Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

मुलतानी माती फेस वाॅश


मुलतानी माती चेहरा सुंदर करण्यासाठी खूपच महत्वाची आहे. आणि कमी अधिक प्रमाणात तुम्ही हिला वापरात असालच पण काहींना माहिती नसेल त्यासाठी मुलतानी मातीमधून कसा फेस वॉश तयार करता येईल. ते ह्या ब्लॉगमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न.

ह्यासाठी लागणारे साहित्य

* मुलतानी माती घ्यावी.

* चम्मच, गुलाब पाणी आणि हळद पावडर आणि जर असेलच तर घरात बेबी सोप घेऊन ठेवा, आणि नैसर्गिक फेस वॉश, व रिकामी बाटली

आता हा फेसवॉश कसा तयार करायचा

* प्रथम एका बाऊल मधे मुलतानी माती, ग्लिसरीन,चिमुटभर हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यात गरजेप्रमाणे गुलाबपाणी घालावे आणि गुठळ्या होणार नाही हे पाहावे.

* आता या मिश्रणामधे फेसवॉश टाकून पुन्हा एकजीव करावे. आणि बाटली मधे भरावे. प्रत्येक वेळी वापरताना बाटली हलवून मग फेसवॉश घ्यावा.

* मुलतानी माती मुळे त्वचा कोरडी होते त्यामुळे तेलकट त्वचा ही मुलायम आणि पाणीदार होते. मुलतानी मातीमुळ चेहरा उजळतो आणि पिंपल मार्क पण जाऊन चेहरा खूप सुंदर दिसतो. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon