१) हलका व्यायाम करत रहा
तुम्ही गरोदर असताना दररोज जर हलकासा व्यायाम किंवा शरीराच्या हालचाली करत राहा. यामुळे तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहणार आणि तुमचा स्टॅमिना सुद्धा वाढेल. दररोज व्यायाम आणि शारीरिक हालचाली करण्यामुळे पेल्विक स्नायू (याविषयी लेख वेब साईटवर आहे) मजबूत होतात आणि त्यामुळे वेदना सहन करण्याची ताकद तुमच्यात तयार होते. आणि जर तुम्हाला केगेल हा व्यायामप्रकार माहित असेल तर करत राहा. पेल्विक स्ट्रेच, टिल्टस, डीप स्काटस या व्यायामामुळे कंबर मजबूत होते. त्यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. पण व्यायाम करण्याअगोदर डॉक्टरांना विचारून घ्या.
२) आहार

सकस आहार घ्या. आणि खूप पथ्यनुसार खा. तुमच्या वाढलेल्या वजनाकडेही लक्ष द्या. कारण वाढते वजन नॉर्मल प्रसूती व्हायला अडचणीचे ठरू शकते. बऱ्याचदा काही गर्भवती स्त्रिया खूप वजन वाढवून घेता आणि नंतर त्यामुळे खूप समस्या तयार होतात. जास्तीस्त जास्त पाणी प्या आणि आहार सकसच घ्या कारण गर्भात वाढणाऱ्या बाळाचीही काळजी घ्यायची असते.
३) मानसिक ताण-तणाव दूर करा

मानसिक ताण तणावापासून स्वतःला दूर ठेवा. कारण ह्या मानसिक ताणाचा परिणाम गर्भावर पडत असतो. आणि ह्या दिवसात आरामच असायला हवा शरीराने आणि मानसिक स्थितीनेही. आणि जर काही ताण -तणाव असेल तर जवळच्या व्यक्तीशी बोलून घ्या. त्याच्याने मदत होईल.
४) श्वासाचा व्यायाम किंवा ध्यान

श्वासाचा व्यायाम करा. याचा खूप फरक नॉर्मल प्रसूतीसाठी होत असतो. कारण डिलिव्हरीच्या वेळी वेळो-वेळी तुम्हाला श्वास थांबवायला लागेल. तेव्हा याचा खूप फायदा होतो. आणि बाळालाही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजण मिळतो. त्यासाठी ध्यान किंवा प्राणायम, योग करू शकतात.
५) मालिश करत रहा

गरोदरपणाच्या ७ महिन्यानंतर तुम्ही तुमच्या पोटाची दररोज मालिश करत जा. आणि त्याची आवश्यकताही असते. मालिश करण्यामुळे तुमचे तणाव दूर होऊन प्रसूती कळाच्या वेळी वेदना कमी होतील.
६) चालण्याचा सराव करत रहा

तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज चालण्याचा सराव ठेवा. एका ठिकाणी जास्तीस्त जास्त वेळ बसू नका. हालचाल करत राहा. याच्यामुळे रक्ताचे वहन वेगाने होऊन शरीर तंदुरुस्त राहील. व बाळही तंदुरुस्त राहील.
ह्या उपायांनी तुम्हाला नॉर्मल प्रसूती व्हायला खूपच मदत मिळेल पण तुम्ही तुमच्या प्रसूतीतज्ञ् ला विचारून घ्या की, कोणत्या आणखी उपायांनी नॉर्मल प्रसूती करता येईल. हा लेख ज्या स्त्रिया गरोदर असतील त्यांनाही शेअर करून त्यांची प्रसूती नॉर्मल व्हायला मदत करा.