Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

नैसर्गिकरित्या तुमची हार्मोन्स/संप्रेरकांची पातळी योग्य कशी राखाल

सध्याची जीवनशैली धावपळीची आहे. प्रत्येकजण करिअर, नोकरी या चक्रात व्यग्र आहे. त्या सगळ्यात पणाला लागते ते आरोग्य. आरोग्यावर अनेक परिणाम होतात. वेळेची कमतरता असल्याने व्यायामाकडे दुर्लक्ष होते या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन. कोणत्याही वयात, कोणत्याही व्यक्तीला मग ती स्त्री असो की पुरुष यांना हा त्रास होतो.

हार्मोन्स किंवा संप्रेरके शरीराच्या क्रिया चालण्यात फार महत्त्वाचा वाटा उचलतात. संप्रेरके किंवा हार्मोन्स चे अगदी कमी प्रमाणही पेशींची चयापचय क्रिया बदलण्यास सक्षम असतात. शरीराच्या विविध अवयवांना त्याचा फायदा होतो. संप्रेरके किंवा हार्मोन्स एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संदेश पोहोचवणाऱ्या एखाद्या निरोप्यासारखे काम करतात. त्यामुळे संप्रेरके किंवा हार्मोन्स शरीरात संतुलित प्रमाणात तयार होणे आवश्यक असते. त्याचे संतुलन बिघडले की अनेक अवयवांच्या समस्या निर्माण होतात.

हार्मोन्सचे असंतुलन होण्याचे कारण-

जीवनशैलीची निगडीत अनेक कारणे आहेत. अनारोग्यकारी आहार, अपुरी झोप, खूप जास्त तणाव, मधुमेह, मेनापॉझ, गर्भारपण, थायरॉईड समस्या आणि इतरही काही कारणे आहेत.

संप्रेरक असंतुलनाच्या समस्या-

थायरॉईड यात हायपो आणि हायपर असे दोन प्रकार आहेत. हॉट फ्लशेस म्हणजे अचानक चेहरा छाती गरम होणे, घाम येणे, भावनिक समस्या निर्माण होमे, मूत्रसंसर्ग, योनीमार्गाचा कोरडेपणा, लैगिंक समस्या, रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठिसूळपणा, हृदयविकाराचा झटका आणि निराशा यांचे प्रमाण वाढणे.

या सर्व समस्यांवर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहेच पण काही प्रमाणात नैसर्गिकरित्या आपण संप्रेरके किंवा हार्मोन्स ची पातळी संतुलित राखण्याचा प्रयत्न करु शकतो.

प्रथिने-

आहारात प्रथिने पुरेश्या प्रमाणात असली पाहिजेत. प्रथिनांमुळे शरीरात अमिनो अ‍ॅसिडस तयार होऊ शकतात कारण शरीर अमिनो अ‍ॅसिडस स्वतः बनवू शकत नाही. त्यामुळे स्नायू, हाडे आणि त्वचा यांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत गरजेची आहेत. दररोजच्या आहारात किमान २० ते ३० ग्रॅम प्रथिने असली पाहिजेत याची काळजी घ्यावी. तसेच जीवनसत्त्व आणि खनिजे यांचेही योग्य प्रमाणात सेवन करावे. सी, ई जीवनसत्वे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि तसेच बी जीवनसत्त्व यांचा आहारात जरुर समावेश असावा. तसेच अंड्यांचाही जरुर समावेश असावा.

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड-

आरोग्यकारी सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे संप्रेरके पेशीला चिकटून राहाण्यास मदत होते. त्यामुळे आहारात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असणारे पदार्थ जरुर खावेत. उदा. ऑलिव्ह तेल, जवस, माश्यांमध्येही भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे तणावाला कारणीभूत कॉर्टिसोलची पातळी कमी राहण्यास मदत होते.

तंतुमय पदार्थांचे सेवन-

विरघळणारे तंतुमय पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि संप्रेरकांच्या निर्मिती प्रोत्साहन देते. तसेच तंतुमय पदार्थांच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि समाधानही मिळते. तसेच त्यामुळे भूक नियंत्रित होते आणि प्रमाणात पदार्थ सेवन केला जातो.

सूर्यप्रकाश-

सकाळच्या कोवळ्या उन्हात गेल्या डी जीवनसत्त्व मिळतेच. पण हार्मोन्स स्थिर होण्यास मदत होते.

नियमित व्यायाम-

शारिरीक हालचाल म्हणजेच व्यायामाचा संप्रेरक किंवा हार्मोन्सवर नक्कीच प्रभाव पडतो. व्यायामाचा सर्वात जास्त फायदा होतो तो शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी ठेवण्यास मदत करते. इन्सुलिनमुळे पेशी रक्तातील अमिनो अ‍ॅसिड आणि साखर शोेषतात ज्यामुळे व्यक्तीला उर्जा मिळते. व्यायामात ताकदीचे म्हणजे स्ट्रेंथ वाढविणारे व्यायाम, एरोबिक्स, चालणे, धावणे यामुळे संप्रेरके किंवा हार्मोन्स ची पातळीत बदल होऊ शकतात. त्यामुळे आजार होण्याची शक्यता कमी असते आणि वयोवृद्धीच्या काळात स्नायूंची घनता योग्य राखण्यास मदत होते.

साखर आणि रिफार्इंन्ड कार्बस टाळा-

साखर आणि रिफार्इंड काब्र्स हे आरोग्याच्या अनेक समस्यांशी निगडीत असतात. त्यामुळे आहारात या गोष्टी कमी केल्या किंवा नियंत्रणात ठेवल्या तर संप्रेरके किंवा हार्मोन्स चे कार्य व्यवस्थित सुरु राहाते. शिवाय स्थूलपणा, मधुमेह आणि इतरही आजार दूर ठेवता येतात. अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की विशेषतः स्थूलपणा आणि अतिवजन असलेल्या व्यक्तींमध्य फ्रुक्टोज मुळे इन्सुलिनची पातली वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिकाराला प्रोत्साहन देते. थोडक्यात काय तर आहारातील अतिप्रमाणातील साखर आणि रिफार्इंड कार्ब हे इन्सुलिन प्रतिकार करतात. या गोष्टी आहारातून वजा केल्यास इन्सुलिनची पातळी कमी होऊ शकते.

तणावाची पातळी

तणावाची पातळी कमी करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कॉर्टिसोल हे तणावाशी निगडीत संप्रेरक आहे. त्याची पातळी योग्य राहिली पाहिजे. ज्या महिला रोज ध्यानधारणा किंवा योगअभ्यास करतात त्यांना संप्रेरके किंवा हार्मोन्समुळे होणारे मूड स्विंग्ज कमी प्रमाणात अनुभवास येतात. तणाव कमी करण्यामध्ये पुरेसा आराम मिळणे हे देखील गरजेचे आहे. शरीराची आरामाची गरज योग्य प्रकारे न भागल्याने नैसर्गिक संप्रेरके किंवा हार्मोन्सचे चक्र बिघडते. त्यामुळे दिवसभरात स्वतःला आराम मिळवून देण्यासाठी वेळ जरुर काढावा.

रात्रीची पुरेशी झोप-

शरीरातील असंतुलन भरून काढण्यासाठी महत्त्वाची असते ती रात्रीची झोप. अपुरी झोप झाल्यास संप्रेरकांच्या पातळी चढउतार घडवते. त्यामुळेच रात्री कमीत कमी ८ तासांची झोप मिळणे आवश्यक आहे.

कॅफिन टाळा-

कॅफिन टाळा म्हणजेच कॉफीचे सेवन टाळा. रक्तातील अतिप्रमाणातील कॅफेन एन्डोक्राईन असंतुलन वाढवू शकते. त्यामुळे शक्यतो कॅफेन आहारातून काढून टाकावे, शक्य नसल्यास त्याच्या सेवनात घट करावी. कमी प्रमाणात कॅफेन असलेल्या पेय घेतल्यास त्याचा हार्मोन्स वर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अतिखाणे आणि कमी खाणे-

या दोन्ही प्रकारामुले संप्रेरके किंवा हार्मोन्सच्या पातळीत फरक पडतो आणि पर्यायाने वजनाच्या समस्या निर्माण होतात. स्थूल व्यक्तींमध्ये अतिखाण्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. तर कमी खाण्यामुळे तणावाशी निगडीत असलेल्या कॉर्टिसोल संप्रेरकाच्या पातळीत वाढ होते. त्यामुळे वजन वाढते. थोडक्यात काय तर खूप जास्त आणि खूप कमी प्रमाणातील आहाराचा संप्रेरके किंवा हार्मोन्सच्या असंतुलनावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्यासाठी १२०० कॅलरी मिळतील असा आहार घ्यावा.

विषारी पदार्थ-

घरात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, कीटकनाशके यांच्यामध्ये विषारी घटक सतात. त्यामुळे संप्रेरके किंवा हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे या वस्तू वापरणे टा‹ळावे. प्लास्टिकच्या भांड्यात पदार्थ शिजवू नये, साठवू नये. तसेच नॉनस्टिक भांड्याचाही वापर जास्त करु नये. एकूणातच आपल्या वापरातील विषारी पदार्थ टाळावेत. शक्यतो नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा.

या काही उपायांनी नैसर्गिकरित्या आपण संप्रेरके किंवा हार्मोन्सची पातळी नियंत्रित करु शकतो. अर्थात पी हळद आणि हो गोरी असा काही प्रकार घडणार नाही. हार्मोन्सचे संतुलन एकाच दिवसात होणार नाही. मात्र या उपायांनी ठोस बदल झालेला जाणवेल. या सगळ्या गोष्टी अंगीकारणे सुरुवातीला नक्कीच कठीण जातील मात्र काही दिवसांनंतर स्वतःमधील सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon