Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

असा करा नाचणीचा उपमा (व्हिडीओ)

साहित्य

१ वाटी नाचणी,१ चमचा मोड आलेले मूग आणि मटकी, १ चमचा गाजर-टोमॅटो प्रत्येकी,२ बारीक चिरुन मिरच्या, फोडणीचे साहित्य हिंग,मोहरी तेल, जिरे हळद,कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबूरस

व्हिडीओ स्त्रोत-इझी रेसपी 

कृती

प्रथम कडधान्या प्रमाणे नाचणीला भिजवून मोड आणावेत, त्यानंतर ते वाफवून घ्यावेत.

त्यानंतर कढईत थोडे तेल घ्यावे. त्यात जिरे मोहरीची फोडणी करावी,त्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालवी कढीपत्ता मिरच्या गाजर किसलेले किंवा बारीक फोडी करून, आणि टोमॅटो देखील बारीक चिरुन, फोडणीत घालवा तसेच त्यात मोड आलेले मुग आणि मटकी घालावी आणि आवश्यकतेनुसार मीठ घालावे. हे सर्व व्यवस्थित हलवून झाकण ठेवून पाच मिनटे बारीक गॅसवर थोडे वाफ येऊ द्यावी.

थोडी वाफ आल्यावर त्यात नाचणी घालावी, त्यानंतर रव्याच्या उपम्याप्रमाणेच त्यात पाणी घालून वाफ येऊ द्यावी.

थोडी वाफ आली की त्यात आवडत असल्यास लिंबू पिळावे आणि ढवळून परत २-३ मिनिटे वाफ येण्यासाठी मिनिटे गॅसवर ठेवावे. नंतर आवडीनुसार शेव, खोबरे, कोथिंबीर घालावी 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon