Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

नैसर्गिक प्रसुतीदरम्यान प्रसूती मार्गाबाबत होणारे बदल-चीर जाणे, फाटणे


नैसर्गिक प्रसुती ही योनीमार्गाने होते त्यावेळी बाळाच्या आकाराएवढा योनीमार्ग मोठा होतो आणि काही वेळा योनीमार्ग फाटतो सुद्धा. पण ही गोष्ट काही नवीन नाही. वास्तविक सर्वेक्षणामुसार ९० टक्के महिलांमध्ये प्रसुतीच्या काळात योनीमार्ग फाटतो. मात्र योनीमार्ग फाटतो या कल्पनेनेच अनेक महिलांचे हात पाय थंड पडतात मात्र योनीमार्ग फाटणे ह्याची जितकी भीतीदायक कल्पना केली जाते तितके भयानक ते नसते आणि मुख्य म्हणजे खूप कमी कालावधीत ह्या जखमा भरूनही येतात. खरे पाहता थोडीशी काळजी आणि सावधगिरी यामुळे काही गंभीर योनीमार्गाची समस्या होणे टाळता येईल.

योनीमार्ग फाटणे म्हणजे काय

वैद्यकीय भाषेत सांगायचे तर योनीमार्ग फाटणे म्हणजे वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय गुदाशय आणि योमीमार्ग यांच्या दरम्यान खोलवर जखम होणे. प्रसुतीच्या वेळी योनीमार्गातून बाळ जेव्हा बाहेर येते तेव्हा आई जोर लावून बाळाला बाहेर ढकलते त्याच्या परिणामस्वरुप योनीमार्गाला चीर किंवा छेद पडतो किंवा तो फाटतो. नैसर्गिक प्रसुतीच्या वेळी योनीमार्ग न फाटता बाळाला बाहेर ढकलण्याइतपत योनीमार्ग मोठा होतो किंवा ताणला जातो ही अगदी उत्तम परिस्थिती असते.

प्रसुतीवेळी योनीमार्ग फाटण्याचे शक्यता किती ?

योनीमार्गाच्या आसपासच्या पेशी पुरेशा लवचिक नसतात त्यामुळे प्रसुतीच्या वेळी योनीमार्ग फाटण्याची शक्यता तुलनेने अधिक असते. तसेच इतर काही गोष्टी जसे वेगवान प्रसुती, स्थूलपणा, फोर्सेप्सचा वापर करून झालेली प्रसुती, निर्वात पोकळी, जास्त वेळ येणाऱ्या कळा यांसारखे घटकांमुळे योनीमार्गाला सूज येते त्यामुळे प्रसुतीच्या वेळी आईला योनीमार्ग फाटण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी मात्र योनीमार्ग फाटण्याचा त्रास होण्याची शक्यता नसते.

योनीमार्ग फाटण्याचे वेगवेगळे प्रका

 

 

योनीमार्गाला पडलेली चीर किंवा योनीमार्ग फाटणे हे तीव्रतेवर अवलंबून असते. त्यातही पहिला, दुसरी, तिसरी किंवा चौथी अशा पायऱ्या किंवा श्रेणी असू शकतात.

जेव्हा योनीमार्गाच्या स्नायूंना धक्का न लावता केवळ योनीमार्गाच्या अस्तराला पडते तेव्हा ती पहिल्या श्रेणीची किंवा पहिल्या पायरीची असते.

योनीमार्गाच्या खोल पेशींना पडलेली चीर ज्याच्यासाठी काही टाके घालावे लागतात ती दुसरी श्रेणी किंवा पायरी असते.

गुदाशयच्या गोलाकार स्नायूंच्या आतल्या भागापर्यंत पोहोचणारी भेग असेल तर ती तिसऱ्या श्रेणीची असते.

चौथ्या दर्जाची किंवा श्रेणीची चीर ही गुदाशयाच्या अनेक स्तरांच्या पेशींना चिरत जाणारी असते. यासाठी खूप जास्त टाके घालावे लागतात आणि ती जखम बरी होण्यास बराच कालावधीही लागतो.

बरे होण्याचा कालावधी-

पहिल्या किंवा दुसऱ्या श्रेणी चे फाटणे किंवा चीर जाणे बरे होण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ खूप झाला. या दर्जामध्ये बसताना त्रास होणे, शौचाला किंवा ज्या कृतीत शरीरातून काही घटक बाहेर टाकण्याच्या कोणत्याही क्रियेत दाब पडल्यास त्रास होऊ शकतो असे काही दुष्परिणाम किंवा गुंतागुंत होऊ शकते. दुसऱ्या आठवड्यानंतर जखम भरू लागते आणि टाके विरघळून जातात. पण तिसऱ्या आणि चौथ्या दर्जाच्या जखमेला भरण्यास चार पाच आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतरही काही आठवडे वेदना होऊ शकतात. यामध्ये मूत्रविसर्जनाच्या समस्या, ओटीपोटाच्या स्नायूंचे कार्यात अडथळा येणे तसेच संभोगादरम्यान समस्या किंवा वेदनादायी संभोग आदी गुंतागुत निर्माण होऊ शकते.

योनीमार्गाचे फाटणे कसे टाळावे

योनीमार्गाचे फाटणे टाळण्यासाठी काही ठोस नियम नाही. पण काही योग्य सवयींमुळे योनीमार्गाचे फाटणे गर्भवती स्त्रीला टाळता येते.

प्रसुतीदरम्यान योनीमार्ग फाटणार नाही ह्यासाठी शरीराची तयारी क़रणे हा एक अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. काही व्यायामांमुळे (डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणारे) रक्ताचा प्रवाह चांगला राहण्यासाठी मदत करतात. केगल्स सारखे ओटीपोटाचे, योनीमार्गाचे व्यायामामुळे योनीमार्गाचे स्नायू मजबूत करण्यास मदत करतात त्यामुळे योनीमार्गातून बाळ बाहेर येताना जाणवणारा दबाव सहन करता येतो.

शरीरातील पाण्याची पातळी किंवा प्रमाण योग्य ठेवणे, अत्यंत पोषक आहार ज्यामध्य ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, चांगली चरबी असेल, फळे आणि भाज्या, लीन प्रथिनांचे मर्यादित सेवन) यामुळे शरीर प्रसुतीचा दबाव सहन करू शकते.

एखाद्या स्त्रीमध्ये योनीमार्ग फाटून प्रसुती होणे किंवा न फाटता प्रसुती होेणे ह्या परिस्थितीत बाळ कोणत्या स्थितीत जन्माला येते याचाही मोेठाच वाटा आहे. बाळ तिरके असणे किंवा पाय फाकलेले किंवा पायाळू असल्यास योनीमार्ग फाटण्याची शक्यता अधिक असते.
Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon