Link copied!
Sign in / Sign up
191
Shares

तुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा

अनेक जणांना नखं कुरतडण्याची सवय असते यामध्ये लहान मुलांना कळत नाही म्हणून पण मोठ्यांना हे चुकीचे आहे हे काळात असले तरी ते हे करत असतात. आपण अनेक मोठं मोठ्या लोंकाना अनेक उत्सुकतेच्या प्रसंगी नखे खाताना बघतो तशी ही सवय अनेक जणांना असते . एक अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे कि लहान मुलं किंवा वयात येणाऱ्या मुलांमध्ये नख कुरतडण्याचे प्रमाण जास्त असते आणि जस-जसे वय वाढत जाते तसं तसे ते कमी होत जाते. परंतु प्रौढ वयाने मोठ्या असलेलेली ही सवय मानसिक स्थिती दर्शवते. याविषयी आपण माहिती जाणून घेऊ

नखे खाण्यामागे किंवा कुरतडण्या मागे काय करणे आहेत हे आपण जाणून घेऊ

१. मानसिक अस्वस्थता

२. ताण-तणाव, एकटेपणा,

३. अति विचार करणे

४. कमी आत्मविश्वास

५. भीती 

लहान मुलांमध्ये असणारी सवय

लहान मुलांमध्ये असणारी असुक्षिततेची भावना तसचे कधी-कधी अगदी लहान मुलांमध्ये असणाऱ्या सवयीला काही कारण असेलच असे नाही चाळा किंवा तोंडात बोट घालायच्या सवयीमुळे किंवा कोणाची बघून लागलेली सवय..

मुलं शाळेत जाऊ लागली थोडी कळती झाली कि त्यांना नखे कुरतडण्यामागे अभ्यासाची भीती किंवा एखाद्या विषयाची भीती, परीक्षेचा ताण, अति उत्सुकता किंवा एखाद्या गोष्टीचा निर्णय काय होईल त्याचे परिणाम काय असतील अशी चिंता देखील मुलांना नखं कुरतडण्यास प्रवृत्त करू शकतात.

या सवयीमुळे दैनंदिन जीवनात आणि आरोग्यावर होणारे परिणाम

१. नखं कुरतडणे हे कमी आत्मविश्वास दर्शवते त्यामुळे व्यक्तीला कसली तरी चिंता आहे नातं आहे हे समजते. तसेच व्यक्ती अस्थिर मनोवृत्तीची आहे असे समजले जाऊ शकते.

२. नखातील मळ, घाण पोटात गेल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना देखील पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३. काहीजणांना नखांबरोबर त्याच्या बाजूची त्वचा खाण्याचीही सवय असते. यामुळे नखांना नखुर्डे होण्याची शक्यता असते.

४. नखे खाताना समोरच्या व्यक्तीला किळस येऊन तुमची गणना अस्वच्छ व्यक्ती मध्ये होऊ शकते

उपाय

१. मोठ्या व्यक्तीने आपल्याला कधी नखे खाण्याची इच्छा होते याचे निरीक्षण करावे, समजा एखाद्या गोष्टीचा ताण आल्यावर किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटल्यावर त्यानुसार त्या समस्यांवर उपाय शोधा. अश्या परिस्थितीवर शांतपणे विचार करा.

२. स्वतःबाबत कोणत्याही प्रकारचा कमी पण वाटून घेऊ नका, स्वतःबाबत अतिविश्वास बाळगायला शिका. समस्यांना घाबरून न जात सामोरे जायला शिका.

३. कोणत्याही गोष्टींची उत्सुकता असेल तरी त्यावेळी मन शांत ठेव हात तोंडाकडे जाऊ देऊ नका 

४. मानसिक ताणाशिवाय लागलेल्या सवय जर जातच नसेल तर नखांना कडुलिंबासारखे काहीतरी लावा  (त्याने दुसरी समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्या )

लहान मुलांसाठी उपाय 

प्रथम लहान मुलांना नखे कुरतडताना बघून त्यांना ओरडू नका किंवा हातावर मारू नका  आणि इतर लोकांसमोर तर नाहीच-नाही 

१. ते कधी नख कुरतडतात  त्यावर लक्ष ठेवा त्यांना कसली भीती वाटते का ? कसला ताण नाही ना हे जाणून घ्या. त्यानुसार त्यांच्याशी बोला त्यांना समजवून सांगा. त्यांना नख कुरतडल्याने काय होतं  पोट  कसं  दुखतं . 

२. नखं खाणं  कसं  चुकीचं आहे समजावा. 

३. नखं कुरतडले  नाही कि त्याला बक्षीस द्या. मोठ्यांचे अनुकरण करत नाही ना ते बघा. 

४. उगाच चाळा  म्हणून करत असेल तर त्यांना त्यांच्या हातांना वेगळं चाळा किंवा काम द्या 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon