Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

नवजात बाळाची स्वच्छता केव्हा आणि कशी कराल.

ज्यावेळी घरात एखादं बाळ येतं त्यावेळी घरातलं सगळं वातावरण कसं त्याच्या येण्याने प्रसन्न होऊन जातं. बाळाच्या हुंकार,बाळाचे हसणे सगळ्यांना आनंद देणारं असतं. त्या बाळाच्या आईचा दिवसातला सगळा वेळ बाळाची काळजी घेण्यात जात असतो. आणि दिवस कसा संपतो हे आईला कळत देखील नाही.

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, बाळाची त्वचा ही किती नाजूक असते. बाळ नवजात असताना त्याला स्पर्श करताना देखील खुप विचार करून काळजीपूर्वक करावा लागतो. म्हणून सुरवातीला वापरून मऊ झालेली दुपटी, लंगोट बाळाला वापरायला सांगतात. नवीन कपडे बाळाला टोचण्याची शक्यता असते.

बाळाची त्वचा नाजूक असते. म्हणूनच बाळासाठी कोणती गोष्ट वापरताना त्यांच्या त्वचेला काही त्रास तर होणार नाही ना ? याची काळजी घेणे आवश्यक असते. कारण थोड्या निष्काळजीपणामुळे देखील बाळाला रॅशेस, पुरळ किंवा इतर त्वचेसंबधी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाच्या डोक्यापासून-पायापर्यंत सगळी स्वच्छता करताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. 

तुम्हांला हे माहित आहे का ? कि मुलांची त्वचा ही आपल्या त्वचेच्या ८० पट जास्त नाजूक असते. म्हणून आपल्या त्वचेची आपण जितकी काळजी घेतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने बाळाच्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते.

आजकाल धूळ-माती आणि प्रदूषण असणाऱ्या वातावरणात नवजात बाळाची स्वच्छता कशी करावी हा प्रश्न नवमातांना पडलेला असतो. विशेषतः पहिल्यांदा आई झालेल्या स्त्रियांन मनात भीती असते, की बाळाची स्वच्छता करताना बाळाच्या त्वचेला काही हानी तर पोहचणार नाही ना ? काही इन्फेक्शन तर होणार नाही ना ? बहुतांश माता बाळाची स्वच्छता करताना ओल्या कापडाचा किंवा कापसाचा वापर करायच्या परंतू आत वेट वाईप्सचा ( ओले वाईप्स) वापर वाढत आहे. ज्या मातांनी या वाईप्सचा वापर केला आहे, त्यांना हे वाईप्स खुप उपयुक्त ठरले आहेत.

 वॉटर वाईप्स खरोखर बाळाची नाजूक त्वचा लक्षात घेऊन तयार केले आहेत. या वाईप्सची खासियत अशी आहे की यामध्ये असे तत्व आहेत, जी बाळाच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात, आणि त्वचा शुष्क (ड्राय) होऊ देत नाही.

या वाईप्स मध्ये पाण्याचे प्रमाण हे बाळाची त्वचा आणि स्वच्छतेची गरज हे लक्षांत घेऊन केले आहे. म्हणून हे वाईप्स बाळाच्या त्वचेसाठी एकदम उत्तम आहेत. त्यामुळे हे वाईप्स बाळाच्या स्वच्छतेसाठी तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील.

सगळ्यात आधी हे जाणून घेणं आवश्यक आहे की , हे वॉटर वाईप्स मुलांसाठी  कसे उपयुक्त आणि फायदेशीर आहेत. 

तुम्ही एक आई ,पालक असल्यामुळे तुम्ही आपल्या बाळासाठी कोणतीही गोष्ट घेताना चांगल्यात चांगली उत्तम दर्ज्याच्याच वस्तू निवडता. आणि बाळाच्या सुरक्षेचा विषय असले तर तुम्ही नक्कीच उत्तम असे निवडाल. तुमच्या बाळाच्या मुलायम त्वचेसाठी वॉटर वाईप्स हा उत्तम पर्याय आहे. तर जाणून घेऊ हे वॉटर वाईप्स मुलांसाठी कसे उत्तम आहेत ते

१.  या वाईप्समध्ये ९८ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला आहे

२. हे अल्कोहोल विरहित

३. याच्या वापराने ऍलर्जी होत नाही.

४.  हे मऊसर असतात

५.  लहान मुलांच्या त्वचेला सूट होणारे.

६.  बाळाच्या त्वचेला रॅशेस येऊ देत नाही.

७.  प्रसन्न सुगंध देणारे

८. जोजोबा ऑईल, कोरफड आणि ई जीवनसत्वयुक्त

९.  बाळासाठी पूर्ण सुरक्षित

लहान मुलांसाठी वॉटर वाईप्सचा वापर कधी सुरु कराल ?

आता तुम्हांला आता कळलंच असेल वॉटर वाईप्स हे किती उपयुक्त आहेत पण हे वाईप्स वापरायला कधी सुरवात करणे योग्य ठरेल हा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल.

मदर स्पर्श वॉटर वाईप्स हे अगदी नवजात बाळाच्या त्वचा लक्षात घेऊन तयार केले असल्यामुळे याचा वापर नवजात बाळाला करू शकता.( नुकत्याच जन्माला आलेल्या बाळासाठी सुद्धा वापरू शकता)आणि जर तुम्हांला अति काळजी वाटत असेल आणि मन तयार होत नसेल तर बाळा एक महिन्याचे झाल्यावर तुम्ही या वाईप्सचा वापर करू शकता.

जसं आम्ही सांगितलं की या वाईप्समध्ये ९८ टक्के पाणी आणि कोरफडीचे घटक आहेत. जे तुमच्या बाळाच्या स्वच्छतेसाठी आणि त्वचेसाठी उत्तम आहेत. मदर स्पर्श वॉटर वाईप्स हे बाळाच्या नाजूक त्वचा लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे.

 वॉटर वाईप्सचा वापर कसा कराल ?

 नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, या वाईप्सच्या वापराने लहान मुलांमधील रॅशेसची तक्रार कमी झाली असून, या वाईप्समध्ये अल्कोहोल आणि रसायनचा वापर केला नसल्याने या वाईप्सच्या वापराने ऍलर्जीची समस्या निर्माण होत नाही.

. हे वॉटर वाईप्स तुम्ही गरज पडेल त्यावेळी वापरू शकता. जसे स्तनपान करताना बाळाने दूध बाहेर काढले की ते स्वच्छ करायला.

. तुम्हांला माहितीच आहे, बाळाचा चेहरा आणि ओठ, ओठ जवळचा भाग किती नाजूक असतात , हे पुसायला, स्वच्छ करायला, बाळाला स्वच्छ करायला हे वाईप्स कधीही वापरू शकता. बाळाचे  नाजूक भाग जसे शू-ची, शी ची जागा स्वच्छ करताना सुद्धा या वाईप्सचा वापर करू शकता पण खूप नाजूकपणे या भागांची स्वच्छता करणे आवश्यक असते कारण हे भाग फार नाजूक असतात.

. कधी-कधी बाळाच्या नितंबाला किंवा कमरेवर लालसर पुरळ रॅशेस आलेले दिसतात अश्यावेळी या वॉटर वाईप्सने बाळाचा तो भाग पुसला तर त्या बाळाला आराम पडण्यास मदत होते. हे असे वाईप्स  आहेत ज्यांच्यावर प्रत्येक आई विश्वास ठेऊ शकते.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon