नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला बघायला जाताना ही काळजी घ्या.
घरात बाळा जन्माला आलं की सगळ्या नातेवाईकांना त्याला बघण्याची उत्सुकता लागलेली असते.पण हे नुकतेच जन्माला आलेले बाळ हे खुप नाजूक असते त्यामुळे त्याला बघायला जाल त्यावेळी काही गोष्टींची कटाक्षाने काळजी घेण्याची आवश्यकता असते ती कोणती ते आपण पाहणार आहोत
शक्यतो बाळा बाळंतीण घरी आल्याशिवाय बाळाला बघायला टाळावे कारण सुरवातीच्या काही दिवसात बाळ खूप नाजूक असते आणि त्याला इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते.
१. हाताची स्वच्छता
बाळाला बघायला गेल्यावर बाळा शक्यतो लांबून पाहावे आणि जर बाळाला घेणारा असाल तर आधी हात स्वच्छ धुतल्याशिवाय बाळाला हातात घेऊ नये बाळाची रोगप्रतिकारक फारच कमी असते त्यामुळे बाळाला इन्फेक्शन ऍलर्जीं होण्याची शक्यता असते
२. बाळाच्या तोंड जवळ तोंड नेऊ नये
नवजात बाळाचा पापा घेण्यासाठी, त्याचाशी बोलण्यासाठी त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊ नये.यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते
३. प्रकारचे व्यसन करून जाऊ नका
बाळाला बघायला जाताना तंबाखू, सिगरेट, दारू,गुटखा अश्या कोणत्याही प्रकारचे व्यसन करून जाऊ नये यामुळे बाळावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
४. गर्दी करू नये
तुम्हांला बाळाला बघण्याची कितीही उत्सुकता असली तर बाळ आणि बाळंतिणीला या काळात आरामाची गरज असते त्यामुळे सगळ्यांनी एकदम गर्दी करून बाळ आणि बाळंतिणीला त्रास होईल असे वागू नये . आणि लहान मुलांना बरोबर नेणार असाल तर त्यांना देखील स्वच्छतेबाबत समजवावे
५. मोठं-मोठ्याने बोलू नये
बाळाला बघायला गेल्यावर तिकडे मोठं-मोठ्याने बोलू नये अश्याने बाळ दचकून जागे होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय येतो व बाळाचा पूर्ण दिनक्रम बिघडण्याची शक्यता असते.
यामुळे बाळाच्या या सुरवातीच्या दिवसात काही गोष्टी पाळणे बाळाच्या आरोग्यासाठी गरजेचे असते
