Link copied!
Sign in / Sign up
191
Shares

नवऱ्याला आज ही प्रश्न नक्कीच विचारा !

         संवाद : हा नवऱ्या आणि बायको मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. ह्यामुळे दोघांची हृदय ही मनमोकळ्याप्रमाणे एकमेकांशी संवाद करतात. आणि ह्याचमुळे व्यक्ती हा खूप चांगल्या पद्धतीने समजून येत असतो.

खाली काही प्रश्ने दिलेली आहेत ती तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारा. आणि आज व्हॅलेंटाईन दिवस आहे म्हटल्यावर नवरा आज तर खूप गुलु गुलु गप्पा करणार आहे. तेव्हा काही प्रश्ने विचारून घ्या.

१) तुम्हाला केव्हा माझ्यावर प्रेम झाले ? म्हणजे पाहिल्यावर की, माझ्या स्वभावावरून?

२) मला पहिल्यांदा पाहिल्यावर तुझे मत काय होते ?

३) आपल्या लग्नामधील कोणती गोष्ट तुम्हाला खूप आवडली?

४) लग्नातली अशी कोणती गोष्ट आहे की, त्यामुळे तुम्हाला आजही खूप हसू येते?

५) आपल्या दोघांच्या लग्नाची सर्वात बेस्ट वेळ कोणती ?

      ६) तुला माझ्याविषयी कोणती गोष्ट आवडत नाही आणि ती बदलायला हवी ?

७) तुला कुठे किस करायला आवडते ?

८) मी तुला उत्तम नवरा आणि चांगला बाप होण्यासाठी कशी मदत करू ?

९) तुला माझ्यावर राग आल्यावर तुला त्यावेळी काय वाटते ?

१०) तुझ्यावर मी कसे प्रेम व्यक्त करावे असे वाटते ?

११) तुला वाटते का ? लग्नाच्या वेळी आणि आज आपल्यात खूप बदल झालेला आहे ?

१२) तुझे मुलांविषयीचे काय मत आहे ?

आजच्या दिवशी तुम्ही हे प्रश्न नवऱ्याला विचारा. आणि खूप मनमोकळा संवाद तुमच्यात होऊ द्या. आणि लक्षात असू द्या की, तुम्ही त्याच्यासाठी आणि तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. म्हणून तुम्ही दोघांमध्ये खूप मोकळ्यापणाने बोलायला हवे. कारण तुमचे नाते खूप काळासाठी राहणार आहे. आणि खूप कठीण गोष्टी आणि संकटे तुमच्यावर येतील तेव्हा तुम्हाला दोघांनाच त्या गोष्टी सांभाळायच्या आहेत.

हा शेवटचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. १३) मी तुला कधी खूप कंटाळवाणी वाटते ?

ह्या प्रश्नांची उत्तरे नवरा काय देईल? किंवा त्याला ह्यात किती आवड आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण ह्यातून तुमचा रोमान्स फुलत असतो. त्या रोमान्समध्ये दररोज नाविन्यता येत असते. आणि दोघांची जोडी खूप खूप घट्ट होते.

तर आज ही प्रश्ने नवऱ्याला नक्कीच विचारा आणि लेख कसा वाटला त्याविषयी नक्कीच आम्हाला सांगा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
100%
What?
scroll up icon