Link copied!
Sign in / Sign up
40
Shares

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी मुलतानी माती कशी वापरावी


चेहऱ्याचे सौंदर्य राखण्यासाठी मुलतानी मातीचा फायदेशीर ठरतो. या मुलतानी मातीचा वापर कसा करावा हे आपण पाहणर आहोत. 

१.तेलकट त्वचा 

 त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती, गुलाबपाणी आणि चिमूटभर हळद घालून त्याची पातळ पेस्ट करावी आणि चेहरा व मानेवर लावावी. दही आणि पुदीन्याच्या पानांची पावडर मिसळून लावावी. गुलाब जल आणि मुलतानी माती मिसळून चेहऱ्यावर लावावे. 

२.साधारण त्वचा  

 साधारण त्वचा असेल तर मातीत दूध आणि बदामाची थोडी पूड घालून पॅक चेहऱ्यावर लावावा. 

३. कोरडी, शुष्क त्वचा

कोरडी शुष्क त्वचा असणाऱ्याने मुलतानी माती मध्ये चंदन पावडर मिसळून ते चेहऱ्यावर लावा.

४. मुरमांवर 

मुरुमं जाण्यासाठी या मातीत कडूनिंब आणि कापूर घालून गुलाबपाणी घालावे व ते मिश्रण त्वचेवर लावावे. हा पॅक आठवड्यातून एकदाच लावावा. 

५. मुरुमांचे डाग

अनेक वेळा मुरुमांमुळे  त्वचेवर डाग पडतात अश्यावेळी  मातीत ताज्या टोमॅटोचा रस, चिमूटभर चंदन पावडर आणि चिमूटभर हळद घालून पेस्ट बनवावी आणि हा पॅक चेहऱ्यावर लावावा  

६. डोळ्याखालची काळी वर्तुळे 

डोळ्याखालची काळी वर्तुळे जाण्यासाठी मुलतानी मातीत दही आणि पुदीन्याच्या पेस्ट करून त्यात कालवावी  हा पॅक अर्धा तास चेहर्याआवर ठेवून नंतर कोमट पाण्याने तोंड धुवावे.तसेच डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काकडीचा रस आणि उकडलेला बटाटा मुलतानी मातीत मिसळून डोळ्यांखाली ७-८ मिनिटे लावून ठेवा फरक पडेल. 

टिप -हा पॅक लावल्यानंतर जास्त बोलू नये अथवा चेहर्यावची जास्त हालचालही करू नये. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon