Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

क्रिमी कोकोनट एग करी (नारळाची अंड्याची करी) अशीच बनवायची !!


तुम्ही अंडी खातात का ? हा प्रश्न मी ह्यासाठी विचारत आहे कारण ह्यावेळी तुमच्यासाठी स्पेशल क्रिमी नारळाची अंड्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. आणि अंडी वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतात आताचे संशोधन म्हणते पण त्यात किती सत्यता आहे. त्याबद्धल सांगता येणार नाही पण आपण ही डीश टेस्ट करायलाच हवी किंवा कुणाला अंड्याची करी आवडत असेल त्यासाठी तर नक्कीच.

तीन व्यक्तीसाठी तुम्ही अशा पद्धतीने एग रेसिपी बनवू शकता.

* ६ अंडी

* २ चम्मच धना

* ३ ते ४ लाल मिरच्या, तुम्हाला जसे तिखट हवे तसे मिरच्या घेऊ शकता.

* हिरवा वेलदोडा, काली मिरी, लवंग, दालचिनी, जिरे, (२० ग्राम पर्यंत तुम्ही घेऊ शकता.)

* किसलेले खोबरे किंवा नारळ

* चिमूटभर हळदीचे पावडर

* कढीपत्ता, मोहरी

* कापलेले कांदे

* १ चमचा आल्याची पेस्ट

* १ कप टमाटा पुरी (३ टमाटे घेऊन बनवायची)

अगोदर काय कराल ?

अंड्याना अगोदर बॉयल करून घ्यावे. १५ मिनिट उकळून बॉयल झाल्यावर त्यांची वरची आवरण काढून घ्यावी. आता महत्वाचा भाग

मसाला बनविणे

धन्याला भाजून घ्यावे, लाल मिरची, वेलदोडा, लवंग, काळी मिरी, हळद, मोहरी, कांदा, हळद, किसलेले नारळ, थोडे पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी.

आता क्रिमी कोकोनट एग बनवण्याची कृती : 

अगोदर कांद्याना फ्राय करून घ्या जोपर्यंत ते कांदे करडे होत नाही तोपर्यंत. त्यात मोहरी टाका, त्यानंतर कढीपत्ता, आणि हे सर्व थोड्या तेलात तळून घ्या. त्यानंतर ह्यामध्ये टमाटेची पुरी मिसळून द्या. आणि तिला ढवळून घ्या. (थोडा वेळ) आणि त्यात आता आल्याची पेस्ट टाका म्हणजे त्याची टेस्ट चांगली राहील. त्यानंतर आता त्यात मसाल्याची पेस्ट बनवलेली टाका, आणि त्याला १० मिनिटापर्यंत कमी गॅसवर ठेवून द्या. आणि ढवळत रहा. मीठ टाका चवीनुसार. आणि आता बॉयल केलेल्या अंड्याला कट करून त्या मसालाची बनवलेली भाजीत टाका, आणि वरून कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून सजवून घ्या.

ही झाली तुमची डीश. टेस्ट करून नक्कीच सांगा.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon