Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

स्तनाग्रांतून(Nipple) निघणाऱ्या द्रवाचा रंग काय सुचवतो !

स्तनाग्रातून जाणाऱ्या स्रावाचा किंवा द्रवाचा रंग हा स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आणि चिन्हे असु शकते. बहुतांश स्त्रियांच्या प्रजनन काळात स्तनांतून जाणारे पाणी ही सर्वसाधारण आरोग्यस्थिती आहे. पण स्त्री गर्भवती असली किंवा स्तनपान सुरु असेल तरीही या स्थितीत फार फरक पडत नाही. स्त्रीच्या स्तनातून पाणी येणे ही गोष्ट प्रत्येक स्त्रीला अनुभवास येत असते.

या परिस्थितीत स्तनाग्रातून एक विशिष्ठ तरल पदार्थ बाहेर पडत असतो हे पाणी स्तनाग्रे पिळून किंवा स्तनावर दाब देऊन हे पाणी बाहेर काढून टाकता येते. काही वेळा हे पाणी आपोआपच वाहून जाते पण त्यासाठी काही कालावधी लागू शकतो.

१) स्तनाग्रांतून पाणी जाते याची लक्षणे

या द्रव पदार्थाचा पोत निरनिराळा असतो. काही स्त्रियांमध्ये घट्ट पाणी जाते तर काहींमध्ये अगदी पातळ डिस्चार्ज होतो किंवा चिकट द्रवही बाहेर येतो. कसाही असला तरीही तो शरीराच्या कार्यावर आणि अंतर्गत परिस्थितीवरही अवलंबून असते.

२) आपल्या स्तनाग्रांतून पाणी येते आहे का हे ओळखण्यासाठी काही लक्षणे मदत करु शकतील

* स्तनांचा हळवेपणा

* स्तनाग्रांच्या बाजूला सूज येणे, गाठी होणे

* स्तनाग्रांचा रंग बदलणे आणि पोतही बदलतो.

* वेदनादायी स्तन

* स्तनांभोवती आणि स्तनांवर लालसरपणा

* स्तनांचा आकार बदलणे

* ताप

* मासिक पाळी चुकणे

* थकवा

३) स्तनांग्रामधून पातळ द्रव येतो त्यातही विविध प्रकार असतात

स्तनाग्रांमधून जो स्राव बाहेर पडतो त्याचे गांभीर्य खालील घटकांवर अवलंबून असते.

१.१) सतत स्राव येणे

स्तनाग्रे न पिळता स्राव बाहेर पडत असेल तर काळजी कारण निश्चितच आहे. हा स्राव अंतर्वस्त्रांवर आणि रात्रीच्या कपड्यांवर जमा होतो आहे का याची तपासणी करा. मालिग्नंट म्हणजे घातक प्रकारातील स्तनांचा कर्करोगाची ही लक्षणे असू शकतात ज्याची त्वरीत तपासणी डॉक्टरांकडून होणे गरजेचे आहे.

१.२) स्रावाचा रंग

अनेक स्त्रियांनी त्यांच्या स्तनाग्रांमधून निघणाऱ्या स्रावाचा रंग निरनिराळा असल्याचे अनुभवले आहे. स्रावाचे कोणते रंग आहेत आणि त्याचा अर्थ काय ते पाहूया.

हिरवा- सिस्ट किंवा स्तनांमध्ये गाठी असण्याची शक्यता

पांढरा, करडा, पू असलेला पिवळसर - स्तन किंवा स्तनांग्राचा संसर्ग

चीझसारखा किंवा तपकिरी- दुधाच्या गाठी असणे

रक्तमिश्रित स्राव- स्तनांचा कर्करोग

पारदर्शक - असा स्राव प्रामुख्याने कर्करोगाचे लक्षण असू शकतो जर हा स्राव एकाच स्तनातून बाहेर पडत असेल तर.

१.३) स्तनाग्रांची छिद्रे

स्तनाग्रे पिळून हा स्राव बाहेर पडताना तर विविध छिद्रांतून बाहेर पडत असेल तरीही तो सुरक्षित असतो. पण एकाच छिद्रातून किंवा जागेवरून सतत स्राव बाहेर पडत असेल तर त्वरीत डॉक्टरकडून तपासणी करुन घेणे इष्ट आहे.

४) स्तनाग्रांतून स्राव म्हणजे कर्करोग आहे का ?

स्तनाग्रातील स्राव बाहेर पडणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते जर स्तनांमध्ये दुधाच्या गाठी मुळे स्राव येत असेल तर. जर स्तनांचा कर्करोग असेल तर फक्त एकाच स्तनाग्रातून स्राव बाहेर पडेल आणि स्तनाग्रांच्या भोवती गाठी तयार झाल्याचे आपल्या लक्षात येईल.

काहीही असले तरीही स्तनाग्रांतून स्राव येणे किंवा पाणी जाणे म्हणजे आपल्याला स्तनांचा कर्करोग आहेच असे गरजेचे नाही. ज्या स्त्रिया डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेतात त्यापैकी केवळ ३-९ टक्के स्त्रियांनाच कर्करोग झालेला असतो. मात्र याचा अर्थ असा नव्हे की शरीर दाखवत असलेल्या ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon