Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराशी कशासंबंधी बोलायला हवे ?

 

जसा जसा लग्नाच्या मुहूर्तांचा काळ जवळ येत आहे तसे तसे होणाऱ्या वधू-वरांना मनात प्रश्न पडले आहेत. खास करून ज्यांचे लग्न अरेंज पद्धतीने होत आहे त्यांच्यासाठी काय बोलावे आणि काय नाही बोलावे यासाठी मनात असंख्य प्रश्न आहेत. आपल्या जोडीदाराला पूर्णपणे जाणून घेण्याची सगळ्यांनाच इच्छा असते. इथे आम्ही एक यादी दिली आहे ज्याविषयी तुम्ही आपल्या साथीदारासोबत बोलणे गरजेचे ठरते

१. अपत्य 

सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न असतो की लग्नानंतर कधी आणि किती अपत्ये होऊ द्यायची. अनेकदा जोडप्यांमध्ये याविषयी स्पष्टता नसते. कधी कधी तिला २ अपत्ये हवी असतात तर त्याला एकाच अपत्य पुरेसे वाटते. यातून दोघांमध्ये शीतयुद्ध चालते. चिडचिड होते, मतांचा आदर केला जात नाही अशा तक्रारी सुरु होतात. यासाठी दोघांनी मिळून आधीच निर्णय घेणे आणि सहमतीने पाउल  उचलणे योग्य ठरेल.
अजून एक म्हणजे गर्भ निरोधन कशाप्रकारे करायचे ह्याचाही विचार दोघांमध्ये झाला पाहिजे.

२. घर

‘जिथे मन रमते, तिथे घर वसते’ असं म्हणतात तसाच तुमच्या नात्याचे मन कुठे रमते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी तुमचा व्यवसाय, नोकरी आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन घर कुठे असावे यासंबंधी सविस्तर चर्चा झाली पाहिजे. मुलांचे शिक्षण, नोकरीचे ठिकाण, कुटुंब, आई-वडील ह्यांचे राहण्याचे ठिकाण यासंबंधीदेखील विचार व्हायला हवा. कोणाला विभक्त कुटुंबात राहायचे असते तर कोणाला आई-वडिलांसोबत राहायचे असते. त्यासाठी शहर, जागा आणि प्रवासाच्या दृष्टीने घर घेणे सोयीस्कर ठरते.
दोघांची मते लक्षात घेऊनच हा निर्णय घेता येईल.

३.  शेअरिंग इज केअरिंग !


आजकालच्या या सोशल मेडिया च्या जगात एकमेकांना आपल्या ऑनलाईन खात्यांची माहिती आणि पासवर्ड देणे यासाठी एकमेकांत तेवढा समजूतदारपणा आणि विश्वास असायला हवा. इतर बँकेतील खाते आणि आर्थिक स्त्रोतांची माहिती एकमेकांना देणे गरजेचे आहे. याचा नियोजन करण्यास खूप फायदा होतो.

४. एकमेकांमधील दुरावे मिटवणे

कोणतेही लग्न हे परफेक्ट नसते. नात्यांमध्ये काही प्रमाणात मतभेद आणि रुसवे-फुगवे असतातच. यासाठी आधीच संयुक्त नियोजन करायला हवेच. तुम्हा दोघांनाही कोणत्या गोष्टीने फरक पडतो किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात यासंबंधी एकमेकांना सर्व सांगा. तुमच्या सवयी आणि एकमेकांबद्दलची मते वाटायलाच हवीत. माझ्या चुलत बहिणीत आणि तिच्या नवऱ्यात यासंबंधी स्पष्ट नियम आहेत. जर दोघांमध्ये एकमेकांविषयी काही तक्रारी असतील किंवा शंका असतील तर यांचे निरसन रात्री झोपण्याआधीच एकमेकांत होते. एकमेकांशी याविषयी बोलण्याआधी ती गोष्ट बाहेर कुटुंबाच्या इतर सदस्यांना किंवा मित्रांसोबत शेअर केली जात नाही. त्या दोघांमध्ये कामे देखील वाटून घेतली जातात. अशाने सामंजस्य वाढते. कोणतीही गोष्ट चर्चा करून नक्कीच सोडवता येते.

. ध्येय

लग्नाच्या पवित्र बंधनात अडकल्यावर दोन व्यक्तींचे वेगळे प्रवाह आणि प्रवास एकत्र होतात. दोघांची स्वप्ने आता एक होतात. यासाठी सर्वात महत्वाचे आहे की तुम्ही तुमचे वैयक्तिक ध्येय एकमेकांना सांगावे. याविषयी बोलते होणे म्हणजे एकमेकांच्या स्वप्नांचा आदर करणे. माझ्या एका काकूंना वल्ड टूर वर जायचे होते, त्यांनी कधीच ही गोष्ट काकांना बोलून दाखवली नाही. काकाही जरा मितभाषी आणि लाजाळू असल्यामुळे त्यांनीही कधी विचारले नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागला. तेंव्हा मुद्दा असा आहे की – बोलते व्हा! शेअर करा!


6. भूतकाळ

लग्न म्हणजे नवीन सुरुवात. भूतकाळातील नातेसंबंध आणि हेवेदावे मागे ठेवून पुढे जाणे हेच योग्य. एकमेकांना समजून घेऊन यासंबंधी महत्वाचे पाऊल पुढे पडायला हवे. याने तुम्हा दोघांमधील असुरक्षिततेची भावना कमी होईल. स्पष्टता वाढेल. एकमेकांना भूतकाळाविषयी संपूर्ण कल्पना देणे दोघांमधली आत्मीयता वाढवेल.
एकमेकांशी भांडण्यापेक्षा नात्यातील प्रश्नांवर दोघांनी एकत्र येऊन समस्या सोडवायला हवी.

७. नात्याविषयी

चर्चा ही जगातल्या कोणत्याही गोष्टीवर घडू शकते. पण एकमेकांशी एकमेकांबद्दल बोलणे म्हणजे नाते जपणे होय. तुम्ही दोघे कसे प्रेमात पडलात इथपासून आज एकमेकांशी कसे बोलणे होते याविषयी बोला. एकमेकांच्या सवयींचे कौतुक करा. एकमेकांना जाणून घ्या. एखादी छानशी डायरी किंवा बोर्ड लावून त्यावर तुमच्या दोघांमधील जिव्हाळ्याचे क्षण टिपून ठेवा.



Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon