Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

नवीन वर्षाची सुरवात या सोप्प्या आरोग्यदायी सवयींनी करा.


आपण नेहमी ऐकत आलॊ आहोत.आरोग्य हीच संपत्ती आहे, परंतु आपण या गोष्टीकडे फार दुर्लक्ष करतो. तर या नवीन वर्षी या काही सोप्प्या आरोग्यदायी सवयीने नवीन वर्षची सुरवात करा.

१. नियमित व्यायाम करा.

स्वतःला व्यायाम करायची सवय लावून घ्या. दररोज ४० मिनीटे तरी आर्वजून व्यायाम करा. व्यायामाला तुमच्या दिनचर्येत प्राधान्य द्या. योगासन यांना वेळ द्या.

२. आहार 

योग्य सकस असा आहार घ्या. ज्यामध्ये कच्च्या भाज्या,कडधान्य, फळे याचा समावेश करा. तसेच जंक फूड बाहेरील तेलकट पदार्थ यांचे सेवन शक्यतो टाळा. जेवणाच्या वेळा ठरवून त्या पाळा. कितीही महत्वाचे काम असले जेवणासाठी वेळ काढा. कितीही घाई असली तरी सकाळची न्याहरी चुकवू नका. 

३. पुरेसा पाणी प्या.

आजारांपासून आणि डॉक्टरांपासून दूर राहायचे असल्यास दररोज दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणातील पाण्याचे सेवन वजन कमी करण्यास, पचन चांगले होण्यास आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

४. पुरेशी झोप घ्या.

सध्याच्या जीवनशैली मुळे जेवण बरोबरच झोपेचे तंत्र बदलेले आहे. पुरेशी झोप योग्य वेळी मिळाली नाही की आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. रक्तदाब, मधुमेह संबधीत आजारांचा धोका वाढतो. योग्य प्रमाणात अन पुरेशी झोप घेतल्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. शरीर-मनाला आराम मिळून त्यांना नवी ऊर्जा मिळते.

५. मानसिक स्वास्थ्य

दिवसभरातून स्वतःसाठी वेळ द्या. थोड्या वेळाकरता सगळे विचार दूर सारून शांत राहण्याचा प्रयन्त करा. यामुळे तुमची विचार करण्याची,आकलन करण्याची क्षमता वाढेल तसेच. मनशांती मिळेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon