Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

पतीसाठी या ५ रोमॅन्टिक गोष्टी करा आणि नात्यात नव्याने प्रेम निर्माण करा


तुम्ही पती बरोबर एकत्र अंघोळ कधी केली ? आठवतंय ? कधी एखादा रोमँटिक दिवस पूर्णतः त्यांचा बरोबर घालवला? कधी काही मजेशीर खेळ खेळलात ? बरेच दिवस झाले ना ? मग आता या पाच मार्गानी पुन्हा तुमच्यातला रोमान्स जागवा आणि पतीला आश्चर्यचकित करा.

१. छोटासा प्रेमाचा संदेश

एक छोटासा प्रेमाचा संदेश खूप काही घडवून धडवून आणू शकतो. त्यामुळे असाच एखादा प्रेमाचा संदेश पतीच्या बॅग मध्ये,त्यांच्या डब्यामध्ये किंवा त्यांचा पाकिटामध्ये ठेवा. या एका रोमॅन्टिक संदेशामुळे तुमच्या पतीचा दिवस छान जाईल.

२. त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्याकडे लक्ष द्या.

तुमच्या पतीला तुमचे लक्ष त्यांच्याकडे त्याच्या बोलण्याकडे आहे ही भावना सुखावत असते. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या कधी-कधी ते कंटाळवाणे बोलत असतील तरी त्याचाकडे दुर्लक्ष करू नका. आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असतो, त्यावेळी आपले संपूर्ण लक्ष आहे असे त्यांना वाटू द्या. लक्षात ठेवा- तुमच्या वेळेची भेटवस्तूपेक्षा मोठी भेटवस्तू नाही!

३. तंत्रज्ञानाचा वापर करा.

ज्यावेळी तुमचे पती कामाच्या ठिकाणी असतील आणि तुम्ही देखील कामावर गेला असाल किंवा घरी असाल तर वेळात वेळ काढून एकदा तरी त्यांना फोन करा. त्यांच्याशी बोला, ऑफिसमधून निघताना लवकर भेटू किंवा मिस यू चा मेसेज करा. शक्य असेल तर व्हिडीओ कॉल करा.दिवसभरातुन एखादा खट्याळ मेसेज त्यांना पाठवा.

४. त्यांच्याशी फ्लर्ट करा.

बाहेर गेले असताना किंवा घरी देखील जरा बिनधास्त होऊन पतीचे कौतुक करा. त्याला छेडा जो त्याच्याशी फ्लर्ट करा. अचानक हात पकडून, चुंबन घेऊन त्यांना त्रास द्या. लाडीकपणे त्यांना त्रास द्या. यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेलच आणि तरुण देखील राहील.

५. त्यांच्यासाठी स्वतःचा एक दिवस द्या.

हे मात्र दोघांनी एकमेकांसाठी करणे गरजेचे आहे. दोघांनी एक दिवस कामातून वेळ काढून फोन लॅपटॉप सगळं बाजूला ठेवून एकमेकांसाठी वेळ काढावा. त्यासाठी खर्च करून बाहेरच गेलं पाहिजे असा नाही. दोघांनी मिळून घरीच स्वयंपाक करा, लॉग ड्राईव्ह ला जा, एखाद्या पिक्चर ला जा, किंवा घरीच आरामात लोळत पिक्चर बघा. पण संपूर्ण दिवसातील प्रत्येक क्षण एकमेकांसाठी द्या. यामुळे नाते नव्याने खुलेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon