Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

आजच्या दिवसात मूत्रमार्गात संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घ्या


आजकल मूत्रमार्गातील संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. स्वच्छतेचा अभाव,फॅशनच्या नावाखाली अति तंग कपडे अश्या अनेक कारणांनी मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते हा संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टीची काळजी घ्या.

बहुतेक यूटीआय जीवाणूंच्या संसर्गामुळे होतात. यूटीआयची समस्या होऊ नये म्हणून प्रत्येकाने विशेषतः स्त्रियांनी काळजी घेणे आवश्यक असते. 

१.स्वच्छता 

 लघवीला जाऊन आल्यानंतर तो भाग मऊसर कापडाने पुढून मागे हळुवार पुसा .  शौचाला जाऊन आल्यानंतर गुदद्वार सौम्यपणे, पुढून मागे स्वच्छ करा.  गुदाशयापासून सुरू झालेली पुसण्याची क्रिया मूत्राशयाच्या पुढच्या बाजूपर्यंत गेल्यास संसर्गजन्य जीवाणू मूत्राशयापर्यंत जाण्याची शक्यता खूप जास्त असते.स्वच्छ आंघोळ करामहिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत तो भाग कोरडा ठेवण्याचा प्रयन्त करा. सार्वजनिक ठिकाणी लघवीला जाताना  योग्य ती काळजी घ्या. 

२. तंग अंतवस्त्रे घालू नये. 

घट्ट बसणारी तंग कापडाची अंतवस्त्रे घालू नये.अशा कापडांमुळे ओलावा तयार होऊन त्वचा मऊ होते व मूत्राशयाच्या पुढच्या बाजूस जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता वाढते. नेहमीच्या वापरासाठी सुती अंतर्वस्त्रे वापरणे केव्हाही चांगले.

३. योग्य प्रमाणात पाणी प्या. 

 भरपूर पाणी प्या. प्रत्येक खाण्याबरोबर किमान एक ग्लास पाणी पिण्याने सुरुवात करा. लघवी नेहमीच्या फिकट पिवळ्या रंगापेक्षा जास्त गडद झाल्यास, त्याचा अर्थ शरीराला आवश्यक पाणी मिळालेले नाही असा होता. म्हणून भरपूर पाणी प्या. 

४ घाम साचू देऊ नका 

. व्यायामानंतर अंघोळ करा घाम त्या भागात साचू देऊ नका. तसेच उन्हाळ्यात वेळोवेळी घामेजलेले कपडे बदला. व्यायाम दरम्यान योग्य प्रमाणात पाणी प्या. 

५. लैंगिक संबंधानंतरची काळजी

 लैंगिक संबंधानंतरची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे मूत्राशयाच्या भागात जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता फार जास्त असते.लैंगिक संबंधांनंतर लघवीला जाणे आवश्यक असते. त्यानंतर योग्य ती स्वच्छता करा. यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon