Link copied!
Sign in / Sign up
45
Shares

अश्याप्रकारे नैसर्गिक घटकांद्वारे घराच्या-घरी फेशियल करा.

हल्ली धूळ प्रदूषण आणि विविध कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होत असते. यासाठी वेळोवेळी फेशियल केले तर त्वचेचे नुकसान न होता त्वचा तजेलदार होते. परंतु प्रत्येक वेळी पार्लर मध्ये जाऊन फेशियल करणे शक्य नसते. अश्यावेळी घरच्या-घरी फेशियल कसे करावे हे पाहणार आहोत.

साहित्य

क्लिजिंगसाठी – एक स्वच्छ टॉवेल, गरम पाण्याचे भांडे

फेशियलसाठी – पपईचे तुकडे, सफरचंद, बटाटा आणि लिंबाचा रस

फेसपॅक  – दीड चमचा मसूर डाळ पावडर, मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाब पाणी

असे करा फेशियल 

१. सर्वप्रथम कोमट पाण्यात टॉवेल भिजवून घट्ट पिळा. त्या टॉवेलने चेहरा आणि मान संपूर्ण झाका. यामुळे चेहऱयावरील धूळ बाहेर पडून छिद्रे मोकळी होतील

२. पपई, सफरचंद, बटाटय़ाच्या तुकडय़ांची पेस्ट करून त्यात लिंबाचा रस घालावा. या मिश्रणाने चेहरा आणि मानेला दहा मिनिटे मसाज करा.

३. दहा मिनटे मसाज झाल्यावर  मसूरची डाळ, मूलतानी माती, यामध्ये वरील पपई-सफरचंद लिंबाच्या रसाचे  मिश्रण १ चमचा घाला, तसेच त्यात थोडे गुलाब पाणी आन पॅक तयार करावा. हा पॅक चेहऱयाला लावून ५ मिनिटे मसाज करावा. २५ मिनिटांनी पॅक वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा

या फेशियलमधले सगळे घटक नैसर्गिक असल्याने  चेहऱ्याला कोणत्याही प्रकराची इजा होण्याची शक्यता नसते. या फेशियल नंतर तुमचा चेहरा नक्कीच उजळेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon