Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

पालकांची कबुली: नुकतेच पालक झाल्यावर त्यांच्याकडूनही चुका झाल्या होत्या!

पालकांसाठी त्यांच्या बाळाच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाची कोणतीच गोष्ट नसते! आणि बाळाला वाढवणे हे कितीही मनोहर वाटत असले; तरी हे सोपे काम नसतेच (विशेषतः नवीन पालकांसाठी)! कोणत्याही ज्ञान अथवा अनुभवाच्या अभावामुळे पालकांकडून त्यांच्या पहिल्या बाळाला वाढवताना काही चुका घडणे साहजिकच असते. येथे काही नव्या पालकांनी आपले अनुभव कथन केले आहेत, जे सर्व बनणाऱ्या आणि नवीन पालकांसाठी नवी दृष्टी प्रदान करतील आणि त्यांचे पालकत्व सुकर बनवतील!

माझ्या बाळाच्या समस्येवर बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्याऐवजी त्याचा गुगलवर शोध घेतला

आजच्या युगात कोणतीही गोष्ट इंटरनेटवर शोधणे हे सहजसाध्य असते; विशेषतः आरोग्यविषयक समस्या! जवळपास प्रत्येक प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. अनेक पालकांनी कबूल केलेय की, त्यांच्या बाळाने बेचैनीची लक्षणे दाखवली की (जसे की निरंतरपणे रडणे; खाताना, स्तनपान करताना अस्वस्थ होणे, इ.) अशा समस्यांवर अनेक पालक गुगलवर शोध घेताना आढळतील. श्रेया या पालकांसारखीच होती. तिचे बाळ धडपणे खातच नव्हते आणि तिने अनेकांप्रमाणेच यावर गुगलचा आधार घेतला. परंतु त्यावरील माहिती वाचून तिचा अधिकच गोंधळ उडाला आणि समस्या जशीच्या तशीच राहिली. वैद्यकीय मदतीनंतर अर्थातच तिच्या बाळाचे आयुष्य काही महिन्यांमध्ये पूर्ववत झाले. आजही श्रेयाला बालरोगतज्ज्ञाचा वेळेवर सल्ला न घेण्‍याचा पश्चाताप आहे.

माझ्या बाळाला  घट्ट पदार्थ खूप अगोदर खायला घालणे चालु केले

पुष्कळ बालरोगतज्ज्ञ प्रसूतीनंतर किमान सहा महिने स्तनपानाचा सल्ला देतात; जे बाळ आणि आई दोघांसाठी हितकारक असते. तथापि राहुल आणि पीहूचे याबाबत वेगळे मत होते. त्यांचे बाळ अवघ्या चार महिन्यांचे असताना त्यांनी त्याला स्थायु पदार्थ खायला घालणे चालू केले! आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांच्या बालरोगतज्ज्ञाला देखील यात काही वावगे वाटले नाही. सुदैवाने जेव्हा राहुलची मावशी त्यांच्या घरी राहायला आली; तेव्हा त्यांना त्यांची चूक उमगली. त्यांनी दुसर्‍या एका बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेतला आणि अधिक वेळ न दवडता स्तनपान पूर्ववत चालू केले. परंतु एक बालरोगतज्ज्ञ कसा काय चुकू शकतो; हा प्रश्न अजूनही राहुल आणि पीहूला सतावतो.

बाळ रडत असताना त्याला एकटे सोडले

बाळाला नेहमीच प्रेम, ममता आणि सुरक्षेची गरज असते. म्हणूनच जेव्हा त्यांचे पालक (विशेषतः आई) दिसेनासे होतात; तेव्हा बाळे रडताना आढळतात. पहिल्यांदाच आई बनल्यानंतर प्रेरणा खूपच उत्साहीत होती. तिला तिच्या बाळासाठी सगळे काही परिपूर्ण पाहिजे होते. ती पालकत्वाविषयीचे सर्व सल्ले लक्षपूर्वक ऐकायची आणि त्यानुसार वागायचा प्रयत्न करायची. त्यातील एक सल्ला म्हणजे, बाळ रडत असताना त्याला एकटे सोडणे! यामुळे बाळ मानसिकदृष्ट्या कणखर बनेल, अशी यामागील समजूत होती. प्रेरणाने या सल्ल्याचे तंतोतंत पालन केले. पण यात एक समस्या होती: बाळ अवघे दोन महिन्याचे होते आणि हा प्रकार तब्बल सहा महिने चालला! तथापि नंतर प्रेरणाचे डोळे उघडले आणि बाळाचे हाल संपुष्टात आले. तरीही याबाबत विचार करताना प्रेरणाला आजही रडू कोसळते.


मी वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असूनही माझ्या नवजात बाळाला दुध पाजले नाही

नवजात बाळासाठी सर्वाधिक पोषक द्रव्य म्हणजे बाळाच्या आईचे दूध! तथापि सुषमा- एक पाच वर्षीय मुलीची आई प्रांजळपणे कबूल करते की, तिने तिच्या नवजात बाळाला दुध पाजले नव्हते. याचे कारण अद्याप तिलादेखील माहिती नाहीये! अविश्वसनीय आहे; पण खरेय. पहिल्यांदाच आई बनण्याच्या उत्साहाच्या भरात आपण भलतेच काहीतरी करतो आणि सुषमा याचे एक परिपूर्ण उदाहरण आहे. हा प्रकार एका आठवड्यापर्यंत चालला; पण नंतर तिच्या आईला वस्तुस्थिती कळाली आणि मग तिची चांगलीच कानउघाडणी झाली.

मी माझ्या नवजात शिशूला हातातही घेतले नव्हते

बाळाला पहिल्यांदा आपल्या हातात घेणे ही खरोखर एक अद्भुत भावना असते. तथापि प्रणव या भावनेपासून तब्बल एक वर्ष वंचित राहिला. पहिल्यांदाच पिता बनल्यामुळे जेव्हा कोणी त्याला बाळाला कुशीत घ्यायला विचारायचे; तेव्हा त्याला धडकी भरायची. तो घाबरून म्हणायचा, "माझ्या हातून जर बाळ पडले वा त्याला दुखापत झाली, तर काय?" तो एक प्रेमळ पती होता आणि त्याचे बाळावरही निरातिशय प्रेम होते. पण बाळाविषयीची भीती ही प्रेमापेक्षा वरचढ ठरली. योग्य मानसोपचार आणि परिवाराच्या आधारामुळे त्याची भीती हळूहळू नाहीशी झाली. पहिल्या वाढदिवशी केक कापताना प्रणवने बाळ त्याच्या मांडीवर राहील, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यानंतर त्याच्या मनात कसलीही शंका उरली नाही.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon