Link copied!
Sign in / Sign up
42
Shares

नवजात बालकाची काळजी घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.


प्रसूती नंतर आपल्या एवढ्याश्या पिल्लाला घरी आणणं ही जेव्हढी आनंदाची गोष्ट असते, तेवढीच काळजीची देखील. बाळाची आपण योग्य काळजी घेऊ ना ? बाळाला काही त्रास तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न आईच्या मनात येत असतात. म्हणूनच नवजात बाळाची काळजी कशी घ्यायची याबाबतच्या काही टिप्स देत आहोत. ज्या तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरतील.

१. वेळच्या-वेळी स्तनपान द्या. 

नवजात बाळाचं पोट भरत आहे ना ? हे जाणून घेणे सुरवातीला अवघड पण आवश्यक असते.पण सवयीने याचा अंदाज यायला लागतो. वेळच्या-वेळी स्तनपान देण्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रकारे होते. यासाठी बाळाच्या वजनाबाबत डॉक्टरांकडून माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणत बाळाचे वजन वाढत आहे ना ? यावर लक्ष ठेवा.

२. बाळाला ढेकर येऊ द्या.

बाळ स्तनपान करत असताना पोटात हवा जाते आणि त्यामुळे बाळच्या पोटात हवेचा गुबारा होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला स्तनपान देऊन झाल्यावर किंवा भरवून झाल्यावर. खांद्यावर डोके ठेऊन पाठीवरून हळुवार हात फिरवून ढेकर येई पर्यंत उभे धरा. यामुळे बाळाच्या पोटात गॅस धरणार नाही तसेच दूध लवकर पचायला मदत होईल.

३. बाळाला उचलताना मानेला /डोक्याला आधार देऊन पकडा

तुमच्या छोट्याश्या पिल्लामध्ये अजून मान धरण्या इतपत क्षमता नसते, त्यामुळे त्याला उचलून घेताना किंवा कोणाला उचलून देताना त्याच्या मानेला ,डोक्याला आधार देणे आवश्यक असते. तसेच बाळाला पकडताना संभाळून पकडावे.

४. बाळाचे रडणे

भूक लागणे, अस्वस्थता, दमलेला ,लागणे ,खुपणे या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुमच्या पिल्लाकडे रडणे हा एकाच मार्ग असतो. त्यामुळे बाळाच्या वेळापत्रकानुसार बाळाच्या रडण्याचा अंदाज लावण्याच प्रयन्त करा. तसेच बाळ खूप रडत असेल आणि त्याचे रडणे थांबतच नसेल तर त्याला काही चावत नाही ना काही दुखत नाही ना याची खात्री करून घ्या तसेच त्याबाबत डॉक्टरांना कल्पना देऊन त्यांचा सल्ला घ्या.

५. काळजीपूर्वक खेळा

नवजत बाळाशी खेळताना काळजी घेणे आवश्यक असते. त्याला उंच-उंच उडवणे त्याला जोर-जोरात हलवणे यामुळे बाळला अंतर्गत रक्तस्तव होऊन इजा होण्याची शक्यता असते. तसेच इतर लहान मुलांना देखील तुम्ही किंवा कोणी मोठे आसपास असतानाच बाळाशी खेळू द्या. कारण त्या मुलांना कडून खेळताना अजाणतेपणी काही चूक होण्याची शक्यता असते. ज्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते.

 

६. अंघोळ

नवजात बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला. त्याला/तीला सुरवातीच्या दिवसात स्पंजींग करणे देखील योग्य ठरते. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाला अंघोळ घालताना मृदू साबण वापर त्याने बाळाच्या त्वचेला त्रास होणार नाही. नवजात बाळासाठी कोणत्याही प्रकारचे उत्पादन जसे साबण,तेल ,पावडर वापरताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अंघोळ घालताना पाणी बाळाच्या नाका तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या तसेच बाळाला जास्त वेळ गारठ्यात आणि ओले ठेऊ नका.

७. नखे

बहुतांश बाळांची नखे ही खूप वेगाने वाढतात त्यामुळे ती योग्यवेळी कापणे गरजेचे असते. नाहीतर बाळ स्वतःच्या नखाने स्वतःला इजा करून घेण्याची शक्यता असते. आणि नंतर त्याचा त्रास बाळाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे बेबी नेलकटर ने नखे कापावी किंवा सतत हात मोजे घालावे.

८. नाळेची काळजी

बाळाच्या पोटाला उरलेली नाळचा काही भाग तसाच असतो. अंघोळीच्या वेळी किंवा बाळाची स्वच्छता करताना या भागाची काळजी घेणे अवश्यक असते. तसे हा भाग लालसर किंवा या भागातून काही द्रव,रक्त पु येत असेल तर त्वरित डॉक्तरांशी संपर्क साधा.

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon