Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

असा करा नागपुरी वडा-भात

Preview image credit -khaugiri 

आज आम्ही तुम्हांला एक नागपूरी चमचमीत पदार्थ कसा करायचा हे सांगणार आहोत. तो म्हणजे वडा-भात नाव ऐकल्यावर कुतूहल निर्माण होतं वडा आणि भात काय आहे. हा वडा-भात कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.

साहित्य

वड्यासाठी साहित्य

३ वाट्या तांदूळ, १ वाटी मोड आलेली मटकी, २ वाट्या हरबऱ्याची डाळ, १ वाटी तुरीची डाळ, पाऊण वाटी उडदाची डाळ

मिरच्या, थोडे लाल तिखट,  अर्धी वाटी, धने-जिरे पूड, लसूण, कोथिंबिर, कढीपत्ता, मीठ, फोडणीसाठी तेल.

भातासाठी साहित्य

दोन वाटया तांदळाचा मोकळा फडफडीत भात

कृती

१. वड्यासाठी सांगितलेल्या डाळी आणि मटकी रात्री भिजत घालून सकाळी जाडसर वाटून घ्याव्या

२. मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून वाटलेल्या डाळीत(मटकीमध्ये) घालावे आणि सर्व एकजीव करावे. वाटलेल्या डाळीचे छोटे-छोटे चपटे वडे थापून गरम तेलात तळून काढावे.

३. नंतर २ वाटया तांदळाचा साधा मोकळा भात करून घ्यावा.

हा वडा भात कसा खायचा

 पानावर भात वाढला की हे केलेले ४-५ वडे कुस्करून घालावे.

ज्या तेलात वडे तळले तेच तेल गरम करायला ठेवावे त्यात मोहरी , हिंग , हळद घालून तेलाची फोडणी भातावर घालावी घालून तेल भातावर घ्यावे. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon