Link copied!
Sign in / Sign up
47
Shares

नवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.

ज्यावेळी तुम्ही बाळाला पहिल्यांदा कवेत घेतात त्यावेळी तुम्हांला तुम्हांला जाणवते ते पिल्लू किती नाजूक असते. त्याची हातांची-पायांची बोटं किती नाजूक असतात. तसेच बाळाची त्वचादेखील आपल्या त्वचेपेक्षा वेगळी आणि अत्यंत नाजूक असते .

बाळाची त्वचा हि नेहमी नितळ आणि खूप पातळ अशी त्वचा हि अदभूत असते या त्वचेबाबत अनेक मातांना नेहमी प्रश्न पडत असतात.. अश्या बाळाच्या त्वचेविषयी जाणून घेऊया

१. अंगावर दाट लव (केस )असणे.

काही बाळांना जन्मतःच अंगावर जन्मतःच जास्त प्रमाणत लव असते. ही फार सामान्य गोष्ट असून यात घाबरून जाण्यासारखे काही नाही हे केस काही दिवसात अंघोळ घालायला सुरवात केल्यावर निघून जातात. पण प्रमाणाबाहेर अंगावर केस असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. तेलकट पिवळसर किंवा पांढरा मेणासारखा थर

बऱ्याचदा काही बाले जन्माला आल्यावर त्यांच्या अंगावर तेलकट मेणासारखा एक पांढरा किंवा पिवळसर थर आढळतो.. हा थर बघून घाबरून जाण्यासारखे काही नाही कारण याला व्हर्निक्स वॅक्स किंवा व्हॅर्निक्स केसोस असे म्हणतात. हा थर बाळाला पोटात असतात त्याची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी असतो. आणि बाळाच्या त्वचेचे संरक्षण करण्याचे काम देखील हा थर करत असतो. हा थर जास्त प्रमाणात असल्यास तो काढण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जर घ्यावा

३. त्वचेचा रंग बदलणे

बऱ्याचदा बाळाच्या त्वचेचा रंग सुरवातीचे काही महिने बदलत असतो. कधी-कधी बाळची त्वचा थोडी काळवंडते तर कधी कधी उजळ होते सुरवातीचं काही महिने हे बदल बाळाच्या त्वचेबाबत होत असतात.. बाळाचं मूळ रंग हा गुणसूत्रांवर अवलंबुन असतात.

४. पातळ त्वचा

काही बाळांचे गाल जरी गुबगुबीत असले तरी त्यांची त्वचा अगदी मऊ आणि पातळ असते. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरज असते.नाहीतर बाळाला विविध प्रकारच्या त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात , तसेच रॅशेस येण्याची शक्यता असते. हळू-हळू बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी बाळाची त्वचा तयार होते. तो पर्यंत बाळाची त्वचाची काळजी घेण्याची गरज असते.

५.बाळाची त्वचा लवकर कोरडी आणि ओलसर होते.

नाजूक-पातळ त्वचेमुळे बाळाची त्वचा हवेतील आद्र्रता लवकर शोषून घेते आणि तसेच बाळाची त्वचा लवकर कोरडी देखील पडते . त्यामुळे या काळात बाळाच्या त्वचेसाठी त्वचा मऊसर राहील आणि कोरडी पडणार नाही यासाठी सौम्य क्रीम लावावे

६. पिवळसर त्वचा

जन्माच्या ३-४ आठवड्यानंतर काही बाळांची त्वचा पिवळसर असते हे लहान मुलांना होणाऱ्या काविळचे लक्षण असते. बऱ्याच नवजत बाळांना कावीळ होत असते कारण नवजात बाळाच्या (लिव्हर) यकृत विकसीत होत असते, आणि त्यामुळे बिलरुबीनची पातळी नियंत्रित करणे बाळाला शक्य होत नाही आणि त्याला कावीळ होते. जसं बाळाला नियमित स्तनपान सुरु होते तसं-तसं ही समस्या कमी व्हायला लागते आणि बाळाची त्वचा पिवळसर दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon