Link copied!
Sign in / Sign up
30
Shares

तुमच्या नाभीला या गोष्टी लावा आणि आरोग्यविषयक हे फायदे मिळावा


सध्या थंडी खूपच पडत आहे. बाहेरही पडायला इच्छाच होत नाही. त्यामुळे ह्या हिवाळ्यात व थंडीच्या दिवसात खूप काळजी घ्यावी लागते. आणि त्वचेची तर खूपच काळजी घ्यावी लागते कारण त्वचा बाहेर थंडीच्या संपर्कात आल्यावर ती कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. त्यातच ओठ फुटतात, काही वेळा बालसुद्धा झडत असतात. आणि ह्यासाठी तुम्हाला क्रीम किंवा मॉइस्चराइज़रचा वापर करावा लागत असतो.

         पण ह्यापेक्षा तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत की, त्यामुळे तुम्हाला ह्या थंडीत त्याचा खूप फायदा होईल. आणि त्याचबरोबर हे घरगुती उपाय असल्याने तुम्हाला ते करायलाही खूप सोपे आहे. तर हिवाळ्यात नाभीवर तेल लावल्याने त्वचेच्या बऱ्याच समस्या निघून जातात. तर तेच आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगमधून सांगणार आहोत. म्हणजे तुम्हाला ह्यातून आराम मिळेल.

१) बदामाचे तेल

बदामाचे तेल तर त्वचेसाठी खूप फायदेशीर असतेच. कारण ह्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात. जी तुमच्या त्वचेला उजळवतात, केसांना घट्ट करतात. तेव्हा ह्यासाठी रात्री झोपण्याअगोदर बदामाचे तेल नाभीवर लावा. आणि हे दररोज करत राहावे. ह्यातून त्वचा उजळते. आणि त्वचेसंबंधी ज्याही समस्या असतील त्या सुटून जातात.

२) मोहरीचे तेल

थंडीत ओठ फुटण्याची समस्या असते. तेव्हा तुम्ही लीप बाम लावत असतात. पण त्याचा परिणाम फक्त काही दिवस राहतो. आणि पुन्हा तुम्हाला परत त्याची समस्या येतेच. तेव्हा ह्यावर उपाय म्हणून तुम्ही रोज रात्री झोपण्याअगोदर नाभीवर मोहरीचे तेल लावू शकता.

३) खोबऱ्याचे तेल

रात्री झोपण्या अगोदर नाभीला खोबऱ्याचे तेल लावून झोपा. ह्यामुळे तुमची त्वचा ही मुलायम होईल. ह्यासोबतच डोकं दुखण्याची, पोटदुखी, आणि केस गळण्याची जी समस्या असते तीही दूर होऊन जाते. आणि मानसिक ताणही दूर व्हायला मदत होते.

४) निमचे तेल

निंब त्वचा साठी स्वस्थ आणि खूप फायदेमंद असतो. आणि तेवढेच निंबाचे तेल हे फायदेशीर ठरते. त्यासाठी रोज रात्री निंबाचे तेल नाभीवर लावून झोपू शकता. ह्यामधून तुम्हाला खूप फायदे मिळतील. डाग- पिंपल्स हे दूर होण्यास मदत मिळेल. स्किन पूर्णपणे क्लियर होऊन जाईल. आणि तुमच्या चेहऱ्यात चमक येईल.

५) लोणी

फक्त तेलच नाही तर तुम्ही नाभीवर लोणीही लावू शकता. आणि लोणी लावून झोपाळा तर त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन तुमच्या त्वचेत मॉईस्चरायझर येऊन त्वचा तजेलदार होईल.

पण एकाच वेळी सर्व तेल लावू नका. तर कोणतेही तेल उपलब्ध असेल किंवा तुमच्या सोयीने जे आवडेल ते तेल लावायला सुरुवात करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon