Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

नुकतीच आई झालेल्या स्त्रीला या सकारात्मक गोष्टींचा अनुभव येतो


आई होण्याची ही भावना आयुष्यभर कृतकृत्य झाल्यासारखी असते.ज्या महिलांच्या आयुष्यात ही संधी पहिल्यांदाच येते तेव्हा त्यांच्या मनात प्रथम त्या काळातील आव्हाने, संघर्ष डोळ्यासमोर येतो,पण मातृत्व म्हणजे यापेक्षाही बरेच काही असते.एखादे नवे आयुष्य सुरू व्हावे तसे यामध्ये अनेक सकारात्मक आणि आनंददायी बदल होतात. सकाळी उठताना तुमच्या शेजारी आपले बाळ असते ही भावनाच खूप आनंद देणारी आहे. यासारख्या अनेक भावना तुम्ही प्रथम आई होताना अनुभवू शकता. आई झाल्यावर स्त्रीच्या आयुष्य बदलून जाते या दरम्यान बाळाच्या येण्याने आईच्या आयुष्यत काही सकारत्मक बदल घडतात. हे बदल कोणते ते पाहणार आहोत. 

१. अमर्याद प्रेम

जेव्हा तुमचे बाळ आणि तुम्ही कुटुंबात वावरत असता तेव्हा तुमच्या बाळाच्या अस्तित्वाने कुटुंबातील इतर सदस्य देखील पालक म्हणून तुमची खूप काळजी घेत असतात. बाळाची काळजी घेण्यापासून तुमच्या आणि त्याच्या आहाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, नव्या आईला विश्रांती देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे काळजी,प्रेम हे तुम्हांला मिळत असते जे खरंच लक्षात घेण्यासारखे आहे.


२. बाळ तुम्हाला प्रचंड सकारात्मक उर्जा,आनंद देते.

बाळ त्याच्या जन्मापासून आईला प्रचंड सकारात्मक उर्जा देते. आपल्या चिमुकल्याचे प्रत्येक पाऊल,हात आई आपल्या हातावर ठेवते. ती स्वत:च्या बाळामध्ये इतकी रमते की, तिच्या शाररिक आणि तिच्या मनात नकारात्मक,निराशाजनक असा विचारच येत नाही.

३. स्वत:मधील ताकदीचा शोध लागतो. 

पहिल्यांदाच आई झालेल्या महिलांसाठी एक मूल सांभाळणे हे खूप अवघड असते. आई होताना तिचा संघर्ष, आलेली आव्हाने ही तिला इतकी कणखर बनवितात विशेषत: मानसिक दृष्टया एकदम स्पष्ट दृष्टीकोन देतात. काही महिलांना या दरम्यान स्वत:मध्ये लपलेली ताकद समजते.खरंतरं हाच तो काळ असतो जेव्हा महिलांना स्वत: मध्ये असलेल्या छुप्या शक्तीचा शोध घेण्यास मदत होते.


४.  बाळासोबत आपले बालपण अनुभवायला मिळते.

आपल्या प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते. अनपेक्षितरित्या आयुष्यात संघर्ष करताना हे आपण विसरून जातो. याची विविध वैयक्तिक, व्यावसायिक कारणे असू शकतात. जेव्हा आपले गोंडस बाळ बघतो विशेषत: चेहर्‍यावरील अतिशय गोड हावभाव,झोपतानाचे भाव पाहिल्यावर आईला जणू सुखाचे टॉनिक मिळाल्यासारखेच असते. बाळाच्या हावभावांनी आईच्या चेहर्‍यावरील आनंद एकदम दुणावतो,नकळत ती सुद्धा तसे हावभाव करते. तिचे हे हावभाव बघून बाळाच्या चेहर्‍यावर उमटलेले हसू आईसाठी काही लाखो डॉलरच्या किमतीपेक्षा जास्त असते.

५. आरोग्यविषयक फायदे (स्तनपान )

जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर लहान मुलांसाठी स्तनपानाचे महत्व किती आहे हे सांगत असतात.त्याशिवाय दुसरा कोणताही पोषक आहारातून ती तत्वे बाळाला मिळत नाहीत. स्तनपान देणे सर्वांत चांगल्या आईची ओळख आहे. स्तनपानामुळे हार्मोन्स ऑक्सिटोसिनचे उत्पादन वाढविण्याचे कार्य करते. आईच्या दुधाचे उत्पादन वाढविण्या व्यतिरिक्त ऑक्सिटोसिन हे आईवर सकारात्मक परिणाम करते, तिला आराम देते. संशोधनातून असे स्पष्ट होते की, काही महिन्यातच आईच्या दुधाने बाळाच्या शरीरातील हाडांना बळकटी येते. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा,अंडाशयाच्या,गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका देखील काही अंशी कमी होतो.लहान मूल वाढविणे हा जगातील पूर्णवेळ आणि कोणत्याही धन्यवादाशिवाय केलेली नोकरी असते. परंतु आई होण्याचा अनुभव हा जगातील सर्व अनुभवांपेक्षा खूप सुंदर आणि वेगळा आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon