Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

नोकरी करणाऱ्या मातांनो याप्रकारे स्वत:साठी थोडा वेळ काढा.

ज्या माता बाळंतपणानंतर आपल्या नोकरी किंवा कामावर रुजू होतात त्यांना सुरूवातीच्या काही काळात सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागतो,कारण त्यांच्यावर चहूबाजूंनी जबाबदाऱ्या  येत आसतात. मग ते बाळाचे संगोपन असो, घरातील कामे किंवा व्यावसायिक वचनबध्दता. यातूनही काही माता खरच सुपरमॉम होतात आणि त्यांचे सगळे शेड्यूल बरोबर जुळवून आणतात, तर काही जणी स्वत: साठी वेगळा वेळ देखील काढतात. वेळेचे नियोजन करतेवेळी योग्य किंवा चुकीचा असा कोणताच दॄष्टिकोन नसतो, मात्र सगळ्या गोष्टी एकाच वेळी करताना तुम्ही पुर्ण थकून जात नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. या सगळ्या व्यग्र जीवनशैलीतून स्वत: साठीचा असा वेगळा ‘माझा वेळ‘ राखून ठेवा. असा वेळ जरा ठेवलात तर ते कामावर जाणार्‍या मातांसाठी खरेच चमत्कार करते. अशा प्रकारे तुम्ही बाळाच्या संगोपनचा पुर्ण आनंद घेऊ शकाल आणि नोकरीत देखील स्पर्धात्मक राहू शकाल. खाली काही अशा कल्पना आहेत ज्यामुळे तुम्हाला स्वत: चा वेळ मिळेल.

१. सुपर मॉम अशी कोणतीच संकल्पना नसते 

 एखादी समस्या सोडवण्याची पहिली पायरी म्हणजे ती समस्या आपण प्रांजळ पणे स्विकारली पाहीजे. कामावर जाणार्‍या मातांनी स्वत:लाच कबुली द्यायला हवी की अपूर्‍या वेळेमुळे तिला काही समस्यांना सामोरे जावे लागते. सुपर मॉम अशी कोणतीच संकल्पना नाही. एकदा का या गोष्टीचे ओझे खांद्यावरून उतरले की, तुम्ही बऱ्याच अंशी सुटकेचा नि:श्‍वास टाकू शकता. स्वत: साठीचा वेळ काढण्यासाठीची ही पहिली पायरी आहे.

२. तुमचा आनंद नक्की कशात आहे हे शोधा 

दिवसाच्या अखेरीस हे सत्य नाकारून चालणार नाही की, माझा वेळ आणि तो शोधण्यासाठीच्या प्रयत्नात आईची जबाबदारी कमी होऊ शकत नाही. एकाचवेळी खुप गोष्टी करण्याच्या अट्टाहासापायी आणि रोजच्या ठरलेल्या कामांमध्ये सारखे बदल करण्यापेक्षा नोकरी करणाऱ्या महिलांनी अशा गोष्टी शोधणे गरजेचे असते ज्यातून तुम्ही आनंदी राहू शकता. यासाठी काही जणी ताण कमी करणारी पुस्तके वाचतात, तर काही जणी शॉपिंगला गेल्याने आनंदी होतात.

३.  स्वत: साठी वेळ कधी-कधी काढू शकता याची यादी करा

 

 थोडा आराम करण्यासाठी स्वत: चा असा वेगळा वेळ राखून ठेवणे याचे दर वेळी काही नियोजन केले जाऊ शकत नाही म्हणूनच अशी वेळ आपल्याला कधी मिळू शकते याची एक यादी करून ठेवणे सोयीचे जाते. काही तासांसाठी आजी -अजोबा आपल्या नातवंडांना भेटायला येत असतील, आपले बाळ ठरलेल्या वेळे व्यतिरीक्त कधी झोपते, नोकरीला जाणाऱ्या  मातांनी अशा संधीचा फायदा करून घ्यायला हवा व यावेळेत त्यांना ज्या गोष्टीमध्ये जास्त रुची आहे किंवा आनंद मिळतो अशी कामे करावीत. अशा गोष्टी वारंवार केल्याने तुम्हाला दिर्घकाळ तरुण असल्यासारखे वाटते.

४.  जोडीदारा बरोबर मोकळेपणाने चर्चा करा 

 नोकरी करणाऱ्या  मातांचे काम हे वडीलांपेक्षा जास्ती कष्टाचे आसते, त्यामुळे जोडीदारांमध्ये मोकळेपणाने संवाद होणे तेवढेच गरजेचे आहे. मुलांना भरवणे, त्यांच्याशी खेळ्णे, त्यानां झोपवणे, इ. अशा कामात तुम्ही तुमच्या जोडीदाराची नक्कीच मदत घेऊ शकता. ही अशी कामे तुम्ही पालक म्हणून एकाड एक दिवस वाटून देखील करू शकता. यामुळे तुम्हा दोघांना स्वत:चा राखून ठेवलेला वेळ मिळेल.

५.  कामाचे वर्गीकरण करून प्राथमिकता ठरवा 

नोकरी करणाऱ्या माता  स्वत:चा वेळ शोधण्यासाठी हे सगळ्यात महत्वाचे आहे. तुम्ही करत असलेले सगळेच काम कायमच तेवढे महत्वाचे असतेच असे नाही. काही कामे आपण एक दोन दिवसांनी किंवा आठवड्यांनी केली तरी चालू शकतात. कामाची प्राथमिकता ठरवली की आपल्याला खुप मूल्यवान वेळ मिळू शकतो. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon