Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

नवीन वर्षांला बाळाचा जन्म ही हौस की गरज !


नवीन वर्ष येत आहे. सर्वांनाच नवीन वर्षांबद्दल खूप उत्साह असतो. नवीन वर्षाचा सूर्य पाहण्यासाठी कोणी गोवाला जातो, तर काही कोकण, माथेरान, लोणावळा किंवा महाबळेश्वर तेव्हा प्रत्येकजण कुठे ना कुठे नवीन वर्षाच्या सूर्य पाहण्यासाठी जात असतो. तर हे कशासाठी तर हे नवीन वर्षांची चांगली सुरुवात करण्यासाठी काहीतरी सकारात्मक ऊर्जेसाठी. पण ह्यात काही पालक हे नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या बाळाला जन्म त्याच दिवशी देऊन करत असतात. तेव्हा त्याविषयी ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.

१) सुरुवात अमेरिकेत

नवीन वर्षाला बाळाचा जन्म व्हायला हवा आणि तेही रात्री अचूक १२ वाजता. अशी सुरुवात अमेरिकेतील काही मॉम्स कडून झाली. आणि आता अमेरिकेत त्यावर टॅक्स ही आकारला जातो. आणि आता न्यू इयर बेबी पाहिजे म्हणून आता जगातल्या सर्व देशातील पालक उत्सुक असतात.

२) आता भारतात सुद्धा काही पालक न्यू इयर बेबी चे स्वागत करण्यासाठी न्यू इयर बेबी प्लॅन करतात. पण हे सर्व करत असताना आपल्या बाळाच्या प्रकृतीवर काही परिणाम होत असतो का ? ह्याचा विचार आपण करत नसतो. कारण अमेरिकेत काही मॉम्स तर “मला ह्याच नव्या वर्षीच्या ह्या ह्या वेळेवर म्हणजे अचूक मध्यरात्रीचे १२ वाजून इतक्या -इतक्या सेकंदांनी बाळाचा जन्म व्हायला पाहिजे.” त्यासाठी ते बाळाला त्या त्या वेळेला पुश करणे. अशा गोष्टी केल्या जातात.

३) पण ह्या पुश करण्यात आणि डिलिव्हरी करणे इतके सहजासहजी सोपे नसते तेव्हा बऱ्याचदा अचूक वेळेला प्रसूती काही होत नाही. आणि मनाला हवी तशी अचूक वेळेत बाळाचा जन्म काही होत नाही.

४) ही गोष्ट फॅड आहे की, गरज किंवा हौस

खरं म्हणजे ही गोष्ट हौसच म्हणता येईल. पण ही हौस काही वेळेस जीवघेणी ठरू शकते ह्याचा विचार आपण करत नाहीत. विदेशात अशी बरीच हॉस्पिटल आहेत की, ते न्यू इयर बेबी साठी डिलिव्हरी करत असतात. आणि त्यासाठी ते सर्व तयारी करून ठेवतात. ह्यात बऱ्याचदा त्या स्त्रीच्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. कारण तुम्ही नैसर्गिक प्रसूतीच्या विरुद्ध जात असतात.

५) आपल्या कडे काय परिस्थिती ह्याबाबत

आपल्याकडेही न्यू इयर बेबी प्लॅन करायला लागली आहेत पण त्यात ह्याच अचूक वेळेला पाहिजे असे नाही. आणि खूप कमी हॉस्पिटल किंवा डॉक्टर ह्यासाठी तयार असतात. पुण्या व मुंबईत आणि काही ठिकाणी अशा डिलिव्हरी होत आहेत.

६) ह्याबाबत काय दक्षता घ्यावी

१.१) जर तुमची प्रसूतीची वेळ त्या दिवशी येत असेल किंवा २ ते ४ दिवस इकडे तिकडे असेल आणि डॉक्टरांनी (चांगल्या) जर सांगितले की, नाही करू शकत त्याच दिवशी तुमची प्रसूती तर तुमची हौस सोडायची. कारण त्यात तुम्हाला व बाळाला धोका पोहोचू शकतो.

२.१) सर्वच तपासण्या करून घ्याव्यात आणि त्यानुसारच निर्णय घ्यायचा.

३.१) ह्यामध्ये त्या स्त्रीचे व होणाऱ्या आईच्या मनाचा कौल घ्यावा.

४.१) लक्षात घ्या : विदेशातल्या हॉस्पिटलमध्ये आपल्यापेक्षा अत्याधुनिक साधने उपलब्ध असल्याने त्यांना ते शक्यही होत असेल पण त्याचे अंधानुकरण करू नका. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon