर्षेच्या आतील लहान मुलं ह्या अतिसारामुळे (जुलाब) दगावत असतात. आणि भारतासारख्या देशात ह्याची संख्या जास्तच आहे. तेव्हा ह्याविषयी आपण दक्ष व जागरूक आणि सज्ञानी राहायला हवे.

४) ORS ह्यावर उपाय आहे

 हो ORS ह्यावर खूप प्रभावी उपाय असलेले औषध आहे. आणि लक्षात घ्या आताचे बरेच डॉक्टर ORS बद्दल सकारात्मक बोलत नाही आणि नवीन पालकही लगेच गोळ्या व औषध देऊन मोकळे होतात तेव्हा अगोदर ORS द्यावे आणि त्यानंतर मग डॉक्टरकडे घेऊन जाऊन गोळ्या व औषधी द्याव्यात.

५) ORS कसे बनवायचे

जर ORS चे पावडर व पॅकेट उपलब्ध नसेल तर ह्याप्रमाणे ORS बनवायचे.

* स्वच्छ पाणी - १ लिटर स्वच्छ पाणी घ्यावे. किंवा ५ कप फुल घ्यावीत प्रत्येकी २०० मिली पाण्याचा.

* साखर - ६ चमचे साखर घ्यावी. (१ चमचा प्रत्येकी - ५ ग्राम)

* मीठ - अर्धा चमचा मीठ घ्यायचे.

* हे मिश्रण साखर पूर्णपणे विरघळण्यापर्यंत ढवळत रहा.

ORS बनवताना खूप काळजीपूर्वक बनवायचे कारण जास्त साखर टाकली किंवा मीठ टाकले तर आणखी समस्या येऊ शकतात. म्हणून तुम्हाला काटेकोर प्रमाण दिले आहे.

* आणि हे ORS साठवून ठेऊ नये. फक्त २४ तासांपर्यतच साठवायचे. कारण ORS इन्फेक्शन होऊ शकते.

६) पावडर मधून ORS बनवताना

* पावडर अगोदर स्वच्छ भांड्यात टाकून द्यावी. आता त्या पॅकेटवर जितके पाणी टाकायला लावले असेल तितकेच पाणी टाकायचे. कमी किंवा जास्त नाही. त्या पॅकेटवर जसे मार्गदर्शन केले असेल त्याप्रमाणे करावे.

* त्यात दूध, साखर, ज्यूस किंवा दुसरे काहीच मिक्स करू नये. बिलकुल नाही.

* व्यवस्थित ढवळून बाळाला पाजावे. बॉटलमध्ये भरू नये.

७) ORS अतिसारावर प्रत्येकाला देऊ शकतो का ?

हो, ORS तुम्ही बालकापासून ते प्रौढ व्यक्तीला ज्याला जुलाबाचा त्रास होत असेल त्याला देऊ शकता. आणि हा खूप सोपा उपाय आहे. भारत सरकारच्या आरोग्य खात्याने २९ जुलै ORS दिवस ठेवला आहे. इतके ह्याचे महात्म आहे.

८) जर ORS दिल्यावरही बाळाच्या प्रकृती चांगली झाली नाही तर बाळाला दवाखान्यात डॉक्टरांकडे न्यावे. कारण खूप वेळा dehydration खूप होऊन गेल्यामुळे. त्यामुळे लगेच डॉक्टरांना दाखवायचे.

९) जल संजीवनी म्हणजे काय ?

अतिसारावर उपयोगी पडणारे हे एक पेय आहे. एक लिटर उकळून गार केलेले पाणी घेऊन त्यात आठ चमचे साखर, चार चिमटी मीठ आणि चवीपुरते लिंबू हे सर्व एकत्र करून घ्यावे.हि जल संजीवनी शरीराच्या बहरत पडलेले पाणी भरून काढण्यासाठी उपयोगी पडते.

सौजन्य - भारत सरकारचे आरोग्य पोर्टल 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon