Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

नव्या मातांच्या “या” गोष्टी डॉक्टरांना वैताग आणतात

   एकदा माझ्या आईला मी विचारले ,"आज एका अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मी मदत केली,त्याला मदत करून मला खूपच बरे वाटले. आई,तू अशी कोणती गोष्ट केली आहेस का ?" आईने उत्तर दिले, ''हो,तुला जन्म दिला."

तो नऊ महिन्यांचा काळ म्हणजे आयुष्यातील नितांत सुंदर दिवस असतात,हो ना? तुमच्या पोटात एक जीव वाढतोय हि जाणीव अतिशय सुखद आणि रोमांचक असते. आरशामध्ये स्वतःचे वाढलेले पोट बघूनच तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलते.

आणि जेव्हा प्रसूतीचा तो दिवस उगवतो सगळे काही जादुई वाटायला लागते. एका जीवाला जन्म देणे नक्कीच सोपे नसते पण त्यानंतर मिळणारा आनंद स्वर्गीय असतो!

आई बनण्याच्या या प्रवासात खूप महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या डॉक्टरांना तुम्ही कधी विचारले आहे का कि एका आईला मदत करतांनाचा त्यांचा अनुभव कसा असतो?तुम्हाला जितके गोड आणि सुंदर अनुभव येतात तसेच तुमच्या डॉक्टरांनाही वाटते का? याचे उत्तर कदाचित"नाही" असे आहे!!

तर पाहूया ,तुमच्या कोणत्या गोष्टी मुळे डॉक्टर अक्षरश: वैतागतात .

१] तुमच्या बालरोगतज्ञाकडे जाण्याअगोदर तयारी ना करता जाणे

आजारासंबंधी डॉक्टरांच्या सर्व शंका आणि प्रश्नांना चटकन उत्तरे देणारे रुग्ण डॉक्टरांना चांगले वाटतात.हॉस्पटल हि विचार करत बसण्याची जागा नसते ,हो ना?

२] प्रसुतीपूर्व तपासणी केली नाही तरी चालेल,असा विचार करणे

अजिबात नाही. प्रसूतिपूर्व तपासणी करवून घेणे खूप आवश्यक असते. तुमचे आणि बाळाचे आरोग्य उत्तम ठेवण्याची हि गुरुकिल्ली आहे हे लक्षात घ्या. निदान तुमच्या बाळाच्या हिताचा विचार करा आणि प्रसूतिपूर्व तपासणी अजिबात टाळू नका.

३] कामाच्या वेळेनंतर हि डॉक्टरांना त्रास देणे

दवाखान्या बाहेर डॉक्टर स्वतःचे खाजगी आयुष्य जगत असतात. अगदी किराणा दुकानात सहज भेट झाली तर तुमच्या बालरोगतज्ज्ञांना आजारासंबंधी प्रश्न विचारुन हैराण करू नका.असे करून तुम्ही स्वतःची किंमत कमी करून नका.

४] आधीच्या डॉक्टरांबद्दल तक्रार करणे

सध्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे या आधीच्या डॉक्टरबद्दल तक्रार करणाऱ्या रुग्णावर उपचार करणे कोणत्याच डॉक्टरांना आवडत नाही.

५] आजाराच्या लक्षणांचा बागुलबुवा करणे

तुम्हाला किती वेदना होत आहेत हे डॉक्टरांना समजते .हे सिद्ध करण्याची गरज नसते.

६] लक्षणे जाणवण्या आधीच डॉक्टरांना भेटणे

तुमची प्रसूतीची तारीख ५ दिवसानंतरची आहे ? अजून प्रसूतिवेदना हि जाणवत नाहीयेत?स्त्राव हि होत नाहीये?तर डॉक्टरांना घाई करू नका.

७] प्रसववेदना होत असतांना पतीला प्रसूतिगृहात नेणे

तुमच्या पती ने जे करायला हवे होते ते त्याने काही महिन्याअगोदरच करून दाखवले आहे!! या वेळेला त्याच्या सोबतीची गरज नाही. तुमचे धैर्य वाढवण्यासाठी का ?हे सर्व तुम्हाला एकट्यानेच पार पडायचे आहे.

८] पतीला सर्व प्रसुतीचे चित्रण करायला लावणे

प्रसूतिगृहात तुमच्या पतीच्या असण्याने आधीच कमी वैताग आणला नाहीये! त्यात हे चित्रण कशाला?? 

९] अति खाणे

हो,गर्भावस्थेत तुम्हाला खूप खावेसे वाटते पण जास्त खाण्याने अपचन होऊन अन्न पोटात तसेच शिल्लक राहते . अशा वेळी भूल द्यावी लागली तर ते धोकादायक ठरते.

१०] प्रसववेदना होत असतांना हालचाल न करणे

कळा येत असतांना हालचाल करण्याने नर्सला तुमच्या एकूणच अवस्थेचा अंदाज घेणे आणि गुंतागुंत टाळणे शक्य होते. अजिबातच हालचाल न करण्याने तुम्हाला जास्त वेदना जाणवतील.

११] प्रसूतिकळा देत असतांना घड्याळाकडे बघणे

तुमचे डॉक्टर तुमची आणि तुमच्या वेदना,या दोन्हींची काळजी घेत असतात. तुमच्या इतकेच त्यांच्यासाठी हि सर्व गोष्टी वेळखाऊ आणि दमवणाऱ्या असतात. 

हि यादी तशी न संपणारी आहे. पण लक्षात ठेवा,यातील कोणत्याही गोष्टी तुम्ही करू नका आणि हेच तुमच्या नातेवाईक,मित्र-मैत्रिणींना हि सांगा. यातील काही विसरलात तरी चालेल पण डॉक्टरांना त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी नक्की टाळा. शेवटी आनंदी डॉक्टर=आनंदी प्रसूती =तुम्ही आनंदी

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon